हे शब्द कोठे गेले
मराठी मधे अनेक शब्द वापरले जातात्.त्यातले काही टिकतात्.काही विसरले जातात.
उदा: अंमळ आणि खुश्की हे दोन शब्द कोठे गेले
अंमळ हा जरा/ थोडेसे या अर्थाने वापरला जायचा तो ही दे जरा अंमळ थोडेसे...किंवा मी जरा अंमळ झोपतो थोडसा. अशा प्रकारे वापरात होता.
हा शब्द कोणत्या भाशेतुन मराठीत आला? त्याचा नक्की अर्थ काय?
खुश्की हा फारशी शब्द्..जमीन(कोरडे ठिकाण) या अर्थाने वापरला जायचा .इतिहासात तुर्कानी इस्तान्बुल शहाराचा ताबा घेतला आणि युरोपियन लोकना भारातात येण्याचा खुश्कीचा मर्ग बन्द झाला.( या एकमेव वाक्याशिवाय हा शब्द मी कोठिही ऐकला नाही)
असे आणखिही काही शब्द तुम्हाला महित असले तर लिहा
आपला विजुभाऊ
अडचण - हल्ली लोक सर्रास प्रोब्लेम असा आंग्ल शब्द वापरतात
मंडळी - मिसेस (उच्चार मिशेस)
कुटुंब - फ्यामिल्ली
सोडुन दे - ड्रोप कर
भोजन, जेवण - लंच डिनर
भेटायला कुणी आले आहे - गेस्ट आले आहेत
पाहुणे - रिलेटिव
डोके दुखत आहे - डोक्याला हेडेक आहे
नाना
नाना आपण मराठी शब्दांबद्दल बोलुया....
उदा:मातेरं...... त्याने चांगल्या गोश्टीचे मातेरं केलं ( मातेरं नेहमी चांगल्या गोश्टीचे च होते.....वाइट गोश्टीचे होत नाही)
मातेरं हा शब्द कोणत्या भाशेतुन मराठीत आला? त्याचा नक्की अर्थ काय?
In reply to नाना आपण by विजुभाऊ
माझ्या माहितीप्रमाणे चांगलं कापड वापरून जूनं झालं की पाय पुसणी म्हणून किंवा फरशी पुसायला वापरतात त्याला मातेरं म्हणतात.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
In reply to मातेरं by जुना अभिजित
पोतेरं! (मातेरंचं पोतेरं करु नकोस रे अभिजिता!;)
चतुरंग
In reply to ते मातेरं नव्हे by चतुरंग
In reply to नाना आपण by विजुभाऊ
म्हणजे कुठल्याही गोष्टीला मुठमाती देणे, ती गोष्ट पूर्ण मातीत गाडणे...
मातेरं नेहेमी चांगली गोष्ट वाईट होण्याबद्दल म्हटले जाते पण जर एखादी गोष्ट चांगली झाली तर त्याला त्या गोष्टीचे सोने झाले असे म्हणतात.
आता तर कपाट हा शब्द सुध्दा 'कप्बोर्ड' या नावाने संबोधला जातो. अर्थातकपाट हा शब्द याच इंग्रजी शब्दामुळे अस्तित्वात आला.
In reply to फडताळ by वडापाव
दरवाजे असलेल्या फडताळाला कपाट म्हणू लागले असावेत.
In reply to कपाट जुना शब्द आहे by धनंजय
In reply to ते कपाट नाही... by मस्त कलंदर
मित्रानो आपण फक्त मराठी शब्दांबद्दल बोलुया
कपाट याला फडताळ हा अस्सल मराठी शब्द आहे.
पण फडताळ हा शब्द तरी कोठुन आला?
पण अंमळ आणि खुश्की हे दोन शब्द हल्ली वापरातच नाहीत
कोडगा : मारावयाचे एक साधन(Hunter)
हा शब्द निगरगट्ट या अर्थाने केंव्हा पासुन वापरायला सुरुवात झाली?
रोडगा म्हणजे काय? आणि तो मरिआई ला का वहातात?
In reply to मित्रानो by विजुभाऊ
चाबकासाठी "कोरडा" असा शब्द प्रचलित आहे.
कोडगेखाऊ म्हणजे मार=कोडगे खाऊन निर्ढावलेला, निर्लज्ज. कोडगा शब्दाचा तोही अर्थ - लघुकरण असावे.
