रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी
रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी यात नक्की फरक काय आहे?
तज्ञानी सल्ला द्यावा....मला यातली शून्य अक्कल आहे? उगाच हाय कम्बख्त तूने पी ही नही असे रिमार्क्स मारू नका?
वाचने
17783
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
ताडी माडी ?
फरक कशाला पाहिजे?
सर्वदेव नमस्कार: केशवंप्रति गच्छति!!
या सर्वांमध्ये ते इथाईल अल्कोहोल नांवाचे द्रव्य आहे जे नशेला कारणीभूत आहे.
बाकी सर्व नांवे त्या त्या द्रव्याच्या रॉ मटेरिअल्स प्रमाणे पडली आहेत!!
ऊस, बटाटा, गहू, द्राक्षं, काजू, मोसंबी आणि संत्री (अनुक्रमे) या सर्वांमध्ये ग्लुकोज असते जे यीस्ट वापरून अल्कोहोलमध्ये परिवर्तित करता येते. जसे यीस्ट वापरून इडलीचे किंवा पावाचे पीठ फुगवता येते त्याप्रमाणेच! जर पीठ मर्यादेबाहेर फुगू दिले तर त्यास आंबूस वास येतो, तो इथाईल अल्कोहोलचा असतो.
या द्रव्यांना दिलेला वास आणि चव ही बहुतेक वेळा कृत्रिम असते.
बर्याचे वर्षांनी आपले रसायनशास्त्राचे ज्ञान कारणी लावणारा,
पिवळा डांबिस
मी या
मी या बाबतीत अज्ञानी आहे ..पामर आहे....बालक आहे.
मि पा वर बरीच तज्ञ मंड्ली आहेत्.ती अजून काही राहिले असल्यास सान्गतीलच्.........धन्यवाद्....तुमच्या उ.सु. बद्दल
हम्म!
रम , व्होडका , व्हिस्की , स्कोच , ब्रैन्डी , फेणी ,मोसंबी ,नारंगी यात नक्की फरक काय आहे?
बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)
आपला,
(सिंगलमाल्ट परिवारातला) तात्या.
अवांतर -:)
आता मद्याचाच विषय निघाला आहे, त्या अनुषंगाने मला पुढे ढकललेल्या इपत्राने आलेले हे काही टाईमपास विनोद! :)
१)
ब्रँडी + पाणी = किडन्यांना घातक
रम + पाणी = लिव्हरला घातक
व्हिस्की + पाणी = हृदयाला घातक
जिन + पाणी = मेंदूला घातक
तेव्हा,
पाणी टाळा!!!
२)
आयुष्यात कधी ना कधी
आपण स्वत:ला
काही महत्त्वाचे प्रश्न
विचारलेच पाहिजेत...
आपण कोण आहोत?...
कोठून आलो आहोत?...
कोठे निघालो आहोत?...
आणि जेव्हा तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले
बार उघडे असतील का?!!!
३)
नेहमीच्याच बारमध्ये नेहमीच्याच मेंबरांची सपत्नीक पाटीर् ऐन रंगात आली होती. रामरावांसकट सगळ्यांनी दोन दोन क्वार्टर रिचवल्या होत्या. अचानक रामराव चित्कारले, ''मित्रहो, आपल्यापैकी जे विवाहित असतील, त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी उठावं आणि ज्या व्यक्तीमुळे त्यांच्या आयुष्याला अर्थ लाभला, ज्या व्यक्तीमुळे त्यांचं आयुष्य सुखाचं झालं,त्या व्यक्तीच्या शेजारी जाऊन उभं राहावं...''
क्षणार्धात रोज दारू र्सव्ह करणाऱ्या बगाराम वेटरशेजारी अशी काही झुंबड उडाली म्हणता!!!!
४)
तो फार सज्जन माणूस होता.
त्याने कधी सुपारीच्या खांडाचेही व्यसन केले नाही.
त्याने आयुष्यात एकही खोटा शब्द उच्चारला नाही.
त्याने परस्त्रीकडे डोळा वर करून कधीही पाहिले नाही...
... तो मरण पावला,
तेव्हा इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला...
