मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(ताळमेळ)

केशवसुमार · · जे न देखे रवी...

आमची प्रेरणा अदितीताईंची सुंदर कविता ताळमेळ

काव्य हे जुळे कधी कधी उगाच शब्दभेळ
हा जमायचा तुला न "केशवा" कधीच खेळ

सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरात
ही विडंबने तुझी कुणी अता न वाचतात
ऐकवे कुणा न हा तुझा टुकार वाद्यमेळ ॥

काव्य पाहता तुझे मनात जागतो छचोर
अन मनातल्या मनात हासतो मी अघोर
लोक हासता खुलून, सोडतेस ताळमेळ ॥

काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून
एकदा तुला खरेच काढणार झोडपून
ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!

--केशवसुमार
(माघ वद्य ७ शके १९२९,
२८ फेब्रु. २००८)


वाचने 6280 वाचनखूण प्रतिक्रिया 10

बेसनलाडू गुरुवार, 02/28/2008 - 12:33

आवडले.

हा जमायचा तुला न "केशवा" कधीच खेळ

ऐकवे कुणा न हा तुझा टुकार वाद्यमेळ ॥

ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!

मस्त!

(आस्वादक)बेसनलाडू

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/28/2008 - 20:43

काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून
एकदा तुला खरेच काढणार झोडपून
ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!

लई आवडले बॉ....

पुण्याचे पेशवे

चतुरंग गुरुवार, 02/28/2008 - 20:47

पण मला नेहमीची 'किक' नाही आली. (केशवा, कदाचित थोडा जेटलॅग असावा का?:))

चतुरंग

विसोबा खेचर Fri, 02/29/2008 - 07:57

काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून
एकदा तुला खरेच काढणार झोडपून
ये सुमार "केशवा" पहा तुझी भरेल वेळ !!

लय भारी रे केशवा, वरील लायनी सर्वात आवडल्या... :)

तात्या.


 

सर्किट Fri, 02/29/2008 - 12:08
भरतभूमीवर पोहोचता क्षणी दोन कवितांच्या चिंध्या करून मोकळा जाहला !!

जबरा !!

- सर्किट

वरदा Mon, 03/03/2008 - 23:38
सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरात ही विडंबने तुझी कुणी अता न वाचतात आम्ही वाचतो की...मस्तच असतात एकाहून एक छान.. काव्य फाडतोस वाट लावतोस तू टपून..... सहिच....