अवधूत साठे..
In reply to एकदम जेन्युईन माणूस by चंद्रसूर्यकुमार
In reply to खुलाशाबद्दल धन्यवाद. by गामा पैलवान
किंबहुना अकादमी वित्तीय सल्ला देत नाही असंच दिसतंय. मग सेबी कुठनं आली?अमुक एक शेअर घ्या असा सल्ला किंवा टिप सर कधीही देत नाहीत तर नक्की काय बघून आपण तो शेअर घेतला/विकला ते सांगतात. याचा उद्देश हा की भविष्यात तसाच सेट-अप दुसर्या कोणत्या चार्टमध्ये आला तर विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे नक्की काय करायचे याचा निर्णय घेता यावा. पण याविषयी नियम थोडे धुसर आहेत असे वाटते. मी अमुक एक गोष्ट बघून तो शेअर घ्यायचा निर्णय घेतला याचा अर्थ तो शेअर घ्या असा सल्ला झाला का? सेबीने कदाचित तसा अर्थ लावला असावा. जर कोणीही अमुक एक शेअर घ्या असे जाहीरपणे (युट्यूब/टेलिग्राम किंवा कुठेही ) म्हटले तर त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारे लोक असतात. असे म्हणणार्या मनुष्याकडे योग्य ते ज्ञान नसेल आणि त्याचे डोळे झाकून अनुकरण केले तर त्यातून लोकांचे नुकसान होऊ शकते. म्हणून कोणीही याविषयी सल्ले द्यायला निघाला तर त्याच्याकडे सेबीचे लायसेन्स असले पाहिजे असा नियम आहे. आणि तसे परवाने देण्यापूर्वी सेबी परीक्षा घेते आणि त्या परीक्षेत कमीतकमी टक्के मार्क मिळवावे लागतात तरच सेबी परवाना देते. सेबीचे हे नियम त्या दृष्टीने योग्य आहेत. मात्र मुळात सल्ला म्हणजे काय- सर जे काही शिकवितात त्याला सल्ला म्हणता येईल का याविषयी तितकी स्पष्टता नसावी असे वरकरणी वाटते. आता अवधूत सर काय करतात ते बघायचे. आमच्यासारखे विद्यार्थी त्यांचे आजन्म समर्थक आहेत.
In reply to सेबी by चंद्रसूर्यकुमार
In reply to या शिक्षणासाठी किंवा by गवि
मोफत असते तर नियमात कदाचित काही शिथिलता योग्य ठरेल.माझ्यामते मोफतही सल्ला देणे गुन्हा आहे.मी एका इन्फ्लुएंसरला फॉलो करते ,त्याला एका गोल्ड म्युच्युअल फंड विषयी विचारले तरी त्याने ,सॉरी मी नियमानुसार हे सांगू शकत नाही असे सांगितले-त्याचे उत्तर
"SEBI नियमांनुसार मी Buy-Sell Tips देऊ शकत नाही. पण, मी तुम्हाला Swing Trading शिकवतो, जेणेकरून तुम्ही स्वतःचे ट्रेडिंग निर्णय घेऊ शकाल. कोर्स जॉईन केल्यानंतर आमच्या WhatsApp Group मध्ये Access मिळेल.
In reply to या शिक्षणासाठी किंवा by गवि
In reply to आपण कोणतीही गोष्ट व्यापारी by कंजूस
आपण कोणतीही गोष्ट व्यापारी तत्त्वावर सुरू करतो तेव्हा त्यास लागू होणारे सर्व नियम पाळावे लागतात. कारवाई झाल्यावर चिडचिड करून काही उपयोग नसतोबरोबर,साठे यांनी पसारा खुप वाढवला होता(चांगल्या अर्थाने).त्यातली एखादी वाट चुकून चुकली की ठरवून चुकली ,हा येणारा तपासच सांगेल.परंतु शेअर मार्केटमध्ये अजून एक केस स्टडी या रूपाने मिळाली आहे.