रोडगा रोट शब्दापासून, कणकेत थोडे बेसन आणि मसाले घालून त्याची जाडी पोळी. तो मरीआईला का वाहातात माहीत नाही - एकनाथांच्या भारुडात तसा उल्लेख आहे.
सुधिर कांदळकर म्हणतात ते खरंच आहे. बदल हे जिवंतपणाचे लक्षण आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
बी.बी.सी. रेडियोच्या अनेक भाषातील वाहिन्या आहेत त्यातल्या हिंदी वाहिनीवर एकदा एका चर्चेत एक इंग्लिश माणूस हिंदीतून बोलत होता अचानक त्याने असा एक शब्द वापरला की जो हिंदी वाटावा, पण तो हिंदी नव्हता. लगेच तिथल्या हिंदी भाषक भारतीयाने त्याला सांगितले "आप ने जो शब्द अभी इस्तेमाल किया उस तरह का शब्द हिंदी में नहीं हैं." ताबडतोब इंग्लिश माणसाने उत्तर दिले "नहीं हैं तो होना चाहिये!" आणि ते खरं आहे. इंग्लिश भाषा वेगाने विकसित होण्यामागचे एक मोठे कारण त्या भाषेने स्वीकारलेले नवनवीन शब्द - धोती, कुर्ता, पजामा, गुरु असे कितीतरी शब्द आज इंग्लिश भाषेने आत्मसात केलेले आहेत.
चतुरंग
किंबहुना = परंतु = पण
पोशाख
मतलई = खारे वारे आणि मतलई वारे
एकसमयावेच्छेदेकरून = ?
वस्तुतः
सध्या इतकेच आठवतात, आज रात्री "पण लक्षात कोण घेतो?" उघडून बसतो, बख्खळ शब्द मिळतील! :))
In reply to विजुभाऊ, आणखी काही शब्द... by पिवळा डांबिस
हा अर्थ योग्य नाही.
योग्य अर्थ खालीलप्रमाणे आहे.
किंबहुना= बहुधा, किंवा
माझे आजोबा वापरत ते काही शब्द -
काळोख (अंधार)
रुची (चव) (आज तोंडाला रुची नाही.)
भुरका (कढीचा वैगेरे मारतात तो भुरका, घोट मधे ती मजा नाही:)
कढत (गरम. पण कढत ह्या शब्दात एक वाफाळलेपणाची छटा आहे उदा. ऊनून भातावर कढत पिठले वाढले!:)
थट्टा (चेष्टा, मस्करी.) ह्या मधे मित्रत्वाने केलेली असल्याचा भास आहे.
स्नेही (मित्र). ह्या मधे आपलेपणा, जिव्हाळा अशाही छटा जाणवतात.
चतुरंग
"आंबोण" - म्हशीला घालायचे आंबलेले अन्न
माझ्या आजीचे शब्द :
मोरी : बाथरूम्/न्हाणीघर
शिंकाळं : वरती टांगून ठेवलेलं मडकं
परसदार : बॅक यार्ड
चुलवण : चूल्(बहुतेक)
- (सर्वव्यापी)प्राजु
In reply to माझ्या आजीचा by प्राजु

ह्या चित्रात बाजूची कढई ज्यावर ठेवली आहे त्याला चुलवण म्हणतात.
जाळाच्या नुसत्या धगीवर कढई गरम राहते. स्लो हीटींग.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
In reply to चुलवण by जुना अभिजित
In reply to वैल by धनंजय
भुरका (कढीचा वैगेरे मारतात तो भुरका, घोट मधे ती मजा नाही:)
घोट घोट घेतात ते वेग्ळेच असते रे चतुरंगा
उसासे टाकणे म्हणजे काय?
माळवद म्हणजे काय?
वानगी म्हणजे उदाहरण्...उदः वानगी दाखल.
दाखल.....दखल आणि दाखला हे समानार्थी शब्द आहेत काय?
त्यांचे नक्कि अर्थ काय? ते कोणत्या भाषेतुन आले?
In reply to भुरका by विजुभाऊ
उसासे टाकणे म्हणजे काय?
