मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कन्नमवार नगर (विक्रोळी ,पुर्व) मुंबई

विकि · · काथ्याकूट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कनमवार नगर, विक्रोळी येथील सभेत उत्तर भारतीयांविरोधात जे विधान केले . व त्यांची अटक आणि सुटका तेथील न्यायालयात झाली . त्यामुळे अचानक कन्नमवार नगर चे नाव सगळीकडे झाले. तर अशा कन्नमवार नगर ,विक्रोळी येथील भागाविषयी आम्हाला मिळालेली माहीती. मध्य रेल्वेच्या विक्रोळी (पुर्व )या उपनगरापासून अवघ्या १५ मिनिटांवर कन्नमवार नगर आहे. महापालीकेच्या 'एस ' विभागात हा प्रभाग येतो. प्रभागाचा क्रमांक आहे ११२.साधारण ६० ,७० च्या दशकात वसलेली अशी ही म्हाडाची वसाहत . या वसाहतीने आशिया खंडातील सर्वात मोठी म्हाडाची आदर्श वसाहत म्हणुन नाव मिळवलेले आहे. एकुण २६५ इमारती ,प्रत्येक इमारतीला स्वतंत्र नंबर, एक कामगार कल्यांण मंडळ, महानगर पालिकेचे क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय, विकास हायस्कूल शाळा समुह, मुलिंचे अस्मिता महाविधालय, पोलीस स्टेशन ,बस इ. सेवा या विभागात येतात. एक अस्सल मराठमोळी मध्यमवर्गी वसाहत म्हणजेच कन्नमवारनगर असे आपण म्हणू शकतो. खेळाचे गोलाकार असे छत्रपती संभाजी मैदान हे तर येथील वैशिष्ट्ये आहे. तेथील कट्टे व म्युझिकल जॉगिंग ट्रॅक सकाळी (पहाटे पासूनच आणि संध्याकाळी हाऊसफुल असतात. वृध्द मंडळीचे प्रभात मित्र मंडळ तर तेथे प्रसिध्द आहे. अजुन खेळाचे मैदान म्हणजे हुतात्मा रविंद्र म्हात्रे मैदान तेथील उत्कर्ष व्यायामशाळा दहीहंडी, शरीरसौष्ठव स्पर्धा ,उत्कर्ष व्याख्यानमाला या करीता प्रसिध्द आहे. या विभागात बस क्रं ३९४,३९७ (कन्नमवार नगर ते विक्रोळी स्टेशन(पुर्व), ३५४ (कन्नमवार नगर ते शिवाजी पार्क), ३८८ (कन्नमवार नगर ते पोयसर आगार), १८५ (कन्नमवार नगर ते मजास आगार) या शिवाय पुर्वद्रुतगती मार्गावरून ३६८ (शिवडी,मुलुंड(पुर्व)),३७३(वांद्रे स्टेशन (प) ते वैशाली नगर (मुलुंड,प.),३५३ (वडाळा आगार,टागोर नगर ५ ) या बेस्टच्या बससेवा उअपलब्ध आहेत. या विभागात अजिबात रहदारी नाही. सर्वत्र हिरवीगार झाडे नजरेस पडतात. या विभागाला लागूनच पुर्वद्रुतगती मार्ग आहे. येथे फक्त राहण्यासाठीच वसाहत आहे . व्यापारी संकुल् नाहीत. लोकशाहीर विठ्ठल उमप,संगितकार विठ्ठल शिंदे, माजी महापौर दत्ता दळवी, नाट्यनिर्माते दिग्ददर्शक जनार्दन लवंगारे, खासदार एकनाथ गायकवाड, जेष्ठ पत्रकार काकासाहेब पुरंदरे, प.म. राऊत सर(मुख्याधापक विकास हायस्कूल शाळा समुह),साहित्यीक वामनराव होवाळ, इत्यादी मान्यवर व्यक्ती येथे राहतात. सर्वात आधी काँग्रेसचा बालेकिल्ला हा विभाग होता. अलकाताई देसाई नगतसेवक म्हणुन सतत येथून निवडून येत होत्या. अचानक वारे पालटले (साधारण ९० च्या दशकात)आणि शिवसेनचा बालेकील्ला म्हणुन कन्नमवारनगर नावारुपाला आले त्यामुळे नगरसेवक दत्त्ता दळवी यांना महापौर पदाचा मान मिळाला. पण मागिल मनपा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंगेश सांगळे येथुन विजयी झाले. आता हा विभाग मनसेचा बालेकिल्ला होण्याच्या मार्गावर आहे. पण या म्हाडावसाहतीत पुर्नविकासाचे वारे वाहू लागले आणि येथील वातावरण पलटत आहे. एक अस्सल मराठमोळी वसाहत नष्ट होणार की काय अशी भिती वाटायला लागलेली आहे. विकासक येथे येत आहेत आणि येथील रहीवाशांना उंच ,उंच टॉवर ची स्वप्न दाखवत आहेत. काही स्थानिक माणसेही या विकासकांना सामिल आहेत. त्यामुळे काय होणार या नगराचे ही चिंता लागुन राहीली आहे .आतापर्यंत येथील ५ इमारती विकासकाच्या(बिल्डर हो) ताब्यात गेल्या आहेत. आपण एकदा याच कन्नमवार नगर पाहून आपला कॉ.विकि