In reply to पूर्वी मध्यमवर्गीय एखाद्या by विवेकपटाईत
कमी वेळात जास्त पैसा शेअर बाजारात आहे, असे स्वप्न दाखविणारा अवधूत साठे.पटाईत काका, माफ करा पण हे वाचून गुडघ्यातील प्रतिसाद देणारे अनेक आणि तुम्ही यात फरक आहे असे वाटत होते तो गैरसमज होता असे वाटते. अवधूत सरांनी शेअर बाजारात कमी वेळात जास्त पैसा आहे अशी स्वप्ने नक्की कधी आणि कुठे दाखवली हे सांगता का? की दिल्लीत राहून केजरीवालांची थापा मारायची सवय तुम्हाला पण लागली आहे? अर्थात तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या प्रतिसादांची तुम्ही दखलही घेत नाही हे माहित आहे त्यामुळे तुम्ही यावर काहीही लिहिणार नाही हे माहित आहे पण अवधूत सर नक्की काय सांगतात हे तुम्हाला काहीही माहीत नाही असे दिसते. असो.
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to तुम्ही अवधूत चे रील्स बघितले by विवेकपटाईत
नाचणारे शॉट्स पाहूनच मी प्रतिसाद दिला आहेहो अवधूत सर असे बर्याचदा उत्साहाच्या भरात नाचतात. अॅकॅडेमीचा एक 'ओजीएम कार्ड' (Opportunity generating machine) म्हणून प्रकार आहे. सरांनी ठरविल्याप्रमाणे मार्केटमध्ये एका पातळीवर यश मिळाले की मग त्या व्यक्तीला ते ओजीएम कार्ड दिले जाते. अॅकॅडेमीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्केटमधून यश मिळवायची ती एक महत्वाची पायरी आहे. असे ओजीएम कार्ड द्यायचा एक कार्यक्रम असतो. त्यावेळेस त्यांचा आनंद सरच नाही तर इतर बरेच ट्रेनर्स नाचून साजरा करतात. त्यात वाईट काय आहे? सतत चौकोनी चेहरा करून मख्खासारखे बसून राहायचे का? ते कार्ड मिळालेल्यांचे हजारो लोक अभिनंदन करत आहेत, त्यांचे यश उत्साहाने साजरे करत आहेत यातून ज्यांना ते कार्ड मिळालेले नाही त्यांनाही आपल्याला ते कार्ड मिळण्यासाठी- पक्षी तितके यश मिळविण्यासाठी काम करायची प्रेरणा मिळत असेल तर त्यात चूक काय आहे? ट्रेडिंग हा प्रकार एकलकोंडा (लोनली प्रोफेशन) आहे. अशावेळी एखादी कधी चूक झाली/ मोठा लॉस झाला तर आधार द्यायला किंवा ट्रेड मस्त चालला/ मोठा प्रॉफिट झाला तर तो साजरा करायलाही एका ध्येयाने/एका दिशेने जाणार्यांचा समुदाय सरांनी केला आहे आणि पूर्ण देशात ठिकठिकाणी हजारो लोक त्याचे सदस्य आहेत. अशावेळेस एकत्र येऊन मजा केली तर बिघडले कुठे? त्या समुदायात अगदी दहावी नापासपासून न्यूरोसर्जन आणि ऑन्कॉलॉजिस्टपर्यंत सगळ्या प्रकारचे लोक आहेत. तिथे प्लेटो आणि अॅरिस्टॉटलच्या तत्वज्ञानावर किंवा तत्सम गहन विषयावर चर्चा करत बसले तर तो समुदाय टिकेल का? एकूणच सरांची अॅकॅडेमी म्हणजे काय आहे याविषयी काहीही माहित नसताना अर्धवट पण नाही तर चतकोरवटपेक्षा कमी माहितीवर, इकडे हा रील बघितला, तिकडे तमका व्हिडिओ बघितला यावरून लोकांना वाईट मत बनविताना बघून आश्चर्य वाटते.
In reply to मग? by चंद्रसूर्यकुमार
In reply to चंद्रसूर्यकुमारजी माझे काही प्रश्न by मारवा
In reply to तुमच्याशी सहमत आहे. बरेच by गवि
त्यांच्या प्रतिसादातच मला अत्यंत प्रभावित झालेल्या चाहत्याच्या खुणा (किंवा रेड फ्लॅग म्हणा) स्पष्ट जाणवले.मी जे काही स्वतः बघितले आहे ते लिहिले आहे. त्यापैकी एकही शब्द मी माझ्या कल्पनेतून लिहिलेला नाही. आता हे कोणाला रेड फ्लॅग किंवा ब्लॅक फ्लॅग किंवा अन्य कोणत्या रंगाचे फ्लॅग वाटत असले तर त्याविषयी मी काहीही करू शकत नाही.