उसासे टाकणे = म्हणजे तात्या आणि डांबिसकाका छानपैकी मैफिल जमवून 'घेत' बसले आहेत आणि विजुभाऊ नुसतेच बघत बसले आहेत त्यावेळी जे सुस्कारे टाकतील त्याला म्हणतात ;)
ह्या शिवाय शिवकालीन किंवा पेशवेकालीन खापरी नळांमधून जे पाणी गावात आणीत असत त्या नळांतून मधे अडकलेली हवा बाहेर निघून जाण्यासाठी नळांवर उंच जागी दीपमाळेसारखे झरोके ठेवलेले असत त्याला 'उसासे' म्हणत (आजच्या तांत्रिक भाषेत "एअर रिलीज वॉल्व")
माळवद म्हणजे काय?
माळवद = गच्ची (हा शब्द अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक इ. भागात प्रचलित आहे)
वानगी म्हणजे उदाहरण्...उदः वानगी दाखल.
दाखल.....दखल आणि दाखला हे समानार्थी शब्द आहेत काय?
दाखल = हजर होणे / भरती करणे (शिपाई सैन्यात दाखल झाला),
(रोग्याला इस्पितळात दाखल केले)
दखल = नोंद घेणे (इस्पितळात आलेल्या रोग्याची डॉक्टरांनी दखलही घेतली नाही)
दाखला = उदाहरण/सर्टिफिकेट (हा महाराजांच्या मुत्सद्देगिरीचा दाखला होता) (त्याने जन्माचा दाखला मागितला).
चतुरंग
म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा (आणि अर्थातच त्यासाठी कठोर तपाचरण
करणारा असा)
असाच एक सध्या निर्वापरातला शब्द म्हणजे निर्जळा जो संकष्टी,
एकादशीला उपासासाठी वापरत असत.
पूर्वी उपास साबुदाणा खिचडी, शेंगदाणा आमटी, वेफर्स असा चविष्ट न
करता शरीराला झीज होईल असा केला जायचा, निर्जळा एकादशी ही
त्यापैकी एक.
निर् +जल = पाणी सुद्धा न घेता.
सध्या
किल्ली या ऐवजी चावी आणि कुंचा या शब्दा ऐवजी झाडू हे शब्द प्रचलित आहेत
दळभद्री : ह शब्द खरेतर हद्दपार झालेला....पण तो टिकवण्याचे श्रेय मात्र थोरल्या ठाकर्यांचे.
पण हा शब्द ही कसा कोठुन आला?
दळभद्री : ह शब्द खरेतर हद्दपार झालेला....पण तो टिकवण्याचे श्रेय मात्र थोरल्या ठाकर्यांचे.
पण हा शब्द ही कसा कोठुन आला?
दळभद्री : ह शब्द खरेतर हद्दपार झालेला....पण तो टिकवण्याचे श्रेय मात्र थोरल्या ठाकर्यांचे.
पण हा शब्द ही कसा कोठुन आला?
वरील बाकी सर्वांस धन्यवाद.
मॅनिला = सदरा = शर्ट
विजार = पँट
श्मश्रू = केस कापणे
जाजम = गालिचा = कार्पेट
ओगराळं = आमटी वाढण्याचं पात्र
डोया = माठातून पाणी काढण्याचा डाव किंवा दांडी असलेलं भांडं
परस = घराची मागची बाजू
घडवंची = तिवई = तीनपायी (ज्यावर माठ, छोटे पिंप ठेवतात)
छबिना = आरसा (?)
चंची = कमरेला अडकवायची पानाची कापडी पिशवी.
कसा = कमरेला अडकवायची पैशाची कापडी पिशवी.
चंबू = लहान मुलांचे विशिष्ट आकाराचे पाण्याचे भांडे.
गुडदाणी = गुळ आणि दाण्याची चिक्की (?).
छकडा = अच्छादित बैलगाडी.
पांगुळगाडा = लहान मुलांस चालायला शिकण्यास मदत करणारा गाडा
अवजारं = व्यावसायिक हत्यारं (शेतीची, सुताराची, नाव्ह्याची इ.)
In reply to मॅनिला.. by प्रभाकर पेठकर
(राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थकोश... प्रमाणे)
चंबू = लहान मुलांचे विशिष्ट आकाराचे पाण्याचे भांडे.
त्याला गडु हाही शब्द आहे.
गडगा हाही शब्द आहे......तो बहुधा समानाअर्थी असावा
In reply to चंबू = लहान by विजुभाऊ
गुडदाणी = गुळ आणि दाण्याची चिक्की (?).