वाचने 8480 वाचनखूण प्रतिक्रिया 13

विकास Sun, 02/24/2008 - 19:08

आपण एकदा याच कन्नमवार नगर पाहून आपला कॉ.विकि

मी पाहीले आहे आणि तेथील लोकांचे आदरातिथ्यही अनुभवले आहे.  ते (चांगल्या अर्थाने) बदलू  नये असे वाटते.

विकि Sun, 02/24/2008 - 19:14

आपण कश्याप्रकारे आदरातिथ्य अनुभवले तेही लिहीले असते तर बरे झाले असते.

आपला

कॉ.विकि

धोंडोपंत Sun, 02/24/2008 - 19:57

आम्हीही कन्नमवार नगरातील लोकांचे आदरातिथ्य अनुभवले आहे, अनुभवतो.

आमचे कांबळे, गायकवाड, इलपाटे  असे काही खास स्नेही तिथे राहतात ज्यांच्या घरांचे दरवाजे आमच्यासाठी आणि आमच्या घराचे त्यांच्यासाठी सदैव उघडे आहेत.

६ डिसेंबर रोजी ही मंडळी चैत्यभूमीवर दर्शनासाठी येतात तेव्हा त्यांचे वास्तव्य शिवाजी पार्कला आमच्याकडे असते.

आम्ही कधीही दादर ठाणे मार्गावरून जातांना विक्रोळीला कन्नमवार नगरातून या मंडळींना भेटून पुढे जातो.

आपला,
(जगमित्र) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मनस्वी Mon, 02/25/2008 - 11:37

कन्नमवारकर,

विकासकांच्या (बिल्डरांच्या) मोठ्या मोठ्या स्वप्नांना भूलू नका!

(मनापासून) मनस्वी

विकि Tue, 02/26/2008 - 19:51

६ डिसेंबर चा उल्लेख आपण का केलात ते कळले नाही. दादर आणि कन्नमवार नगर फार लांब नाही .मुंबईतल्या मुंबईतच आहे.

बाकी आपला प्रतिसाद खुप आवडला.

आपला

कॉ.विकि


 

सुधीर कांदळकर Tue, 02/26/2008 - 22:07
धार्जिणी म्हणतात ते खरेच आहे. स्थानिक लोकच चांगल्या प्रतिनिधींना विरोध करून अयोग्य लोकांना प्रतिनिधि करतात व ते अशा प्रकल्पात क्षुल्लक वैयक्तिक लाभासाठी संबंधित नागरिकांचे वाटोळे करतात.