त्यांच्या (साठे यांच्या) शिष्यांना ६५% च सरासरी तोटा होतो. बाकीच्यांना मात्र ९०% होतो. हे यश आहे. म्हणजे मुळात मेजॉरिटी तोटा होणाऱ्या क्षेत्रात हे मार्गदर्शन केले जात आहे आणि सरासरी अत्यंत वाईट आतबट्ट्याच्या (९०% लोकांना तोटा) व्यवहारापेक्षा कमी तोट्यात (६५% लोकांना किंवा ६५% तोटा) साध्य होते आहे. ही यशाची व्याख्या आहे.युपीएससी, कॅट, आय.आय.टी जेईई करणार्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना खरे यश येते? तिथे तो आकडा १०% पेक्षा बराच कमी आहे. तरीही त्यासाठीचे मार्गदर्शन करणार्या संस्था आहेतच ना? तिथे यशाची व्याख्या काय? समजा एकूण विद्यार्थ्यांपैकी २% विद्यार्थ्यांना यश मिळत असेल पण अबक या संस्थेच्या ५% विद्यार्थ्यांना यश मिळाले तर मग ते त्या संस्थेचे यश म्हणायचे की ९५% विद्यार्थ्यांना अपयश येते म्हणून त्या संस्थेचे अपयश?
जिथे कोणा स्त्रियांच्या बाबतीत नफा चुकीचा आणि वाढीव दाखवला गेला आणि प्रत्यक्षात कमी आढळला, तिथे .. त्यांनी पती किंवा अन्य कोणाच्या नावाने ट्रेडिंग केले असेल. असे सर्रास होते. असे त्यावर स्पष्टीकरण आले आहे.वरील प्रतिसादात लिहिले आहे ती लक्ष्मी गृहिणी आहे. तिचे स्वतःचे उत्पन्न असे काही नाही. तिने तिच्या नवर्याकडून पैसे घेऊन ट्रेडिंग सुरू केले. जर असा घसघशीत पैसा मिळाला तर मग इनकम टॅक्सचा झक्कू आपल्या मागे तर लागणार नाही ना हे पण एक कारण असते. नुसत्याच गृहिणीच नाही तर नवरा चांगले कमावत आहे पण त्याची बायको पाच-सात लाखाचे पॅकेजची नोकरी असलेली आहे असे अनेक ठिकाणी बघायला मिळेल. अशा स्त्रियाही अनेकदा थोडे ट्रेड आपल्या अकाऊंटमधून आणि जास्त नवर्याच्या अकाऊंटमधून टाकतात. अनेकदा नवरा-बायको दोघेही मोठ्या पदावर असतील आणि ट्रेड घ्यायचा आहे पण आज दिवसभर मिटींग आहेत पण दुसर्याला त्यामानाने वेळ आहे तर मग ज्याला वेळ असेल त्याच्या अकाऊंटमधून ऑर्डर टाकली जाते. हे सगळे परस्पर विश्वासातून होते. जोपर्यंत नियमानुसार सगळे काही होत आहे आणि त्या उत्पन्नावर कर भरले जात आहेत तोपर्यंत कोणालाही काही अडचण नसावी.
ज्यांनी पैसा हवा म्हणून हात वर केला त्यांना बाहेर जा असे सांगितले, पण प्रत्यक्ष बाहेर काढले नाही. (तो इव्हेंट पेड असल्यास रिफंड द्यावा लागला असता का?)प्रत्यक्षात कोणालाही बाहेर काढायचा उद्देश नव्हता तर मार्केटमध्ये पैशावर फोकस ठेऊ नका, स्कील डेव्हलप करा मग पैसा येईलच हे विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्यासाठी- थोडीशी नाट्यमयता आणून केले होते. मुख्य सेशन व्हायच्या आधी कन्सेप्ट वेबिनार असतात. ज्यांना मार्केटमधील काहीही माहित नाही अशांना मुख्य सेशनमध्ये यायच्या आधी बेसिक माहिती व्हायला हवी यासाठी ते कन्सेप्ट वेबिनार असतात. नाहीतर मुख्य सेशन सुरू असताना कॅन्डल म्हणजे काय हेच माहित नाही असे व्हायचे. चार सेशन- प्रत्येकी दोन दिवसांची. मी कोर्स केला तेव्हा पहिल्या सेशनच्या पहिल्या दिवसाच्या शेवटपर्यंत कोणाला ड्रॉप आऊट व्हायचे असेल त्यांना १००% पैसे परत करणार असे रिसीटवरच लिहिले होते. माझ्या बॅचमध्ये तरी कोणी असा रिफंड घेतल्याचे ऐकिवात नाही. म्हणजे तीन-चार कन्सेप्ट वेबिनार आणि मुख्य सेशनच्या पहिल्या दिवसाच्या शेवटपर्यंत इतकी १००% रिफंडची गॅरंटी होती. आता मला वाटते शेवटच्या कन्सेप्ट सेशनपर्यंत अशी गॅरंटी आहे.
