बकलावा हे एक अफगाणी गोड पदार्थ आहे. मी एका अफगाणी हॉटेलात खाल्ला होता, तसा फार गोड असतो पण मला आवडला होता.
साहीत्यः
१ पाकिट फायलो डो (phylo Dough) , या अगदी पातळ मैद्याच्या पोळी सारखं असतं, घरी बनवायला खुप कठीण आहे त्यामुळे विकत च आणावे.
फायलो डो चे पाकीट एक दिवस आधी फ्रीजर मधुन फ्रीज मध्य ठेवावे म्हणजे तुटणार नाही.
१ कप कापलेले किंवा जाडसर कुटलेले आक्रोड + बदाम + पिस्ता चे मिश्रण
२ टे. स्पू. + ३/४ कप साखर
३/४ कप पाणी
१ तुकडा दालचिनी
१/२ टी. स्पू. दालचिनी पूड
२-३ लवंगा
१ बारिक चकती किंवा लिंबू फोड
१/४ कप वितळवलेले बटर (सॉल्टेड असलेलं जास्त बरं )
१ टी. स्पू. दालचिनी पावडर
कृती:
१) ३/४ कप साखर + ३/४ कप पाणी + लवंगा + दालचिनी + लिंबू एकत्र करुन मध्यम आंचेवर ३० मिनिटे ठेवावं. मधुन मधुन हलवावे.
थंड झालं की लवंगा , दालचिनी , लिंबू काढुन घ्यावे.
२) जाडसर कुटलेले आक्रोड + बदाम + पिस्ता च्या मिश्रणा त २ टे. स्पू. साखर + दालचिनी पूड टाकून एकत्र करुन घ्यावे.
या दोन्ही गोष्टी एक दिवस आधी करुन घ्याव्यात.
३) आता एक बेकींग ट्रे ला बटर लावुन घ्यावे.
४) फायलो शीट्स हलक्या हाताने वेगळ्या करुन घ्याव्यात.
५) एका फायलो शीट ला ब्रश ने किंवा हलक्या हाताने बटर लावावे आणि ट्रे मध्ये ठेवावी.
६) वरिल कृती ७-८ शीट्स ची लेयर बने पर्यंत करावी.
७) आता या फायलो शीट्स च्या गादी वर अर्धी सुका मेवा पुड पसरवुन घ्यावी.
८) परत कृती ५) करावी पण या वेळी २-३ फायलो शीट्स च वापराव्यात.
९) परत उरलेली सुका मेवा पुड पसरवुन घ्यावी.
१०) पुन्हा ७-८ बटर लावलेल्या फायलो शीट्स ची लेयर करावी.
११)३२५ फॅ. वर ओव्हन प्रीहीट करुन घ्यावे.
१२) हव्या त्या आकारात कापुन घ्यावे. बेक करायच्या आधी च कापावे नंतर नीट कापले जात नाही.
१३) ३२५ फॅ. वर ३३-३५ मिनिटे बेक करुन घ्यावे.
१४) बेक झाल्यावर २-३ मिनिटे सेट होऊ द्यावे, नंतर आदल्या दिवशी केलेला पाक हळुहळु ओतावा. जास्त टाकु नये व पाक उरल्यास या धाग्याचा उपयोग करावा. :D
15) १-२ तास सेट व्हायला ठेवा. वरुन पिस्ता काप टाकुन सजवा आणि खा.
टिपा:
हे वरुन पाक ओतल्यामुळे जास्त गोड लागतं .
फायलो शीट्स वर बटर लावायला कंजुषी केली की लेयर्स नीट बनण्यात ही कंजुषी होते. (विनोद करायचा केविलवाणा प्रयत्न :D )
मी पाक थंड झाल्यावर थोडं (3 tbs)मध टाकलं होतं.
वाचने
13082
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
यम्म्मी..
छान पाककृती.. येऊ द्या अजून.
In reply to यम्म्मी.. by लवंगी
ठ्यॉ: !!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to छान पाककृती.. येऊ द्या अजून. by अनंता
हा पदार्थ
हा पदार्थ एकदा खायला सुरुवात केली की थांबणे अवघड!
In reply to हा पदार्थ by रेवती
कालच असा
धन्यवाद
गोड
लेबनीज
In reply to गोड by सहज
पाकृ अंमळ
वॉव..
मला
दिपालीताई,
अहो तुम्हाला काही दयामाया आहे कि नाही?
वल्ला क्या
वेगळाच
आईऽऽऽगं!!!!!!!!
सगळ्यांना
अगं तू
इकडे आलीस की बनवेन...
अरे वा, मी
मस्तच.........!!
दीपाली
नक्की ..
मस्तच....
स्साला ..
चित्रमय अत्याचार!
फोटो दिसत नसल्याने...