मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आय विश

सुवर्णमयी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तीनचाकीवर तीन वर्षाचा मुलगा मागे मी चालत चालत. रस्त्यावर दिसणारी गांडुळे पाहून 'वर्म, वर्म' मोजत होता तो. गांडूळांना वाचवण्याकरता दिली दिशा मी त्याच्या सायकलीला ..एक दोनदा त्याने कडेला दिसणारी रानटी फुले बघितली..उतरला खाली एक फूल घेऊन म्हणाला, "आय विश, आय विश माय मॉम , डॅड, ताई, आज्जी' हातात आणखी एक फूल घेऊन उतारावर सुसाट पुढे निघून गेला.. मी जाईस्तोवर एका गांडुळावर बूट ठेवून ..गेला पुढे . मी रागावले.. बोलले त्याला.. तो मागे फिरला, वाटेत अनेक मेलेली गांडुळे होती.. कधीचीच.. प्रत्येक गांडुळाजवळ जात आय विश आय विश असे फुटफुटला मला म्हणाला, ' आता सगळी उठून हलू लागतील, विगल स्वाड्ल करतील' 'आय विश'

वाचने 2306 वाचनखूण प्रतिक्रिया 9

श्रावण मोडक Tue, 06/09/2009 - 18:59
दोनदा वाचली, काय बोलावे हे सुचत नाहीये. प्रतिसाद राखीव असे तूर्त म्हणतो.

वेताळ Tue, 06/09/2009 - 19:53
पाय ठेवला त्या छोट्या मुलाने. बिचारा नंतर वरमुन गेला असेल "आय विश ... आय विश" कविता वाचल्यावर १२वीत असताना गाडुंळ व बेडकाची केलेली हत्या मला आठवली. अगांवर शहारा आला. माझी त्याची माफी मागायची राहुनच गेली. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

Nile Tue, 06/09/2009 - 20:04
ओह! मला वाटले मुलगा म्हणाला: आय विश "आय" न्यु व्हॉट आय विश! ;)

विसोबा खेचर Wed, 06/10/2009 - 08:08
ईऽऽऽऽ!! गांडुळांची कायच्याबाय कविता! जाम समजली नाही! अगं सोनाली, तू अश्या चमत्कारिक कविता केव्हापासून करायला लागलीस?! :) बाकी काय? मजेत ना? आज बर्‍याच दिवसांनी मिपावर? तिकडची सर्व मंडळी ठीक?! :) तात्या.