विकास Tue, 02/26/2008 - 22:28

हे सर्व वाचताना मला बॉस्टनमधे एक ज्यू लोकांवर नाझींनी केलेल्या जर्मनीतील अत्याचारांवर होलोकॉस्ट मेमोरीयल आहे त्याच्यावर वाचलेल्या वाक्याची आठवण झाली:

First They Came for the Jews

First they came for the Jews
and I did not speak out
because I was not a Jew.
Then they came for the Communists
and I did not speak out
because I was not a Communist.
Then they came for the trade unionists
and I did not speak out
because I was not a trade unionist.
Then they came for me
and there was no one left
to speak out for me.

Pastor Martin Niemöller

मराठी माणूस मुंबईतून हटवला जात आहे ती लढाई कन्नमवार नगर ला येई पर्यंत आपल्याला त्याचे महत्व वाटले होते का? आज आपले तेच होत आहे असे वाटत नाही का? केवळ मुंबईतील मराठी म्हणून नाही तर सर्वच बाबतीत - कधी मराठी म्हणून, कधी मध्यमवर्गीय म्हणून, कधी हिंदू ,निधर्मी - निव्वळ भारतीय नागरीक म्हणून, कधी विद्यार्थी म्हणून तर कधी शिक्षक, शेतकरी इत्यादी म्हणून.

पण सर्वच म्हणणार मला काय त्याचे? थोडक्यात पुढ्च्यास ठेच लागली तरी मागचा शहाणा होत नाही कारण तो आंधळा असतो म्हणून नाही तर डोळेझाक केलेली असते म्हणून....

व.पु. काळ्यांनी कुठेतरी म्हणले होते की, "आपण तीन शब्दांसाठी जगतो - लोक काय म्हणतील?" मला वाटते तसेच  जेंव्हा सामाजीक प्रश्न सोडवायची वेळ येते तेंव्हा आपण तीनच शब्द जगतो, "मला काय त्याचे?"

 

In reply to by विकास

विकि Wed, 02/27/2008 - 23:04

मराठी माणूस मुंबईतून हटवला जात आहे ती लढाई कन्नमवार नगर ला येई पर्यंत आपल्याला त्याचे महत्व वाटले होते का? आज आपले तेच होत आहे असे वाटत नाहीमराठी माणूस मुंबईतून हटवला जात आहे मुंबईत परप्रांतीय वाढत आहेत हे मी मनोगत ,उपक्रम आणि आता मिसळपाववर सातत्याने मांडत आहेत.पण आपण करणार काय .केवळ भ्रष्टाचारामुळेच असे होत आहे.तुम्हीच पहा ना राज्य मराठी,भाषा मराठी,माणसे मराठी,राज्यकर्ते मराठी ,पोलीस मराठी,म्युनसीपालटीचा कारभार मराठी तरीही मुंबईत मराठी माणूस कमी होत आहे.काय करणार आपण.

कन्नमवार नगराविषयी म्हणत असाल तर ती म्हाडाची वसाहत आहे म्हाडा अधिकार्‍यांनी जर मनावर घेतले तर ते स्वतःच या नगराचा विकास करू शकतात पण................

आपला

कॉ.विकि

In reply to by विकास

विकि Wed, 02/27/2008 - 23:09

मराठी माणूस मुंबईतून हटवला जात आहे ती लढाई कन्नमवार नगर ला येई पर्यंत आपल्याला त्याचे महत्व वाटले होते का? आज आपले तेच होत आहे असे वाटत नाही का?

मराठी माणूस मुंबईतून हटवला जात आहे मुंबईत परप्रांतीय वाढत आहेत हे मी मनोगत ,उपक्रम आणि आता मिसळपाववर सातत्याने मांडत आहेत.पण आपण करणार काय .केवळ भ्रष्टाचारामुळेच असे होत आहे.तुम्हीच पहा ना राज्य मराठी,भाषा मराठी,माणसे मराठी,राज्यकर्ते मराठी ,पोलीस मराठी,म्युनसीपालटीचा कारभार मराठी तरीही मुंबईत मराठी माणूस कमी होत आहे.काय करणार आपण.

