मन चांदण्याचे तळे
मन अंधाराचा काठ
मन चांदण्यांचे तळे
मन आभाळ उंचसे
मन धुळीची पावले
मन आवर्त फिरते
मन हळवे कोवळे
मन एक सूर्यफूल
त्याला सुखाचाच ध्यास
किती सोसून झळांना
होते शेवटी उदास
मन बेट हे वेळूचे
असे मोत्यांनी भरले
परी मिटते नयन
जसे फुलले फुलले
मन सतारीची तार
मन इवला तुषार
मन कुणाला कळेना
असा मोहक झंकार
वाचने
4703
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
वाह! खुपच
फारच सुंदर !
In reply to फारच सुंदर ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
त्यांना काय
In reply to त्यांना काय by सुवर्णमयी
वा!!
वा...
In reply to वा... by प्राजु
हेच
वा!
वा! फार सुंदर.
तरल...
शप्पथ!
कविवर्य ग्रेस व सुधीर मोघे....