तू येशील का रे आज?
लेखनविषय:
पेंगुळल्या आता गर्द सावल्या,
फांदीसवे रे झुकली सांज!
धुंदावल्या डोळ्यांत माझ्या,
चढली आहे कसली झांज?
अन कंटाळले रे इंद्रधनूही,
प्रिया तू येशील का रे आज?
बघ धुंद करी तो मृदगंधही,
ल्याली धरणी अवघा साज!
मिलनास तुझीया सिद्ध धरा,
तूज कसला रे चढला माज!
चल वरूणा झडकरी ये रे,
मी वाट पाहते सोडूनी लाज!
विशाल
वाचने
1501
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
हो येतो
धनुभौ