... ते म्हणाले, 'जो जगलाच नाही, तो मेला कसा?!!!'
आपला,
(छंदिफंदी) तात्या.
In reply to अवांतर -:) by विसोबा खेचर
हा हा
बार उघडे असण्यावरून आठवलं!
बार उघडे असतील का?!!!
मागे कुठेतरी एकदा वाचलं होतं,
जर स्मशानात बार ठेवले तर काय बहार येईल! उगाच कवटी फुटेपर्यंत ताटकळत बसायला नको! दोन-दोन पेग मारुन होतील. स्मशानयात्रा ही (इतरांसाठी) आनंदयात्रा होईल!!
बार काय चालेल, काय चालेल!!! :))
लिहिण्यार्या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))
In reply to बार उघडे असण्यावरून आठवलं! by पिवळा डांबिस
लिहिण्यार
लिहिण्यार्या महाभागाचे नांव लक्षात नाही पण तो आपल्या कुळीचाच असला पाहिजे, तात्या!!! :)))
आपल्या कुळीचा?!!!!!!!!
साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)
आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे! ते देखील मोजून दोन ते अडीच पेग! तुमच्यासारखी रोजच्या रोज आपण टाकी फुल्ल करत नाही! :))
वा रे वा!! म्हणे आपल्या कुणीचा!!! ;)))
तात्या.
In reply to लिहिण्यार by विसोबा खेचर
तात्या, साल्या, हे तुला शोभत नाही!!! :))
साल्या डांबिसा, मला का उगाच खेचतोस तुम्हा बेवड्यांच्या कुळीत?:)
आता साथ सोडून लगेच संभवित होतोस काय! :))
कबिराने म्हटलं आहे,
ऐसी प्रीत न किजिये, जैसे खिरा ने कीन| (खिरा = काकडी)
बाहरसे तो मिले हुए, भीतर फांके तीन||
दुख्खी:,
पिवळा डांबिस
In reply to तात्या, साल्या, हे तुला शोभत नाही!!! :)) by पिवळा डांबिस
:)
हा हा हा! मस्त प्रतिसाद!:)
आपला,
(कबीराचे शेले विणणारा) संत तात्याराम.
In reply to लिहिण्यार by विसोबा खेचर
ठरलेला वार!
आपला तर साला बुधवार-शनिवार ठरलेला आहे!
आणि आमची फक्त शुक्रवार संध्याकाळ! म्हणजे आत्ता!! :))
आठवडाभर मेहेनत केल्यानंतर कंपनीच्या बैलाला घो! असं म्हणत आम्ही शुक्रवार संध्याकाळ साजरी करतो आणि वीकेंड आमच्या बायकापोरांत घालवायला मोकळे होतो!!!
In reply to ठरलेला वार! by पिवळा डांबिस
हेच म्हणतो ....
आत्तच आम्ही कालच्या 'अंमलातून' जागे होऊन आपल्या मिपा वर काय चल्ले आहे याची खबर घ्यायला आलो तर ही चर्चा ....
हाण तिच्यायला .....
आम्ही सध्या 'अविवाहित' असल्यामुळे तसा काही "डांबिसकाका" म्हणतात तसा 'बायका-पोरांबरोबर कार्यक्रम नसतोच ... त्यांउळे आम्ही शहरातील इतर 'प्रेक्षणिय स्थळे' पाहण्याच्या सुहेतूने शहरप्रदक्षिणा करत असतो.........
छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........
अवांतर : अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं
In reply to हेच म्हणतो .... by छोटा डॉन
धमाल्या!
अजून 'धमाल्या' आला दिसत नाही. म्हणे अजून अमलाखलीच आहे असे [थोडे थोडे ] दिसतयं
अरे, त्याचा अंमल म्हणजे इंग्रजी सत्तेच्या अंमलासारखा आहे, दीर्घकालीन!! :)
इतक्यात थोडाच उतरणार? :)))
In reply to धमाल्या! by पिवळा डांबिस
डॉन्या, डा॑बिसकाका..मी आलोsssssssss
तात्याभौ........उत्तर का टाळताय?
तात्याभौ........उत्तर का टाळताय?