यश, नफा यांचे सर्व क्रेडिट गुरूंना, अपयश, तोटा, यांची जबाबदारी साधकाची. साधना नीट सांगितल्याप्रमाणे तंतोतंत पाळली नाही.सॉरी. यशाचे क्रेडिट सरांचे पण अपयशाची जबाबदारी विद्यार्थ्याची असे सर म्हणतात हे तुम्हाला कोणी सांगितले? अशा प्रत्येक प्रतिसादाचा प्रतिवाद करायला खरं तर वेळ नाही पण तरीही उगीच इतरांचे गैरसमज व्हायला नकोत म्हणून लिहित आहे. सर नेहमी म्हणतात की त्यांच्या २८-३० वर्षाच्या अनुभवातून मार्केटमध्ये काय चालते याविषयी त्यांचे सेट-अप्स ते देणार. ते सेट-अप १००% नक्कीच चालत नाहीत- कोणतीही गोष्ट १००% चालत नाही. साधे बेसिक सेट-अप ७०% वेळेस चालतात आणि त्यात अजून काही मसाला घातला तर ती टक्केवारी वाढते. त्यात मनी मॅनेजमेंट करून ट्रेड घ्या हे सर सांगतात. हे टाईम टेस्टेड ठोकताळे आहेत. ते तुम्हाला शिकविले आहेत, त्यात मार्गदर्शन लागल्यास- म्हणजे अमुक झाले तर तमुक करायचे का वगैरे प्रश्नांसाठी सपोर्ट सिस्टीम आहे. तुम्ही प्रोसेस फॉलो करा. त्यात यश आले तर 'थँक यू गॉड मार्केट' म्हणा आणि ट्रेड चालला नाही तर आपले काय चुकले (आणि चालला तरी काय बरोबर केले) याचे विश्लेषण करा एवढेच सर सांगतात. त्यापुढे जाऊन प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिट असल्यास तो गुड प्रॉफिट आहे की बॅड प्रॉफिट आहे तसेच लॉस असल्यास तो गुड लॉस आहे की बॅड लॉस आहे हे पण बघा. सगळी प्रोसेस (रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट- पोझिशन सायझिंग सकट) फॉलो करून प्रॉफिट झाल्यास तो गुड प्रॉफिट. आपण सगळी प्रोसेस फॉलो केली तरी मार्केट उलटे जाऊन लॉस होऊ शकतो. जर प्रोसेस फॉलो केली आहे तरीही लॉस झाला तर मग तो गुड लॉस. तसेच अंदाधुंद काहीतरी करून प्रॉफिट झाल्यास तो बॅड प्रॉफिट आणि लॉस झाल्यास तो बॅड लॉस. काहीही झाले तरी बॅड प्रॉफिटपासून सांभाळून राहा कारण आज तुक्का लागला आणि प्रॉफिट झाला म्हणजे आपणच गॉड आहोत असे वाटायला लागून पुढे कधीतरी पडणार तो खड्डा आपणच खणायला सुरवात करत असतो. सर एवढेच सांगतात की तुम्ही गुड प्रॉफिट आणि गुड लॉस करा. यात कोणी क्रेडिट घ्यायचा प्रश्न येतोच कुठे? इतक्या विद्यार्थ्यांचे क्रेडिट सर घेत बसले तर इतर काही करायला वेळच मिळायचा नाही. असो. एकूणच तुम्ही सगळे काहीही माहिती नसताना उगीच हवेत तीर मारत आहात. ज्यांना स्वतः कष्ट घ्यायची तयारी आहे अशा विद्यार्थ्यांपैकी कोणीही सरांविषयी वाईट बोलत नाहीये. पण सगळे काही आयते हवे, दुसरा कोणी टिप देणार आणि मी तसे करून पैसा पाहिजे असा अॅटिट्यूडवाले विद्यार्थी आणि ज्यांना सरांविषयी आणि अॅकॅडेमीविषयी काहीही माहित नाही असे लोकच वाईट बोलत आहेत. एकूणच काय की मी पैसे भरून अॅडमिशन घेतली ना मग यश मिळणे हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे असे मार्केटमध्ये चालत नाही. मी आय.आय.टी जे.ई.ई साठी क्लासमध्ये पैसे भरून प्रवेश घेतला आता मला आय.आय.टी पवईला कॉम्पुटर सायन्सला प्रवेश मिळवून द्यायची जबाबदारी त्या क्लासच्या शिक्षकांची असे बोलले तर चालेल का? क्लासमधील शिक्षक फार तर मार्गदर्शन करू शकतात विद्यार्थ्याला स्वतःला कष्ट घ्यायलाच लागतात. मग मार्केटसंबंधी संस्थांमध्ये वेगळे का असावे?
