बॉस आज सुट्टीवरी, त्यात क्रीकेट कॉमेंट्री
भारतीय क्रिकेट चमुस हार्दिक शुभेच्छा.
=====================
ऑफिसच्या रीक्रीएशन रूममधील एका संभाव्य चित्र "रेशमाच्या रेघानी"च्या धमाल चालीवर.
(आचार्य अत्रेंच्या "झेंडूची फुले" परंपरेतील व माझ्या "एप्रिल फुले" ह्या धमाल कार्यक्रमातील एक स्वरचित ताजे विडंबन गीत)
======================
अहो येता जाता सट्टा का हो लावता,
अन क्रिकेटच्या खेळाला बट्टा का हो लावता.
बॉस आज सुट्टीवरी, त्यात क्रीकेट कॉमेंट्री
चंगळच चंगळ करूनी घ्या हो,
हात नका लावू कुणी कामाला
नवा कोरा टीव्ही लाख मोलाचा,
व्हॉल्युम तुम्ही ठेवा जरा जोराचा, हो जोराचा
नजर नका लावू कुणी, "युवराज-धोनी" जोडीला...
हात नका लावू कुणी कामाला
भीड नका ठेवू आल्या गेल्याची,
मस्त पार्टी करा आलूबोंडयाची,हो बोंडयाची
काय म्हणू बाई बाई, ह्या लोडशेडींगला
हात नका लावू कुणी कामाला.
===========
प्रा. सुरेश खेडकर
नागपूर

वाचने
4890
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
कामाला. म्ज्जा आली. झकास.
धन्यवाद. अशाच अनेक येऊद्यात. शुभेच्छा.
In reply to नाही हात लावत ....... by सुधीर कांदळकर
म्हण्तो! छान आहे विडंबन...
तात्या.
दोघाना ही धन्यवाद.
इथे अनुस्वार कसा देतात? क्रुपया सान्गा.
In reply to अनुस्वार कसा देतात? by प्रा सुरेश खेडकर
इथे अनुस्वार कसा देतात? क्रुपया सान्गा.
उदाहरणार्थ -
anaMnt = अनंत
saaMgaa = सांगा
आपला,
(मार्गदर्शक) तात्या.
सुरेख विडंबन सर.....
तुमच्याच बाजुचा
मयुर
वर्धा.
धन्यवाद विसोबा जी.
धन्यवाद मयुरजी. नागपूरला आले की जरूर भेटू.
मित्रांनो, येत्या रविवारी ( ९ मार्च ०८) ला संध्याकाळी ५ नंतर मी डोंबिविली येथे असून एक दीड तासांचा
स्वरचित विडंबन गीतांचा कार्यक्रम डोंबिविली किंवा जवळपास करू इच्छितो. एरव्ही मानधन स्विकारतो पण वेळेचा सदुपयोग करण्यासाठी एक कार्यक्रम नि:शुल्क करण्याचे योजिले आहे. निशुल्क कार्यक्रमासाठी संपर्क करा.
अधिक माहिती साठी पहा: http://www.orkut.com/Profile.aspx?uid=44441327930350077
आणि : http://www.orkut.com/Community.aspx?cmm=28868095
नाही हात लावत .......