मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खेड्यातला आणि शहरी मुलगा

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
खेड्यातला आणि शहरी मुलगा असशील बघत टिव्ही जरी तू विटीदांडू कधी खेळलास काय? खेळलास काय? नाय रे नाय, नाय रे नाय खॉत असशील ऑईस्क्रीम तू बांधॉवरची बोरं तू खॉल्लीस कॉय? खॉल्लीस कॉय? नाय बॉ नाय नाय बॉ नाय खेळत असशील बुध्दिबळ तू कब्बड्डी कधी खेळलास काय? नाय रे नाय, नाय रे नाय येत असशील कराटे तूला तरी कुस्ती माझ्याशी खेळतोस काय? नाय रे नाय, नाय रे नाय असशील स्विमींग करत जरी नदीच्या डोहात डुंबला काय? नाय रे नाय, नाय रे नाय खातो आंबे मंडईतले जरी चोरून जांभळे पाडली काय? नाय रे नाय, नाय रे नाय पितोस दुध पिशवीतले त्याला ताज्या दुधाची चव काय? नाय रे नाय, नाय रे नाय दिमाख दाखवतोस शहराचा मोठा खेड्यात एकदा राहतोस काय? नाय रे नाय, नाय रे नाय - पाषाणभेद

वाचने 4598 वाचनखूण प्रतिक्रिया 22

लिखाळ गुरुवार, 05/21/2009 - 22:58
वा ! कविता छान आहे.. आवडली. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

भडकमकर मास्तर गुरुवार, 05/21/2009 - 23:50
पाषाणभेदा, कवितेचा फॉर्म आवडला.. कन्टेन्टशी अजिबात सहमत नाही... शहरात राहूनही मी सर्व गोष्टी केल्या...( विटीदांडू, कबड्डी, कुस्ती, बोरे,नदी, जांभळे इ.इ.)... शहरात पुष्कळ त्रास असला तरी खेड्यात त्यापेक्षा जास्त त्रास आहेत... हे सारे सुट्टीला चार दिवस राहून एन्जॉय करायला ठीक... ;) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

मदनबाण Fri, 05/22/2009 - 08:58
असशील स्विमींग करत जरी नदीच्या डोहात डुंबला काय? पाषाणराव आपली कविता तर आवडलीच पण या ओळी फार आवडल्या... :) (नदीत मनसोक्त डुंबणारा) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

मराठमोळा Fri, 05/22/2009 - 09:28
मस्तच रे :) येऊ द्या अजुन. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!