नारळीपाकाचे लाडू
साहित्य: पाव किलो जाड रवा, सव्वा मोठी वाटी नारळाचा चव, पाव किलो साखर, अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी साजूक तूप,
पाव वाटी दूध, पाच वेलदोड्यांची पूड, आवडत असल्यास बेदाणे दीड ते दोन टेबलस्पून, साखरेच्या निम्मे पाणी.
कृती: रवा गुलाबी रंगावर तूप घालून भाजावा. पाव वाटी दूध शिंपडून पुन्हा भाजावा.
आता नारळाचा सव्वा वाटी चव घालून भाजण्यास सुरुवात करावी. रवा फुलू लागेल व कोरडाही होऊ लागेल
त्यावेळी परातीत हे मिश्रण काढून घ्यावे. त्याच कढई किंवा पातेल्यात आता पाक करण्यास ठेवायचा आहे.
मापाचे पाणी व साखर एकत्र करून मध्यम आचेवर ठेवावे. सतत ढवळत रहावे.
दीडतारी पाक करावा, त्यात वेलदोडापूड, बेदाणे घालून नंतर रवा व नारळाचे मिश्रण घालावे.
व्यवस्थित ढवळून झाकून ठेवावे. एक तासाने पुन्हा ढवळून बघावे, मिश्रण आळायला सुरुवात झालेली असेल.
साधारण चार तासाने लाडू वळावेत.
लाडू लवकर तयार हवे असतील तर दोनतारी पाक करावा त्यामुळे दोनेक तासातच लाडू वळता येतात.
रव्याचा लाडू खरखरीत व किंचित बसका हवा. त्यासाठी रवा जाडसर वापरावा.
वरील साहित्यामध्ये बेताच्या आकाराचे सोळा लाडू झाले.
ही पाककृती सौ. आई, सौ. सासूबाई यांच्या अनुभवातून मिळालेले सल्ले व माझ्याकडील पुस्तकातील कृती यावर आधारित आहे.
रेवती
रेवती
वाचने
17233
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
हा हंत हंत!!!
मस्त
मस्त
वा! मस्त
काय फोटो
फोटू जबराच
छानच
व्वा...ताई
मस्त!
राग आला
In reply to राग आला by अविनाशकुलकर्णी
स्प्लेंडा घालून करा..
मस्तच!!!!!!!!!!!!!
वा वा!
लाडू मस्तच
समिधा,
ओके ,
छानच!!
मस्त पाकृ
अरेरे काल
वॉव..
वाह वाह
फोटो आणि
!!!
सर्व
वॉव!
In reply to वॉव! by स्मिता.
पाव किलो म्हणजे माझ्याकडच्या
ह्याचं पार्सल कधी मिळणार???
In reply to ह्याचं पार्सल कधी मिळणार??? by प्रभो
गप्प बैस. मोठ्या विकांतला वाट
रेवतीआज्जी लाडू छानच हो !!
हे बघा करुन पाह्यले.