मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डिस्नी प्राणिसंग्रहालयास भेट

धनंजय · · जनातलं, मनातलं
मागे फ्लोरिडा येथे डिस्नीच्या प्राणिसंग्रहालयात गेलो होतो. तिथे काही चित्रे टिपली.

आधी या मुखवटा घातलेल्या पक्ष्याने माझे सशर्त स्वागत केले .
bird


हरीणदादाने माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे केले .
Deer


वाघोबांनी तर मानच फेरली.
tiger


वाघाचे सोडा, मी येताच वाघूळही झोपेचे सोंग घेते झाले.
bat


अगदी साधा भुंगाही आपल्याच नादात, मला घाबरला देखील नाही :
bee


या पिलांकडे बघून लक्षात आले, की प्राणिमात्राचे आपल्याकडे काडीमात्र लक्ष नसो,
children
स्वत्व हरवते तेव्हाच मनःपटलावर आनंदाचे बिंब तरळते.


वाचने 8676 वाचनखूण प्रतिक्रिया 17

नंदन Sat, 03/01/2008 - 06:59

छायाचित्रे मस्तच. खासकरुन शेवटचे आणि त्याखालील टिप्पणी :). हेच लॉजिक थोडं पुढे नेऊन बोरकर म्हणतात तसं -

ऐस तू खुशाल कुठेही मी तुडुंब झालो
अविश्रांत हिंडुनि अंती मी निवांत झालो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

कोलबेर Sat, 03/01/2008 - 08:46

फारच छान फोटो. हरिणदादा आणि त्याची पार्श्वभुमी मस्त जुळुन आली आहे. वाघोबाच्या फोटोतील हिरवळ छानच आली आहे. भुंग्याचा फोटो सहीच आहे, भिंग अजुन थोडे मोठे करुन पार्श्वभुमी आणखी अस्पष्ट केली असती तर अजुनच भारी झाला असता (वाघुळाच्या चित्रा सारखा!)  रंग एकदम उठून आणि छान आले आहेत!! और आने दो...

पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 10:15

हरीणदादा खरा आहे की त्याचे चित्र आहे?  चित्र असल्यासारखे वाटते...

खरा असल्यास एका ऊत्कृष्ट छायाचित्राबद्दल अभिनंदन!!

 

विसोबा खेचर Sat, 03/01/2008 - 11:23

धन्याशेठ,

अतिशय सुरेख चित्रं आणि त्यावरची टिप्पणी! मजा आली!

वाघाचं चित्र तर क्लासच!

तू देखील एवढे सुरेख फोटू काढतोस हे माहितच नव्हतं! साला मिपावर एकापेक्षा एक उत्तम फोटूग्राफर आहेत म्हणायचे! :)

तात्या.

झकासराव Sat, 03/01/2008 - 20:38
आहेत :) वाघोबा आवडले. हरिणाच्या चित्राची बॅकग्राउंड ही चित्रा सारखी वाटत आहे. ते कशामुळे??? अवांतर : तात्या मग एकसे बढकर एक अशा फोटोग्राफर लोकांसाठी तुम्ही फोटो ग्राफीचा वेगळा विभाग उघडुन द्या बरं :)

In reply to by झकासराव

धनंजय Sun, 03/02/2008 - 04:45
हरिण भित्तिचित्राच्या समोर बसले होते. भित्तिचित्राला पडलेल्या भेगा खर्‍या नाहीत! हरणे ठेवलेले कुंपण एक जंगल आहे ज्यात पडझड झालेल्या इमारती आहेत, असा आभास डिस्नी पार्कला करायचा होता. त्यामुळे ती पडझड झालेली चित्र असलेली भिंत नीट बघितल्यास तशीच "बनवली" आहे.

सृष्टीलावण्या Sun, 03/02/2008 - 09:31
पण त्यासोबतची अवतरणे त्याहून खास... अभिनन्दन... शांता शेळकेंनी आपल्या पुस्तकांत "कॅटवाईज" नावाच्या पुस्तकातील प्राण्यांचे फोटो व अवतरणांचा उल्लेख केला होता त्याची आठवण झाली. विल्बर पिपिनचे हे पुस्तक जरूर वाचा. अमेरिकेत $१.५० च्या आसपास मिळते...

चतुरंग Sun, 03/02/2008 - 11:26
हरीणदादा एखाद्या ग्रीटिंगकार्डमधल्यासारखा दिसतोय, फारच छान. चित्रांसोबतची अवतरणेही मनात घर करुन राहतात. पाण्यात खेळणारी मुले हा तर स्वर्गीय आनंदाचा ठेवाच!! चतुरंग

सुवर्णमयी Tue, 03/11/2008 - 00:36
दुसरे छायाचित्र खुलासा वाचल्यावर पटले. अन्यथा हे छायाचित्र कसे असा विचार करत होते. मस्त छायाचित्रे , आवडली. सोनाली