प्रिय अन्वयराव,
राम राम मंडळी,
आपले मिपाकर अन्वयराव ह्यांच्या छोटेखानी लेखाला हे आमचे छोटेखानी उत्तर! हे उत्तर ह्या स्वतंत्र लेखातून आणि वेगळेपणाने द्यायची कारणे तीन!
१) आज बर्याच दिवसांनी एखाद्या लेखाला चार ओळींचे उत्तर देण्यास टाईम भेटला. एरवी, 'वा!', 'सुंदर!', 'छान!' या पलिकडे काही उत्तर द्यायला इच्छा असूनही टाईम भेटत नाही.
२) अन्वयरावांनी एका बापाच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. आम्ही ह्या उत्तराद्वारे एका लेकाच्या भावना मांडत आहोत!
३) ह्या उत्तराला साहित्यिक मूल्य वगैरे आहे असा आमचा (गैर) समज आहे म्हणून हे स्वतंत्र 'जनातलं, मनातलं!' :)
प्रिय अन्वयराव,
आपला छोटेखानी परंतु नितात सुंदर लेख आवडला.
त्याचं हसणं, शांत राहाणं आणि रडणं सारंच मला आंतर्बाह्य हलवून टाकतंय. त्याच्या चेहऱ्यावरील हास्यामुळे होणारा आनंद,मूर्त तू मानव्य का रे? बालकाचे हास्य का? या इथे अन् त्या तिथे रे सांग तू आहेस का त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?! अन्वयराव, आपल्या चिरंजिवांच्या रुपाने साक्षात ईश्वराचाच वास आपल्या घरात आहे. त्याच्या निरागस हास्याइतकं मौल्यवान, या जगात दुसरं काही नाही. निरागस आणि निष्पाप! तीच ईश्वरी अस्तित्वाची खूण! पिता ह्या नात्याने मनापासून व्यक्त केलेल्या भावना आवडल्या. आपल्या उभयतांचे अभिनंदन..! अजून आपले चिरंजीव अर्थातच खूप लहान आहेत, परंतु एक गोष्ट मात्र आत्ताच नमूद करून ठेवाविशी वाटते. ती अशी की आज एक बाप म्हणून लेकाबद्दल वाटणार्या प्रेमळ भावना जशा आपल्या मनात आहेत, तश्याच त्या आजपासून २५-३० वर्षांनतर आणि त्या पुढेही, 'तात चरण ते वंदनीय रे शत तिर्थांचे धाम...!' या स्वरुपात आपल्याबद्दल आपल्या लेकाच्या मनातही हव्यात..! तरच आपल्या पितृत्वाचं सार्थक होईल...! आमचा आणि आमच्या बापात फारसा संवाद नव्हता. उलट बाप आम्हाला मार मार मारायचाच. तरीही दोघांच्यात एकमेकांबद्दल कुठेतरी ओलावा होता. तो जरी आम्हाला झोडत असला तरी खूप जीव होता त्याचा आमच्यावर, ही गोष्ट आम्ही जाणत होतो! त्याच्या अस्थी गिरगावच्या समुद्रात टाकल्या आम्ही. तो खपला त्याला झाली आता १०-१२ वर्ष. तरी अधनंमधनं गिरगाव चौपाटीवरून जातायेता नकळतपणे हात जोडले जातात! बापाने यावं आणि दोन सणसणीत कानशिलात ठेऊन द्याव्यात असं आजही कुठेतरी वाटतं! ओलावा आजही कायम आहे...! -- तात्या अभ्यंकर.
वाचने
12095
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
सुंदर मनोगत मांडलंत तात्या!
व्वा
अनुभवावरुन
In reply to अनुभवावरुन by सहज
असाच एका
In reply to अनुभवावरुन by सहज
.
In reply to अनुभवावरुन by सहज
>>अनुभवावरु
In reply to अनुभवावरुन by सहज
बापरे! अंगा
मस्त
In reply to मस्त by विकास
असेच म्हणतो !
In reply to असेच म्हणतो ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच
In reply to हेच by प्राजु
चिरंजीव
In reply to चिरंजीव by अन्वय
अगदी
In reply to अगदी by रेवती
+१ हेच म्हणतो
In reply to चिरंजीव by अन्वय
कसलं गोड
सुरेख
तात्या खुप
तात्या खुप
छान लिहीता ..तात्या...
प्रिय, तात्या
तात्या, मना
व्वा तात्या ... मनापासूनच्या भावना आल्यात
बापाचे नाते!
In reply to बापाचे नाते! by चतुरंग
अन्वय,पुण्
पाडस
बरेच दिवसांनी लिहिले आहे
नि:शब्द!!!!!!!!!!
तात्या,
ती तात्या अभ्यंकराची भयंकर ओळ
In reply to ती तात्या अभ्यंकराची भयंकर ओळ by श्रीकृष्ण सामंत
मी
हळवेपण आणले
मनस्वी
सुरेख प्रतिक्रिया तात्या
मर्मस्पर्शी
गैरसमज दूर
In reply to गैरसमज दूर by टायगर
तारे जमींपर आठवला.