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to मुद्देसूद उत्तराबद्दल धन्यवाद by गवि
In reply to चंद्रसूर्यकुमारजी माझे काही प्रश्न by मारवा
सरांचे खरे स्किल माझ्या मते मार्केटिंग आहे. कारण नवीन बकरा पकडण्यासाठी 500 रुपयाचा eye opener ki closer course आणि क्रमाने पुढचे कोर्स सर्वात महागडा 6.75 लाख किंमतीचा कोर्स हे खरोखर काबिल ए तारीफ मार्केटिंग स्किल आहे.या वाक्यावरून तुमचा पूर्वग्रह स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे खरं तर तुमच्या प्रतिसादावर काहीही लिहायची इच्छा नव्हती. पण म्हटले की याचा प्रतिवाद केला नाही तर मग ज्यांना याविषयी काहीही माहित नाही त्यांचे मत विनाकारण प्रतिकूल बनेल म्हणून लिहित आहे. खरं सांगायचं तर तुमच्यासारखे छप्पन्न टीकाकार बघितले आहेत- तुम्ही सत्तावन्नावे. हाकानाका. सगळ्यात पहिल्यांदा स्वतः सरांना तथाकथित ६ कोटी लॉस आणि ट्रेनिंग इनकम ६०० कोटी याविषयी. सरांनी परवा रात्री एक स्पेशल वेबिनार घेतला आणि त्यात बर्याच गोष्टी सांगितल्या. सगळ्यात पहिल्यांदा आस्ताच्या एका लक्ष्मीने (योगायोगाने तिचे नावही लक्ष्मीच आहे) एक कोटी प्रॉफिट केला अशी जाहिरात केली पण तिचा प्रॉफिट ४.१७ लाख आहे हे सेबीच्या पीडीफमध्ये लिहिले आहे त्याविषयी. ती लक्ष्मी त्या वेबिनारमध्ये होती आणि तिने स्वतः लाईव्ह वेबिनारमध्ये तिच्या आणि तिच्या नवर्याच्या झिरोधा कोन्सोलमध्ये लॉगिन करून स्क्रिन शेअर करून डिसेंबर २०२० ते मार्च २०२३ या काळात (सेबीच्या अहवालात उल्लेख आहे त्याप्रमाणे) तिचा नक्की प्रॉफिट किती झाला ते सगळ्यांना दाखविले. ४.१७ लाख हा आकडा नक्की कुठून आला हे आपल्याला पण कळले नाही हे तिने सांगितले. अॅकॅडेमी सेबीला याविषयी 'मिसरिप्रेझेन्टेशन' झाले आहे म्हणून पुराव्यानिशी काही पेपर फाईल करणार आहे. तिच गोष्ट स्वतः अवधून सरांची. मी उपस्थित असलेल्या अगदी पहिल्या सेशनमध्ये त्यांनी सांगितले होते की विद्यार्थी फी भरत आहेत त्यातील सगळे पैसे गुरूकूल बांधायला आणि तिकडची व्यवस्था बघायला तसेच कंपनीचा खर्च चालवायला वापरले जातील आणि त्यांच्या घरचा खर्च चालवायला त्यांचे ट्रेडिंगमधील उत्पन्न पुरेसे आहे. अॅकॅडेमीचे पहिले गुरूकूल मागच्या वर्षी (की या वर्षी जानेवारीत असेल) कर्जतजवळ सुरू झाले आहे. मी अजून तिथे गेलेलो नाही पण तिकडचे व्हिडिओ आणि तिथे जाऊन आलेल्यांनी सांगितल्याप्रमाणे ते गुरुकूल एखाद्या फाईव्ह स्टार रिसॉर्टप्रमाणे आहे. तिथे जमीन विकत घेणे, बांधकामाचा खर्च यासाठी फी मधून आलेले पैसे वापरले जातील हे पण सरांनी सांगितले होते. मला वाटते तिकडे विद्यार्थी, मॉनिटर, ट्रेनर वगैरे मिळून कधीही दीड-दोनशे लोक असतात. त्यामुळे एखाद्या हॉटेलमध्ये असते त्याप्रमाणे