सुप्रिम कोर्ट आणि विवाहीत पुरूष
आजच्या म.टा. मधे अंमळ (खालील) गंमतशीर बातमी वाचनात आली:
बायकोचे ऐकाल, तर सुखी राहाल! वैवाहिक आयुष्य सुखाचे व्हावे, असे वाटत असेल तर बायकोच्या मुठीत राहा... बायको सांगेल ती पूर्व दिशा माना... तिच्याविरोधात बोलाल तर चांगलेच अडचणीत याल... 'सुखी संसारा'चा हा कानमंत्र कोणा मॅरेज कौन्सिलरने नव्हे, तर चक्क सुप्रीम कोर्टाने दिलाय! लग्नानंतर निर्माण झालेला बेबनाव १७ वषेर् उलटूनही कायम असल्याने काडीमोडाची कैफियत घेऊन आलेल्या जोडप्याला सुप्रीम कोर्टाच्या सुटीकालीन खंडपीठाने कायदेशीर 'आदेश' देऊन 'निकाल' न देता एखाद्या कौन्सिलरप्रमाणे सल्ला दिला. कायद्याची रुक्ष भाषा न वापरता हलकीफुलकी विधाने करत खंडपीठातील न्या. मार्कंडेय कटजू आणि दीपक वर्मा यांनी सुनावणी घेतली. सुखी संसारात भांडणे व्हायला नको असतील, तर बायकोविरोधात जाऊन पायावर धोंडा पाडून घ्यायचा नाही, असा गमतीशीर सल्ला देत खंडपीठाने या जोडप्यातील तणाव निवळावा, यासाठी प्रयत्न केला. तसे तर आम्ही सगळेच पीडित आहोत, असे मिश्किलपणे म्हणत न्यायमूतीर्ंनी पुरुषजातीची कैफियतच मांडली! बायकोचे बरोबर आहे की चूक, याचा विचार न करता बायकोच्या होला हो करा, तरच सुखी राहाल, असा कानमंत्र देत त्यांनी सुनावणीची पुढची तारीख सांगितली.आता आशा करूया की स्त्रीयांच्या बाजूचा हा सुप्रिम कोर्टाचा निकाल ऐकून परत एखादी घटनादुरूस्ती नव्याने आलेले सरकार करणार नाही ;)
वाचने
3484
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
गंमत आहे
निकालाआधीच
कोर्टाचं
In reply to कोर्टाचं by पिवळा डांबिस
यावरून आठवल
कोन्तबी कोरट
मुले
In reply to मुले by विनायक प्रभू
थोडे वेगळे
सुप्रिम
संसारात सगळे निर्णय