हे कवितांचे मंचीय अविष्कार करायची फ़ॆशन कधीपासून आलीय बुवा?
पावसाच्या कविता, निसर्गाच्या कविता, झाडांच्या कविता...
वैताग साला..
(आधीच सुमार निसर्गकविता माझ्या डोक्यात जातात.. त्यात सूर्य, चंद्र,पाऊस,आभाळ असे शक्य तितके हावभाव करत गिटारच्या झिन्गझिन्ग झिन्गझिन्ग ठेक्यावर कोणी कविता उभं राहून गायला लागलं तर काय होईल?... आमच्या प्राथमिक शाळेत एक बाई कायम अशा प्रकारच्या कविता घेऊन नृत्य बसवायच्या...
हिरवे हिरवे गार गालिचे( हिरव्या फ़्रॊकमधल्या दहा मुली या विन्गेतून त्या विन्गेत पळाल्या ) हरित तृणांच्या ( पाच बोटं एकत्र करून आकाशाकडे दाखवत उघडमीट करणारी चार पोरं .. ही म्हणे गवताची ऎक्शन) मखमालीचे ( हात आडवे करून पंजे वरतीखालती)...तिसरीतही हे नृत्य माझ्या डोक्यात जात असे)....
जगात संदीप खरे अजिबात न आवडणारे पुष्कळ आहेत हे माहित आहे.. मी त्यातला नाही हेही आग्रहाने नमूद करतो... ( आयुष्यावर बोलू काही आणि नामंजूर मधली काही गाणी मला आवडली होती ... आयुष्यावर.. चा कार्यक्रमही छान होतो असे माझे मत)
जालावर कोल्हापुरी दादांकडून दुवा मिळाला आणि " केव्हातरी वेड्यागत .." या कवितेचा लाडालाडा मंचीय अविष्कार पाहून स्वत:चा अगदी वैतागसम्राट झाला....
http://www.youtube.com/watch?v=YG15gntAfB4
अर्थात बहुसंख्य लोकांना हा कार्यक्रम आवडतो असे दिसते..( पहा कोदांचा दुवा)
आता हे गाणं बोलगाणी वगैरे काय म्हणतात त्या पद्धतीचे आहे... तोंडाला कॊर्डलेस माईक लावून कवी आणि दोन अभिनेत्री ही कविता सादर करतात...
या दोघी अभिनेत्री चांगल्याच आहेत..
पण प्रत्येक ओळीनंतर करायला काही नसल्याने विचित्र पद्धतीने पायाने ठेका देत किंवा डोलत राहायचे... मध्येच ठराविक दाद द्यायची.. आहाहा, किंवा येस...किंवा वावा... आणि गिटारच्या पुढच्या तुकड्याची वाट पाहत डोलत तरी बसायचे किंवा शून्यात नजर लावून बसायचे... ( भावसमाधी बरं ही बेमट्या)
काय विचित्र प्रकार...
ती शेवटची विंगेत धावायची ऎक्शन तर अहाहा...
त्यात कवी मध्येच जिन्यावर जाणार, या दिव्यात उभा राहणार, या गोलात उभा राहणार.. हळूच तिच्या खांद्याला स्पर्श करणार मग ती दचकणार... मग तो शाहरुख खानसारखं तिच्याकडे बघणार..
मग गंभीर होऊन पुढची ओळ म्हणणार...
फ़ार कृत्रिम आणि खोटंखोटं वाटतं... किंवा शाळकरी ...
कॊलेजच्या हॊस्टेलात त्या कळातल्या लोकप्रिय चारोळ्या घेऊन त्यांचा (रूममध्येच कंपूतल्या कंपूत द्व्यर्थी वगैरे ) मंचीय अविष्कार करण्यात धमाल येत असे त्याची या निमित्ताने आठवण आली.
संदीप खरे जेव्हा छान भारतीय बैठकीवर बसून कविता गातात तेव्हा फ़ॊर्मात आल्यासारखे वाटतात, कम्फ़र्टेबल एकदम.. अगदी स्वत:च्या एरियात असल्यासारखे... पण इथे एक अवघडलेपण आहे असे वाटते... "चल, रॊकस्टारची ऎक्टिंग कर बघू" अशी कोणी सक्ती केल्यासारखे वाटते...
वेड लागलंय या गाण्यावर कुठल्याशा विडियोमध्ये खरे आणि कुलकर्णी काळे कपडे घालून अचाट नाचताना दिसतात... तेव्हा "का? का?" असं विचारावंसं वाटलं... तेच हा कवितांचा मंचीय अविष्कार पाहताना झालं...
जालावर ही कविता पाहिल्यानंतर तरी हा कार्यक्रम बघू नये असंच वाटतंय..
कोणी हा कार्यक्रम पाहिलाय का?
वाचने
19086
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
मास्तर
मास्तर, निर
वा! मस्त
रोचक
ह्या कार्यक्रमाचे नाव दोन बायका फजिती ऐका असे आहे का?
In reply to रोचक by मुक्तसुनीत
"अजून एक"
In reply to ह्या कार्यक्रमाचे नाव दोन बायका फजिती ऐका असे आहे का? by भडकमकर मास्तर
भारी!
चला
जामच नाटकी वाटले!
हा हा हा
कृत्रिम!!!
मास्तर, 'कध
+१
In reply to मास्तर, 'कध by विसोबा खेचर
टर?
In reply to +१ by अंगद
असु
In reply to टर? by बिपिन कार्यकर्ते
चालायचंच...
In reply to +१ by अंगद
आणि
In reply to चालायचंच... by भडकमकर मास्तर
तरल
कधितरी वेड्यागत बाबत
बाकी
In reply to कधितरी वेड्यागत बाबत by विनायक पाचलग
मला तर
सादरीकरणाचा प्रयोग
पण कविता
In reply to सादरीकरणाचा प्रयोग by धनंजय
कविता ऐकणं
In reply to पण कविता by प्राजु
नाही
In reply to कविता ऐकणं by भडकमकर मास्तर
मस्त !
मला अजूनही
न आवडलेला प्रयोग
गणा मास्तर या लिन्कसाठी धन्यवाद...
In reply to न आवडलेला प्रयोग by गणा मास्तर
भलते
In reply to न आवडलेला प्रयोग by गणा मास्तर
मास्तर,
कविता
हाहाहा!
In reply to कविता by परिकथेतील राजकुमार
नसतेस घरी तु जेव्हा
३ ०५ साठी
In reply to नसतेस घरी तु जेव्हा by टिउ
+१
In reply to ३ ०५ साठी by भडकमकर मास्तर
(विषय दिलेला नाही)
In reply to नसतेस घरी तु जेव्हा by टिउ
जबरदस्त
In reply to (विषय दिलेला नाही) by भाग्यश्री