मटाची सांगितिक दिवाळखोरी...
आजच्या मटामध्ये स्वर्गीय भास्कर चांदावरकर यांच्याविषयी अग्रलेख आहे. मात्र त्यात त्यांच्या काही गाण्यांचा उल्लेख करतांना मटा संपादकांनी भावनेच्या भरात एक घोडचूक केली आहे..
सुरेश भट साहेबांचं 'उष:काल होता होता..' हे गाणं भास्कर चंदावरकरांचं आहे असा त्यात उल्लेख आहे. वास्तविक हे गाणं चंदावरकरांचं नसून पं हृदयनाथ मंगेशकरांचं आहे.
विशेष गती नसलेल्या विषयात अग्रलेख लिहायला गेलं की असं होतं!
मटाचा जाहीर निषेध..
आपला,
(हृदयनाथप्रेमी) तात्या.
वाचने
6054
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
:O
अशीच एक कालच्या मटा शब्दकोड्यातली साहित्यिक दिवाळखोरी....
अक्षरवाटा या नावाने शुभांगी जोशी या शब्दकोडे लिहितात त्यात एक सूचना अशी आहे .
... ... शिरवाडकर ( केशवसुत)
मी हतबुद्ध झालो, संपलो.
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
In reply to मटा...शिरवाडकर आणि केशवसुत????? by भडकमकर मास्तर
महाराष्ट्रातच असतात ना? आणि कमीत कमी मराठी आवृत्तीवर काम करणारे लोक तरी महाराष्ट्राला जाणणारे असावेत ना?
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
उषःकाल पंडीतजींचंच आहे.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
सामना च्या अग्रलेखात ही ह्या गाण्या चा उल्लेख भास्कर चंदावरकरां चे गाणे असाच आहे.
In reply to सामना च्या अग्रलेख by शिशिर
हे तर लै भारी..
दोघे एकत्र बसून ( चुकीचे संदर्भ असलेले!!!) अग्रलेख तयार करतात की काय?
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
In reply to सामना पण का? by भडकमकर मास्तर
ओ.पीं. नय्यर ह्यांचे निधन झाल्यावर अग्रलेखात म्.टा. ने जंगली चित्रपटातले (शंकर जयकिशनचे 'चाहे मुझे कोई जंगली..') गाणे ओ.पी. नय्यर ला दिले होते.!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
In reply to सामना च्या अग्रलेख by शिशिर
हं!
अग्रलेख शिवसेनेचे आजी खासदार व मटाचे माजी संपादक (आजी संपादकीय सल्लागार) यांनी लिहिला असण्याची शक्यता दाट आहे असा निष्कर्श काढता येऊ शकतो का? :)
बाकी मटाची वैचारीक, भाषिक वगैरे दिवाळाखोरी ह्यात काहि नाविन्य राहिले नाहि
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
In reply to आजी खासदार? by ऋषिकेश
बाकी मटाची वैचारीक, भाषिक वगैरे दिवाळाखोरी ह्यात काही नाविन्य राहिले नाही
"मिठीकाठी मुंबई आता पहिली उरली नाही"
काल एका मराठि वाहिनीवर पण स्व. चंदावरकरांबद्दल माहिती देताना मागे ह्याच गाण्याची चित्रफित लावली होती..
`कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे' म्हणायचे असावे.
असो. `सामना' रंगलेला दिसतोय!!
In reply to त्यांना by आपला अभिजित
`कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे' म्हणायचे असावे.
असो. `सामना' रंगलेला दिसतोय!!
माझ्याही हेच मनात आले,:)
स्वाती
>>विशेष गती नसलेल्या विषयात अग्रलेख लिहायला गेलं की असं होतं!
हे मात्र खरं आहे.
दै. सकाळचा संगीतभास्कर अग्रलेख चांगला वाटला.
-दिलीप बिरुटे
'सामना'चा अग्रलेख आणखीनच मजेशीर वाटला. महास्फोट (बिगबँग), विश्वनिर्मिती याचा संबंध अग्नीतत्वाशी लावल्यामुळे ... असो.
भास्कर चंदावरकरांची 'सामना'तली गाणी कधीच विसरता येणार नाहीत ...
अदिती
टाईम्स ऑफ इंडियाच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये दिलेल्या बातमीत भास्कर चंदावरकरांनी 'घाशीराम तेंडुलकर' या विजय तेंडुलकरांच्या नाटकाला संगीत दिल्याचे म्हटले आहे. आता याला काय म्हणावे बरे?
In reply to टाईम्स ऑफ by घाटावरचे भट
भास्कर चंदावरकरांनी 'घाशीराम तेंडुलकर' या विजय कोतवालांच्या नाटकाला संगीत दिल्याचे म्हटले नाही हे नशीबच! :|
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
In reply to टाईम्स ऑफ by घाटावरचे भट
'घाशीराम तेंडुलकर' या विजय तेंडुलकरांच्या नाटकाला संगीत दिल्याचे म्हटले आहे. आता याला काय म्हणावे बरे?हा हा हा! घाशीराम तेंडूलकर बाकी जबर्याच नाव आहे! :) आपला, तात्या तेंडूलकर.
एका प्रसिध्द उद्योगपतींचे आहे.
बाकी मटा काय अन सकाळ काय एकाच माळेतील मणी.
वेताळ
महालक्श्मी
मटा आणी सामना दोन्हीचे सम्पादक भारतकुमार राउत आणी सन्जय राउत भाउ आहेत का?दोघान्चेही साहीत्य आणी सन्गिताचे ज्ञान अफाट्च आहे हो.ज्यातले कळत नाही,अश्या विशयान्वर लिहायचे नाही,असे म्हट्ले तर ते तरी बिचारे कश्यावर लिहिणार?दोघेही एकत्र बसुनच अग्रलेख लिहित असावेत.
गोविन्द राव तळवलकर आणी नन्तर कुमार केतकर मटा चे सम्पादक असेपर्यन्त पेपरचा दर्जा उच्च होता.
आता राउताना राजकारण,इतिहास्,भुगोल असो की साहित्य,सन्गित असो कशातच गती नाही,तर ते तरी काय करणार?
मटा...शिरवाडकर आणि केशवसुत?????