सुख म्हंजे नक्की काय आसत
लेखनप्रकार
सुख म्हणजे पैसा, श्रीमंती
वगैरे वगैरे .... ईती सर्व उद्योगपती ...
सुख म्हणजे आध्यात्म
ध्यान केल की मनशांती मीळते.
वगैरे वगैरे .... ईती सर्व सादूबाबा
"ये आये ! मी शिर्याबरूबर मूंबयला जाव ?"
शिर्याची थोरली भन मूंबयला दिल्ती. भावजी पोस्टमन व्ह्ते. खारपाड्यान त्यांचा लय रुबाब. शिर्या सुट्टीत दोन दिसांसाटी चाल्लावता. मीनी मूंबय कदीच बगीतली नवती. शिर्यान ईचारल तसा सूसाटलु.
"आर यकटा नको जाव त्या शिर्याबरूबर. तू ल्हान हाईस आजुन." आय
"ल्हान कना? ल्हान कना? आता त आटवी पास झालो न नव्वीत झेलो न?"
"म्हुन क झाला र ?तू जाव नको बाला. तीकर ट्रेन फिरतान जोरजोरात."
"आगं त्या कय रस्त्याव येतान आपल्यामाग ? त्या फिरतान रूलावरशी." मी
"तु माज डोक खाव नको. बा ला ईचार जा." आय.
हो नाय करता करता आयनी परमीशन दिल्ली. ५० रुपय हाताव टेकवल. दुसर्या दीवशी सकालची यस्टी पकरली. पयल्यांदाच जात व्हतो. आंगात कायतरी व्हईत व्हत.
चेंबुर क काय तीकर ऊतरलो न डबलबस पकरली. डायरेक ईक्रोली.
बस मदना ऊतरलो. शिर्या म्हनला चल वडापाव खाउ. टपरीव गेलू. शिर्यान दोन वडापाव सांगतले.
"शिर्या, मना ते हव."
"आर ते म्हंजे क र बाला?"
"ते रं , तो जाड्या खातोय त बग."
"तेला क म्हंतात र?"
"मना क म्हाईत?"
"तूला पायजेल ना ? मग मी मागवत बग."
"भैयाजी , वो देव." शिर्या.
"वो क्या ?"
"वो जाड्या खाताय ना वो पोला देव."
"ऊसको डोसा बोलते बाबा. किदरसे आया ?"
"तूमको क्या करनेका रं. वो डोसा देव दोन प्लेट चुपचाप". शिर्या वरडला.
डोसा खाताना लय मजा आली. मग वडापाव पन खाल्ला.पैशे शिर्यानच दिल्ल.
तीतना डायरेक कन्नमवार नगर मदे. रुम नं ३२३, तीसरा मजला. दरवाज्याव यक बटन व्हत ते शिर्यान दाबल. दार ऊगडल. हेमा व्हती. शिर्याची थोर्ली भन.
"आर मिथन्या बी आलाय रं ! ये ये आत ये."
आत गेलो. येक खाट, शो केस मदी टीवी आन प्ल्यास्टीक ची खूर्ची, दोन पावल फुड गेलो दूसरा रुम. आत ग्यासच टेबल, मोरी. घर संपल.
तिज्याआयला हा शिर्याचा भावजी खारपाड्याला आल्यावर फ्याक्टरी आसल्यासारका वागतो ? आसुदे. आपल्याला क त्याच. आपुन आज त्याजे कर आलेल हाव. त्याजेबद्दल वाईट्साईट बोल्ता कामा नय.
पोरांना पार्ले बीस्कीट चे पूडे आनलेवते ते दिल्ले. पोर खुश. पोरांशी खेलताना दूपार कदी झाली कल्लच नाय.
"या रे जेवाला या."
हेमा नी मटन केलवत नी चांदलाच्या भाकरी. मटन लय टेस्टी जालवत. जाम खाल्ल. उटाला पन जमत नवत. तोंड धवल न दोगांनी खाटेवर आंग टाकल.
मना क झोप येईना. सारकी कुस बदलत व्हतो. पन काय बी फरक पडत नवता. शेवटी शिर्याला ऊटवला. शिर्या, हागाला लागलीय. शिर्या धडपडत उटला.
" कना खाल्ल र येवड मटन ? चल भायेर. ते चींपाट झे पानी भरून."
मीनी पींपातल पानी चिंपाटात भरल. "ये हिकर" . शिर्या तिन चार खोल्या सोडून यका खोलीपाशी थांबला. ह्याच्यान जा आनी आटपुन ये.
"हे कोनाच घर हाय ?घरान कस बसाच?"
"आर ह्याला संडास म्हनतात. सगली लोका ह्याच्यानच हागतान."
हे आसल काय खारपाड्यान नवत. सरल सकाली ऊटाचा न खाडीवर पलाचा. चींपाट नाय न काय नाय.
बगाव ते नवलच व्हत. मीनी दरवाजा ऊगडला आन गेलो. वासान ऊलटीच आलीवती पन केली नाय. कसातरी बसलो. शिर्या गेला. पाच मीन्ट झाली पन कायव हुईना. कुंथाला लागलो. पोटाला त तडस बसलीवती. आता क कराच? थोडा जोर लावनार येवड्यात दरवाज्याव थाप पडली.
"कोण आहे रे आत ? शिचं किती वेळ झाला ?"
"मी हाय मीथन्या. " मी आतून बोल्लो.
"आरे कीती वेळ झाला ?आटप लवकर नाहितर परत भुक लागेल."
जल्ला काय कल्लाच नाय मना. पन दूसर्या कोनाला तरी जोराची लागलीय न तो बोंबलतोय यवड समझल. तसाच भायेर आलो.
पोटात आता कला माराला लागल्यावत्या.
आयझवली लागोपाट तीनदा गेलो संडासात पन कायव हुईना (सोताशिच : सारक सारक क र बाझवला ? आन तो बी यकटाच ? ).
रात झालीवती. शेवटी शिर्यान बॅटरी झेतली मना म्हनला चल. तेच्या पाटोपाट नींगालो पोट धरून. जीना ऊतरलो बिल्डिंगच्या पाटीमागे गेलो. नाला लागला. अंदार व्हता. शिर्या म्हनला बस हीत आन कर. बसलो.
दोन मीन्टात फॉककन आवाज आला न मी मोकला झालू.
तूमाला सांगतो स्वर्गसुख, आत्मशांती वगैरे कायकाय म्हन्तात ना ते सगल मना येकाच टायमाला झाल. सगल मानन्यावर हाय की.
वाचन
36788
प्रतिक्रिया
0