संडे स्पेशल (मिंटी मशरुम रोल्स)
Taxonomy upgrade extras
मशरुम आणि पुदिनाचा वापर करुन हे रोल्स स्टार्टर किंवा स्नॅक म्हणून करु शकतो.
साहित्यः
४ उकडलेले बटाटे (मॅश करुन २ कप)
२ ब्रेडचे स्लाईस कडा काढलेले (ब्रेड क्रम्ब्स)
१/२ टी.स्पून गरम मसाला
१/२ टी.स्पून लाल तिखट
तेल तळण्यासाठी
अंड्यातील पांढरा बलक
थोडे ब्रेड क्रम्ब्स कोटींग साठी
सारणः
१ टे.स्पून बटर
१५० ग्रॅम मशरूम बारीक चिरून (दिड कप)
१/४ कप बारीक चिरलेला पुदीना
१ मोठा कांदा बारीक चिरून ( अर्धा कप)
मीठ, काळी मिरी पूड चवीनुसार
१.बटाटे उकडून घ्या. गरम असतानाच मॅश करुन घ्या नाहीतर थंड झाल्यावर किसून घ्या.
त्यात ब्रेड क्रम्ब्स, गरम मसाला, तिखट, मीठ घाला. चव पाहून बाजुला ठेवा.
२.सारण तयार करण्यासाठी पातेल्यात बटर गरम करून कांदा घालून मऊ होइपर्यंत परतवा. नंतर मशरूम घालून ४/५ मिनिटे परतवा.
त्यांतील पाणी सुकून ते कोरडे व्हायला हवेत. पुदीना, मीठ, मिरीची पूड घालून चांगले परतवा व सारण थंड होउ द्या.
३.बटाट्याच्या मिश्रणाचे सारखे ८ भाग करा.प्रत्येक भागाचा लांबट पोळीप्रमाणे आकार करून त्यात एक एक चमचा वरील सारण भरा व त्यांचे रोल्स बनवा.
४.अंड्यातील पांढरे, १ मोठा चमचा पाण्यात फेटून त्यात हे रोल्स बुडवून लगेच काढा व ब्रेडक्रम्ब्स मध्ये घोळा.
५.तेलात सोनेरी/ब्राउन होईपर्यंत तळा.
टोमॅटो सॉस, पुदिना किंवा खजुराच्या आंबट गोड चटणी बरोबर वाढा.
वाचने
4982
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
लई भारी..
:((
In reply to :(( by विसोबा खेचर
हाय जाहिद, तूने आळंबी खाई ही नहीं
जवळा...
मलाही माहित नाही...