हाऊसकिपींग, मेन्टेनन्स, लॉन्ड्री, अॅडमीन वगैरे सगळी व्यवस्था आहे. जेवणाचे कंत्राट कोणा कंत्राटदाराला दिले आहे. सांगायचा मुद्दा हा की तो सगळा खर्च विद्यार्थ्यांच्या फी मधून चालविला जातो. सर नेहमी म्हणतात की ट्रेडिंगमध्ये यश मिळायचे असेल तर एका योग्य वातावरणात एकत्र अभ्यास झाला तर ते लाभदायक असते. ते गुरूकूल त्यासाठी आहे. सरांनी अजूनही सांगितले आहे की हे पहिले गुरूकूल आहे. पूर्ण देशात वेगवेगळ्या ठिकाणी अशी २१ गुरूकूल व्हावीत असे त्यांचे स्वप्न आहे. मार्केट संबंधी असे गुरूकूल इतर कुठे नसावे. त्यामुळे ६०० कोटी हे ट्रेनिंगमधील आलेले उत्पन्न सरांचे उत्पन्न आहे ही धारणाच मुळात चुकीची आहे. आता सरांना स्वतः लॉस झाला असे आले आहे त्याविषयी. सरांनी त्याविषयी सांगितले की त्यांचा स्वतःचा प्रॉफिट डबल डिजीट कोटींमध्ये आहे आणि योग्य वेळेस ते पुरावे जाहीर करतील आणि सगळ्या सत्तावन्न लोकांचे दात घशात घालतील (पुढचे वाक्य माझे- सरांचे नाही). २०२४ च्या जानेवारी महिन्यात सर बराच काळ गुरूकुलाच्या कामाच्या तिथे होते आणि त्यामुळे त्यांना स्वतःच्या ट्रेडिंग पोझिशन्स वेळेवर क्लोज करता आल्या नाहीत म्हणून त्यांना त्या महिन्यात पाचेक कोटींचा लॉस झाला होता हे त्यांनी तेव्हाच सेशनमध्ये सांगितले होते. पण २४ महिन्यात सहा कोटींचा लॉस आणि ट्रेनिंगचे उत्पन्न ६०० कोटी या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. त्यासाठी लीगल टीम जे काही करायचे आहे ते करत आहे.
सर्व buy आणि सेल आणि स्टॉप लॉस आणि. टार्गेट देऊन हा ट्रेड मी करतोय बाकी तुमची इच्छा असे म्हणून पळवाट निघत नाही आपण कदाचित सेबी चे नियम जाणत नाही असे दिसते. तरी अगदी common sense वापरला तरी जेव्हा अवधूत साठे स्वतः सेबी registered advisor नसताना मुळात त्यांना indirectly सुद्धा advisory देणे हे कुठलीही कायदेशीर संस्था ज्यांची इच्छा अपात्र व्यक्तीने सल्ला देऊ नये अशी आहे त्यासाठी त्यांनी कायदा केला आहे तो साठे यांना नक्कीच माहीत आहे तरी असा "अप्रत्यक्ष "सल्ला देत साठे "उद्युक्त" करत होते हे उघड दिसतेय.दोन गोष्टी- सरांची ९५%- कदाचित जास्तच सेशन मार्केट संपल्यानंतर असतात. त्यात 'मी ट्रेड करतोय बाकी तुमची इच्छा' म्हणायचा प्रश्नच नाही. तर त्या दिवशी मार्केट चालू असताना नक्की काय बघून तो ट्रेड घेतला हे त्यात ते सांगतात. मी ट्रेड घेतला आणि ट्रेड घेतोय या दोन गोष्टींमध्ये बराच फरक आहे. लाईव्ह मार्केट दरम्यान सेशन असतात ती लाईव्ह मार्केट ट्रेनिंग सेशन असतात लाईव्ह मार्केट ट्रेडिंग सेशन नाही. मी असे एकच सेशन बघितले आहे. त्यावेळेस आम्हाला लॅपटॉप घेऊन यायचा नाही अशी स्पष्ट सूचना होती. तसेच मार्केट सुरू होण्यापूर्वी पण सरांनी- कोणीही