दही बटर
घट्ट दही प्रथम थोडेसे पाणी घालून नीट घुसळून घ्यावे. त्यात रुचीप्रमाणे साखर, मीठ, लाल तिखट चूर्ण, भाजलेले जिरे-धणे यांची भुकटी, चाट मसाला घालावे. पुन्हा थोडे एकजीव करावे.
मग कोमटपेक्षा थोडे गरम पाणी करावे, वाडग्यात घ्यावे आणि बटर (खारी बिस्किट कुटुंबातले) एकावेळी २-३ त्या कोमट पाण्यात तळाकडच्या बाजूला बुडवावेत. तो भाग किंचित् मऊ झाला असे वाटले की बटर पालथे करून शिखराचा भागसुद्धा मऊ करून घ्यावा.
दोन्ही भाग पुरेसे मऊ झाले वाटले की एक एक बटर दोन हातांच्या तळव्यात चेपून दह्यात घालावा. मराठमोळे दहीवडे तयार. सर्व साहित्य असेल तर हा पदार्थ सातव्या मिनिटाला तयार.
वि. सू. : १) बटर शक्यतो मध्यम आकाराचे चांगल्या प्रतिचे असावेत (जिरे बटर). २) पाणी जास्त गरम असले तर हात भाजतो आणि कमी गरम असेल तर ४-५ बटर मऊ होईपर्यंत थंड होते. ३) पहिला प्रयत्न मनाजोगा झाला नाही तर नाउमेद होऊ नये. २ र्या -३ र्या वेळेपासून सर्व नीट जमून येते. ४) लहान मुलांना आवडते. पण बरेचदा करू नये कारण बटर मैद्यापासून बनविलेले असतात. मजा म्हणून महिन्यातून १-२ वेळा हरकत नाही. ५) पाहुण्यांना देताना थोडी बुंदी, लाल डाळिंबदाणे पेरून द्यावी. ६) बटर फार वेळ पाण्यात किंवा दह्यात ठेऊ नयेत. लगेच पोटात टाकावेत नाही तर ते पाणी शोषून घेतात आणि फुगून पानचट लागतात.
Taxonomy upgrade extras
वाचने
30755
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
झटपट...
चोराची पावले चोरालाच माहिती
In reply to झटपट... by प्रभाकर पेठकर
खवय्या....
In reply to चोराची पावले चोरालाच माहिती by सृष्टीलावण्या
चोराची पावले चोरालाच माहिती...
चूकलात...
In reply to चोराची पावले चोरालाच माहिती... by संजय अभ्यंकर
कबूल..
In reply to चूकलात... by प्रभाकर पेठकर
अजून पुढे जाऊन मी म्हणेन...
In reply to चूकलात... by प्रभाकर पेठकर
खवैय्या हा खादाड असू शकतो पण खादाड हा खवैय्या असतोच असे
नाही.
झकास..
वा !
आपल्याकडे विशेषत: उत्तर भारतात
In reply to वा ! by राजमुद्रा
वा ! सृष्टीलावण्य
In reply to आपल्याकडे विशेषत: उत्तर भारतात by सृष्टीलावण्या
माझी मामी धामापुरची आहे
In reply to वा ! सृष्टीलावण्य by राजमुद्रा
एकदम मान्य !
In reply to माझी मामी धामापुरची आहे by सृष्टीलावण्या
मी देईन...
In reply to एकदम मान्य ! by राजमुद्रा
धन्यवाद तात्या!
In reply to मी देईन... by विसोबा खेचर
अमेरिकेतील केळफुल
In reply to एकदम मान्य ! by राजमुद्रा
केळफूल
In reply to अमेरिकेतील केळफुल by ऋषिकेश
क्या बात है!
In reply to केळफूल by धनंजय
धन्यवाद !
In reply to अमेरिकेतील केळफुल by ऋषिकेश
उत्तम
फोडणी
In reply to उत्तम by मोहन
माझ्या मते...
In reply to फोडणी by सृष्टीलावण्या
फोडणी
काळे वाटाणे..
करेक्ट...
In reply to काळे वाटाणे.. by स्वाती राजेश
वा!
In reply to काळे वाटाणे.. by स्वाती राजेश
माझी आजी..
केळफूलाची भाजी
आंबट ताक
In reply to केळफूलाची भाजी by स्वाती दिनेश
डाळींब्या
In reply to केळफूलाची भाजी by स्वाती दिनेश
आमच्याकडे
In reply to केळफूलाची भाजी by स्वाती दिनेश
माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)
आता नुकताच जेवलो तरी .....
झटपट केळफुलाची भाजी
रेसिपी
In reply to झटपट केळफुलाची भाजी by आनंद घारे
१ केळ्फुल
५० ग्रॅम काळे वाटाणे
२ हिरव्या मिरच्या
२ टी.स्पून गोडा मसाला/ भाजीचा मसाला
१/२ टी.स्पून हळद
१/२टी.स्पून साखर
१ कांदा
१ वाटी ओले खोबरे
चवीनुसार मीठ
तेल
केळ्फुल सोलून बारीक चिरावे.सोलताना हाताला थोडे तेल लावलं तर हात काळे होणार नाहीत. फुलाच्या आजुबाजुचा फोलपटासारखा भाग व आतीलजाडसर कावळा(केसर) काढून टाकावा. रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावा म्हणजे त्यातील चीक निघून जाईल. धुवून निथळतठेवावा.काळे वाटाणे रात्रभर भिजत घालावेत्.कुकरमध्ये वाटाणेशिजवून घ्यावेत.
एका पतेल्यात तेल घेऊन तेल टाकावे. तेल तापल्यावर थोडा हिंग, चिरलेलाकंदा वमिरची घालून परतावी. कांदा गुलाबी झाल्यावर त्यातचिरलेले केळ्फुल, शिजलेले वाटाणे,हळद, मसाला, थोडी साखर, मीठ घालूनझाकणीवर पाणी ठेऊन भाजी शिजवून घ्यावी. वरून ओले खोबरे पेरावे.
तात्यांच्या मातोश्रींनी केलेली भाजीची रेसिपीची वाट पाहात आहे.......
धन्यवाद !
In reply to रेसिपी by स्वाती राजेश
धन्यवाद स्वाती!
मी तुझी खूप खूप आभारी आहे, मी नक्की सांगेन तुला भाजी कशी झाली ते. अर्थात तुझी रेसिपी म्हणजे भाजी छानच होणार.
खरच तुझे खूप खूप आभार :)
राजमुद्रा :)
"पानगे " हा
"पानगे " हा काय प्रकार आहे ? कोणी सांगेल क? मी श्री ना पेंडसेंच्या कादम्बरीत वाचले आहे हे नाव.
खास कोकणी...ते ही तळकोकणात बनव्तात म्हणे....