पाहायचं आहे
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पाहायचं आहे हळूच तुला
माझी वाट पाहताना
डोळ्यांची माझ्या वाटेवर
अधीर नजर रेंगाळताना
पहायचं आहे हळूच तुला
माझ्या आठवणीत रमताना
आठवण काढत काढत
तु गालात लाजताना
पहायचं आहे हळूच तुला
माझ्यासाठी अश्रू ढाळताना
काळजातले अश्रू ढाळत
वाहणारे प्रेम पाहताना
पहायचं आहे हळूच तुला
मी स्वप्नात येताना
स्वप्न पाहत पाहत
गोड भाव फुलताना.
वाचने
2647
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
काळजातले अश्रू ढाळत
वाहणारे प्रेम पाहताना
.. ह्या ओळी फार आवडल्या.
सगळीच कविता सुंदर आहे,,,पण
पहायचं आहे हळूच तुला
मी स्वप्नात येताना
स्वप्न पाहत पाहत
गोड भाव फुलताना.
हे एकदम लयं भारी वाटल... :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
सुंदर ! हळुवार कविता !!
सहज, सुंदर कविता! खूप आवडली.
:) क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा
In reply to मस्त! by क्रान्ति
पाहायचं आहे हळूच तुला
माझी वाट पाहताना
डोळ्यांची माझ्या वाटेवर
अधीर नजर रेंगाळताना
मस्तच!
सहज, सुंदर कविता! आवडली.
कविता आवडली.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
दत्ता, मदनबाण, चंद्रशेखर, क्रांती, सँडी, प्रमोदकाका तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद.
हळुवार प्रेमकाव्य..
सुरेख. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
कविता वाचुन एकदम जगजीत ची "कभी यु भी तो हो" गजल आठ्वली..
कविता आवडली