कन्नमवार नगराविषयी म्हणत असाल तर ती म्हाडाची वसाहत आहे म्हाडा अधिकार्‍यांनी जर मनावर घेतले तर ते स्वतःच या नगराचा विकास करू शकतात पण................

आपला

कॉ.विकि

चित्रा Wed, 02/27/2008 - 01:37
विकासक येथे येत आहेत आणि येथील रहीवाशांना उंच ,उंच टॉवर ची स्वप्न दाखवत आहेत. काही स्थानिक माणसेही या विकासकांना सामिल आहेत. त्यामुळे काय होणार या नगराचे ही चिंता लागुन राहीली आहे .आतापर्यंत येथील ५ इमारती विकासकाच्या(बिल्डर हो) ताब्यात गेल्या आहेत.

 तुम्ही लेख तळमळीने लिहीला आहे - समजते.   माझी सहानुभूती आहेच.  पण मुंबई काय, पुण्याच्या सदाशिव पेठेत ३० मजली टॉवर उभे राहिले तरी मला आश्चर्य वाटणार नाही.  जेव्हा जमिनी शिल्ल्लक उरत नाहीत, किंवा लोकांना कामाच्या ठिकाणाहून लांब जायचे नसते तेव्हा हे असे होणारच.   पण राहत्या जागांचे टॉवर झाले तर पाणी, प्रकाश, वगैरे यांची काय अवस्था होईल याचा विचारही केलेला नसतो.   यावर माझे एक निरीक्षण की काही स्थानिक मंडळींना टॉवर झाले की सुधारणा झाल्या असे वाटते.  रस्ते रूंद झाले म्हणून ठाण्यातील कित्येक लोकांनी मला गोडवे गाऊन सांगितले.  आज ठाण्याचे पूर्वीचे रूप राहिले नाही ही वस्तुस्थिती आहे.    यात नुसते रूप बदलले म्हणून तळतळाट करण्याचे कारण नाही, पण ते जेव्हा बकाल होत जाते, आणि रूपहीन, कळाहीन होते,   तसेच पाणी, वीज, प्रकाश यासारख्या गोष्टीं मिळत नाहीत, तेव्हा काय?.  पण हे विचारात घेतले जात नाही.  
यावर अजूनही लिहीता येईल पण शेवटी  लोकांच्या बळकट इच्छेसमोर अगतिक व्हायला होते.  शेवटी हा निर्णय स्थानिक रहिवाशांचा आहे याप्रत मी येते. आपल्याला तो बदलता येत असल्यास बदलावा नाहीतर निदान एकत्र येऊन जास्तीत जास्त
हवा,नागरी सुविधा पदरी पाडून घ्याव्यात - पाणी, सूर्यप्रकाश, खेळती हवा,मोकळी मैदाने, शाळा, नाट्यगृहे, पार्किंग इत्यादी.  - नुसतेच इमारतींखालचे पोहण्याचे पूल, ट्रॅक्स नव्हे).   माझ्या माहितीप्रमाणे हे बरेचसे मुद्दे जुन्या इमारतींची डागडुजी नीट होत नाही (सरकारकडून) यामुद्द्यावर सुरू झाले आहेत.   कन्नमवार नगर सध्या "self-development" चे मॉडेल वापरण्याच्या विचारात आहे  असे कळते,     चंद्रशेखर प्रभू यांच्या या लेखातून .  हा लेख वाचून तर वाटते की अशाने सर्व आबादीआबाद होणार आहे.  तसेच मला यात नक्की प्रभूंचा काय संबंध ते कळले नाही.  तसेच मध्यंतरी आयुक्त टी. चंद्रशेखर म्हाडातून बाहेर पडले का पडणार असे ऐकले होते,   त्यांचे या विषयी मत काय होते माहिती आहे का?