अज्ञानी बालकाना असे ताटकळत थेव्हणे बरं नाय
In reply to तात्याभौ........उत्तर का टाळताय? by विजुभाऊ
स्वानुभवातून अनुभूती! :)
उत्तर टाळलंय कुठे?
बराच फरक आहे.. अनुभवांती ज्ञानप्राप्ती होईल! :)
असं उत्तर मागेच दिलं आहे! हां, आता ते ते मद्य कसं बनवतात, कशापासून बनवतात याबद्दल आपल्याला काय माहीत नाय!
आपल्याला काय, प्रत्येकाच्या चवीशी मतलब! आणि तो फरक शब्दात व्यक्त करता येत नाही, तर त्याचा अनुभव घेऊन पाहावा लागतो!
ती स्वानुभवातून येणारी अनुभूती आहे! :)**
**वरील वाक्य हे संत तात्याबा महाराजांच्या एका प्रवचनातील आहे! :)
असो..
आपला,
(जाणीवेतला-नेणीवेतला!) श्रीसंत तात्याबा महाराज.
In reply to तात्याभौ........उत्तर का टाळताय? by विजुभाऊ
अहो विजुभाऊ!
असं माझ्या आणि तात्याच्या नादी लागाल तर आम्ही दिवसभर (आमच्याकडे रात्रभर) असेच अभिप्राय देत राहू! :))
तुम्हाला ज्ञानप्राप्ती करायची असेल तर लवकर दुसरा गुरू शोधावा हे उत्तम! :))))))))
रमणींच्या
रमणींच्या लत्ताप्रहाराने अशोक व्रुक्श वॄक्ष ( हा जमले एकदाचे) फुलतो असे म्हणतात.
रम च्या लत्ताप्रहाराने कोणता वॄक्ष फुलतो
आणखी कसल्या लत्ताप्रहाराने कोणते वॄक्ष फुलतात?
In reply to रमणींच्या by विजुभाऊ
अशोक वृक्ष!!
या प्रश्नाचे उत्तर इथे येणारी ताज्या दमाची, तरूण, अविवाहित मंडळी देऊ शकतील!!!
आमचं आपलं, "पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा"
आमचा अशोकवृक्ष फुलून, पानगळ होऊन, आता वठला आहे, आलं का लक्षांत? :)))
(सरपंच बहुतेक आम्हाला 'समज' देणार या अभिप्रायाबद्द्ल!!! पण काय करणार, तुम्ही प्रश्नच तसा विचारलात!:))))
सॉरी, हो सरपंच!
दारु सोडवा......
मला मेल द्वारे आलेली एक सुंदर कविता:---
मी मेल्यावर गंध गुलाल लावुनी तिरडी माझी सजवा
मात्र त्यावर टाकावयाची फुले दारुत आधी भिजवा
माझ्या अंतयात्रेला सर्वजण शुध्दीत असावेत
मात्र चार खांदेकरी थोडेसे प्यायलेले असावेत
हे सर्व पाहुन तुम्ही म्हणाल बरं झालं बेवडा गेला
पण दारु प्यालेले म्हणतील आमचा जोडीदार गेला
असे हे जीवन .....! जगण्यापेक्षा मेलेले बरे
पण भिती वाटते मरण्याची म्हणुन थोडेसे प्यालेले बरे
(रोज दारु सोडली म्हणणारा )
मदन बाण
संध्याकाळी नसेल दारू जगू कशाला?
???????
अरेरे
In reply to अरेरे by सृष्टीलावण्या
गंमत वेगळी, अनुभव वेगळा!
In reply to अरेरे by सृष्टीलावण्या
आपला पूर्ण आदर ठेवून म्हणतो,
आपला पूर्ण आदर ठेवून म्हणते,
In reply to आपला पूर्ण आदर ठेवून म्हणते, by सृष्टीलावण्या
हा! हा!! हा!!! :)))
ह॑....
...उगाच
धर्म अफूची गोळी आहे
आता तरी फरक कळला का विजुभौ???
आता म्हणे ते घेऊन घेऊन
फरक समजला
बरेच खोदकाम केलेत राव