निशब्द - भाग १
माझा एक प्रयत्न.
तो: अगं मी सहज काढला होता चिमटा.
ती: सहज? रात्रभर हात दुखलाय माझा!
तो: बरंsss! सॉरी बाई!
ती: का छ्ळतोस?
तो: छ्ळतो?
ती: ....
तो: चल कॉफी पिऊ...
ती: नको.
तो: (हात धरुन) चल, तुला बरं वाटेल..
ती: (डोळे मिटलेले)....
तो: काय झालं? किती राग?
ती: ....
तो: आता डोळ्यात पाणी कशाला?
ती: ....
तो: मनमोकळं कधी बोलणार तु?
ती: ....
तो: काय झालं?
ती: वेदना हाताला झाल्या असत्या तर ठीक होतं!
तो: थोडं स्पष्ट बोलशील तर बरं होईल.
ती: तुला समजतयं सगळं!
तो: असं काही नाही!
ती: हात अजुन तुझ्याच हातात आहे!
तो: (हात सोडुन)....सॉरी!
ती: कशामुळे?
तो: कळलेच नाही!
ती: मलाही.
तो: तुला काय म्हणायचं?
ती: जे तुला वाटतयं!
तो: (हसत)घरच्यांना आपल्या मैत्रीचा खुपच अभिमान आहे नाही?
ती: मलाही.
तो: ह्म्म्म!
ती: तु बरोबर असला की आईबाबांना काळजी नसते.
तो: त्यांचं मोठेपण...
ती: नाही! विश्वास.
तो: ....
ती: तुला आठ्वतं, कॉलेजच्या ट्रीप्स?
तो: हो.
ती: तु आहेस बरोबर म्हटले की सगळ्यांना घरुन लगेच परवानगी.
तो: ....
ती: आता इकडे असुनही आईबाबांना कसलीच काळजी नाही.
तो: ह्म्म्म!
ती: का करतोस इतकं?
तो: आता भिती वाटतेयं!
ती: तुला आणि भिती! कसली?
तो: त्यांच्या विश्वासाची.
ती: जगाची?
तो: शक्य नाही.
ती: तु कधी कुणाचं वाईट नाही करणार याची खात्री आहे.
तो: तेच तर!
ती: तु नको जास्त विचार करु...सगळं ठीक होईल.
तो: असं आपल्याला वाटतं.
ती: सगळे नक्की समजुन घेतील आपल्याला.
तो: ह्म्म! आपली माणसं महत्वाची.
ती: मी बाबांशी बोलु का?
.........................
क्रमशः
वाचने
1942
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
चिमटा
ह्म्म पुढे काय ?
सुरवात
चांगली
नक्की काय?
मस्त