मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दोन दिग्गज

बहुगुणी · · कलादालन
चेहेर्‍यांत साम्य आहे, की कल्पनाविलास?
लेखनविषय:

वाचने 4037 वाचनखूण प्रतिक्रिया 14

मुक्तसुनीत Wed, 05/20/2009 - 08:44
पंडीतजींचा फोटो म्हणजे "म्हंमदशा रंगिले.." गातानाचा क्यापचर आहे काय ? त्यातल्या ताना म्हणजे एका ओव्हर मधे सहा सिक्सर आहेत राव !

In reply to by मुक्तसुनीत

बहुगुणी Wed, 05/20/2009 - 08:58
.... त्याच व्हिडिओ क्लिप मधली एक फ्रेम ग्रॅब केली. आणि त्या ताना म्हणजे खरंच ३६/ओव्हर आहेत, हातवार्‍यांसकट! आणि तो आवेश पाहूनच मला सचिन डोक्यात आला, तेंव्हा त्या दुव्याबद्दल तात्यांचे आभारच.

In reply to by बहुगुणी

चतुरंग Wed, 05/20/2009 - 18:09
एकेक ताना म्हणजे मला शिवथरघळीवरचा धबधबा आठवतो! सतत गर्जणारा, घनगंभीर नादाने सगळे आसमंत भारून टाकणारा! स्वर असे हात जोडून पुढे उभे आहेत आणि भीमण्णा एकेका तानेसरशी पाहिजे त्याला पुढे बोलावून, हवे तसे फिरवून पुन्हा सोडून देताहेत असे वाटत रहाते. :) अगदी रंगात आलेल्या सचिनची लीलया चाललेली फटकेबाजी असतेना तसेच. तो हाफवॉलीला पण मारतो आणि अचूक यॉर्करला सुद्धा तडकावतो! चतुरंग

In reply to by विकास

बहुगुणी Wed, 05/20/2009 - 09:08
भीमसेनांची भावमुद्रा त्या (वर उल्लेखलेल्या) व्हिडिओ क्लिप मधील १:३४ या वेळची आहे, आणि सचिन चा फोटो या फोटो गॅलरीतला. दोन्ही फोटो फक्त crop केलेले आहेत साम्य दाखवण्यासाठी.

मिसळभोक्ता गुरुवार, 05/21/2009 - 22:54
आण्णांचा कलकत्त्याला सत्कार होता. तेथे हॉटेल वर भेटायला सचिन आला होता. त्याला अण्णांनी विचारले, सचिन, आमचा भाऊ कसा खेळतो. तुमचा भाऊ ? सचिन गोंधळला. हो, सुनील जोशी हा माझा चुलतभाऊ आहे -- अण्णा. त्यावर सचिन काय बोलणार बिचारा ? -- मिसळभोक्ता