होका.मी गुड्दाणी म्हणजे गुडगुडी समजायत होतो....
छबिना = आरसा (?)
छबिना = देवाचा छबिना असतो......त्याची पालखीत मिरवणुक कढतात
छबिना = आरसा (?)
छबिना = देवाचा छबिना असतो......त्याची पालखीत मिरवणुक कढतात
३. घोडेस्वाराचा रात्रीचा पहारा.
छान चर्चा !
खण = कप्पा किंवा ड्रॉवर
खरेतर फडताळ हा शब्द शेल्फ या शब्दाला वापरला जातो असे मला वाटते. ज्या फडताळाला दारे आहेत ते कपाट. उघडे असेल तर फडताळ. किंवा मांडणी.
-- लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
झब्बा: हा सदर्यासारखा पुरुषांनी परीधान करायचा कुडत्यासदृश कपडा
पुण्याचे पेशवे
In reply to झब्बा by llपुण्याचे पेशवेll
जाजम ... ते गालिच्यासाऱखं खाली अंथरतात ते??
जाजम = सतरंजी
सोवळे म्हणजे काय माहीत आहे...पण
ओवळे म्हणजे काय?
उदा: तिने ओवळ्याने सगळा स्वयंपाक केला.
In reply to जाजम = by विजुभाऊ
या शब्दात अमंगलता आणि अस्वच्छता दोन्ही ध्वनित होतात.
हरताळ :पूर्वी सावकारांच्या पेढ्यांवर जे हिशोब लिहिले जायचे त्यात कही भाग खोडुन दुरुस्त करायचा असेल तर त्या लिखाणावर पिवळी पावडर फासली जायची.त्या पिवळ्या पावडर ला हरताळ म्हणत.
आपण मात्र हरताळ फासणे...शब्द संप्/बंद या आर्थाने वापरतो..
मंडळी....हा विषय मस्त चालला आहे........झकास प्रतिसाद आहे.....सर्वांचे धन्यवाद्........छान माहिती आणि मनोरंजन होतय्.....अजुन शब्द येउद्यात....मराठी मनोरंजन कोश बनवुया.....
हा शब्द कोणाला माहीत आहे का?
'किंतान' म्हणजे तागाच्या कापडापासून तयार करतात. त्याचाही उपयोग बसण्यासाठीच होतो. कोणाला अधिक माहीती आहे का?
पुण्याचे पेशवे
किंतान = गोणपाट
याला पोते असे ही म्हणतात..
जरत्कारू...... म्हणजे काय
In reply to किंतान = by विजुभाऊ
In reply to जरत्कारू म्हणजे by मस्त कलंदर
जाणता.......याचा अर्थ सगळे जाणतात
याच्या जोडिने येणारा शब्द म्हणजे "नेणता"
काहिवेळा " नेणिवेच्या पलिकडले " असाही शब्द प्रयोग करतात
नेणता / नेणीव म्हणजे काय
In reply to जरत्कारू.. by प्रमोद देव
मळभ = ढग ? मळभ दाटले .....
मळवट या शब्दाचा नक्की अर्थ काय?
माळणे = गजरा माळणे........याच्याशी काही संबंध आहे का?
In reply to मळभ = ढग ? by विजुभाऊ
गावो गाव जाणारी एसटी ही कुठल्या ना कुठल्या आगारा तुन येते वा जाते...
आगार या शब्दाचा नेमका अर्थ काय?
आगार = कोठार
डेपो = कोठार.........
In reply to वाघिण by संजय अभ्यंकर
In reply to वाघिण by संजय अभ्यंकर
In reply to शहरी भाषेत... by मगो
In reply to तसराळ॑ by विजुभाऊ
In reply to वदतोव्याघात by विजुभाऊ
In reply to पारणे म्हणजे काय? by विजुभाऊ
In reply to ह. ह. पु. वा. by llपुण्याचे पेशवेll
In reply to पारणे म्हणजे काय? by विजुभाऊ
In reply to विसण = by ईश्वरी
In reply to विसण = by ईश्वरी
In reply to अलगूज = by विजुभाऊ
In reply to कशिदा = by ललिता
In reply to ह्या शब्दांचे / शब्दसमुहांचे अर्थ माहित आहेत काय? by तर्री
अडचण -