"मायकल जॅक्सनच्या गाण्याच्या ६५ दशलक्ष सीडीज विकल्या गेल्या" - एक बातमी.
आता इथे ६५ दशलक्ष म्हणजे नक्की किती ह्याचा अंदाज (मनातल्यामनात का होईना) पण किंचित आकडेमोड केल्याशिवाय किती लोकांना येतो? विशेषतः ज्यांचे शिक्षण भारतात झाले आहे (माध्यम कोणतेही असो) त्यांना मिलियन-बिलियन पेक्षादेखिल लाख-कोटी ह्या संज्ञा अधिक परिचयाच्या वाटतील. मग, मिलियनचे दशलक्ष असे बिनडोक भाषांतर करण्यामागे काय हेतू असावा?
***
"दक्षिण पूर्व अशियाई देशांत....." - दुसरी एक बातमी.
सुदैवाने भारतीय भाषा ह्या दिशाविषयक शब्दांबाबत अधिक समृद्ध आहेत. दक्षिण-पूर्व ह्याला आग्नेय असा विवक्षित शब्द आपल्याकडे आहे. नैऋत्य मोसमी वारे असा शब्दप्रयोग भूगोलाच्या पुस्तकात असे तसेच वायव्य सरहद्द गांधी, ईशान्येकडील राज्ये, असे शब्द प्रयोगदेखिल वापरात आहेत. तरीही, दक्षिण-पूर्व असा शब्द वापरणे हे बिनडोक भाषांतराचेच उदाहरण नव्हे काय?
***
"बंगालच्या खाडीत....." - टिव्हीवरील निवेदिका.
मुंबईच्या आसपासच किती खाड्या आहेत मग संपूर्ण बंगालात किती खाड्या असतील, असा विचार मनात येतो. त्यातील नक्की कोणत्या खाडीबद्दल बोलणे चालले आहे याचा अंदाज घ्यायला गेलो, तेवढ्यात समजते की बातमी बंगालच्या उपसागराबद्दल आहे!
भाषा-भाषांत तेढ नको, श्रेष्ठ-कनिष्ठ वाद तर त्याहूनही नकोत. तरीही एखादी भाषा ज्या भौगोलिक परिसरात जन्मते-वाढते त्याचा त्या भाषेच्या शब्दसंपत्तीवर पुष्कळ परिणाम होतो, हे मान्य होण्यास हरकत नसावी.
महाराष्ट्राला ७२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे तर, हिंदी भाषा जेथे रुजली-जन्मली तिथे आसपास कुठेही समुद्रकिनारा नाही! तेव्हा निदान समुद्रविषयक शब्दतरी मराठीने हिंदीतून उसने घ्यावे, असे काही नाही! तेव्हा हादेखिल बिनडोक भाषांतराच एक प्रकार!
वाचने
10279
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही
भाषांतर
जाऊ द्या
मराठीमधे
'माझी मदत
In reply to मराठीमधे by नीधप
) सॉलिडच
In reply to मराठीमधे by नीधप
हा हा हा!!!
In reply to मराठीमधे by नीधप
ते भाषांतर
In reply to हा हा हा!!! by धमाल मुलगा
>>मिलियन-बि
सुनील
त्यातल्या
In reply to सुनील by सहज
सहमत आहे !
In reply to त्यातल्या by अवलिया
हा हा
In reply to सहमत आहे ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा हा
In reply to हा हा by अवलिया
वा! मस्त
In reply to हा हा हा by सहज
सहमत आहे !
In reply to वा! मस्त by अवलिया
(सहजरावच्य
In reply to सहमत आहे ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बदलती भाषा...
In reply to हा हा हा by सहज
+१
In reply to बदलती भाषा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+२
In reply to +१ by अवलिया
बिनडोक वाद
In reply to बदलती भाषा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा! मस्त !!
In reply to बिनडोक वाद by सहज
:)
In reply to बिनडोक वाद by सहज
दुधाळ जनावरे...
पण..
In reply to दुधाळ जनावरे... by मस्त कलंदर
सहमत. केस
In reply to पण.. by विसोबा खेचर
मग लिखाळ
In reply to सहमत. केस by अवलिया
लिखा
In reply to मग लिखाळ by घाटावरचे भट
चुचु
In reply to लिखा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह!!!
In reply to लिखा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डोक्यात
In reply to लिखा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्तच..........
In reply to लिखा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेत
In reply to मस्तच.......... by वेताळ
(विषय दिलेला नाही)
In reply to लिखा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुप्पर!
In reply to लिखा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
) ) ही
In reply to मग लिखाळ by घाटावरचे भट
'अभारतीय'
महत्वाचा विषय
१०-१५
मी
In reply to १०-१५ by नितिन थत्ते
अनास्था
सहमत
In reply to अनास्था by अरुण वडुलेकर
सुनीलराव,स
घरोघरी....
कुठे ठेवले आहे
In reply to घरोघरी.... by ऋषिकेश
अवांतर
पास नापास
शंका