ट्रेड कॉपी करायचा नाही तर या सेशनचा उद्देश लाईव्ह मार्केटमध्ये नक्की काय बघायचे हे शिकविणे हा आहे हे स्पष्ट केले होते. लॅपटॉप घेऊन यायचा नाही हा दंडक सर घालू शकतील पण फोनही आणू नये असा दंडक कसा घालणार? घरच्यांशी बोलायचे असते, उबर-ओला बुक करायची असते, इतरही पन्नास कामे फोनवर होतात त्यामुळे फोन सगळ्यांबरोबर असतोच. आता कोणी फोनवर ट्रेड घेतला तर त्याला कोणीच नियंत्रण घालू शकणार नाही. कदाचित असे केल्यास सेबीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही असे सरांना वाटले असेल. ती चूक असेल तर नियामानुसार कारवाई होईलच. पण सरांची नियत वाईट आहे/होती यावर सरांचा कोणीही जेन्युईन विद्यार्थी विश्वास ठेवणार नाही. म्हणूनच म्हटले की या निमित्ताने प्रकरण कोर्टात जाऊन अॅडव्हायजरी म्हणजे नक्की काय- सर जे काही करतात ती अॅडव्हायजरी आहे का हे स्पष्ट व्हावे असे फार वाटते. आतापर्यंत सेबीने अशी कारवाई अनेकांवर केली आहे. आमच्या नवी मुंबईत अस्मिता पटेल म्हणून एक आहे. तिच्यावरही अशीच कारवाई केली. तेव्हा इतकी चर्चा कुठेही झाली नव्हती. आज अवधूत साठेंचे नाव आल्यावर इतकी चर्चा होते आहे त्याचे कारण आस्ता ही भारतातील सगळ्यात मोठी ट्रेनिंग अॅकॅडेमी आहे. सर मुंबईचे म्हणून मुंबईत समजा एका वेळेस त्यांचे पाच-सहा हजार विद्यार्थी एकत्र आले . पण तेच सर कलकत्त्यात, दिल्लीत, बंगलोरमध्येही तसेच करू शकतात. तितके विद्यार्थ्यी सगळीकडे आहेत. माणूस जितका मोठा होतो तितके हितशत्रू वाढतात. त्यामुळे मग चर्चाही जास्त. असो.
In reply to सर by चंद्रसूर्यकुमार
In reply to हे साठे नक्की ट्रेडिंग कशात by आग्या१९९०
In reply to अत्यंत प्रभावित झालेल्या चाहत्याच्या खुणा (किंवा रेड फ्लॅग) by स्वधर्म
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to अत्यंत प्रभावित झालेल्या चाहत्याच्या खुणा (किंवा रेड फ्लॅग) by स्वधर्म
In reply to Cognitive Dissonance by मारवा
In reply to शिळा विदा, प्यान, इत्यादि by गामा पैलवान
In reply to पुर्वी काही खोटे आय पि ओ by खटपट्या
In reply to या मुद्द्यात तथ्य वाटतंय. by रामचंद्र
श्री. चंद्रसूर्यकुमार यांनी यावर काही भाष्य केलं तर अधिक माहिती मिळू शकेल.छे हो. सध्या कॉग्निटिव्ह डिसोनान्स आणि मार्क ट्वेन काय म्हणाला याविषयी वाचायला सुरवात केली आहे. असल्या क्षुल्लक गोष्टींसाठी द्यायला आता वेळ नाहीये :)
In reply to जबरी प्रतिसाद आहेत. मलाही by कंजूस
In reply to मी क्रिप्टो गाढवपणा करून by गवि
In reply to मी क्रिप्टो गाढवपणा करून by गवि
In reply to जुगार ऊर्फ गॅम्बल हे चित्र स्पष्ट होते by चंद्रसूर्यकुमार
In reply to आग्यांच्या बहिणीला एफ & ओ by आग्या१९९०
In reply to मी क्रिप्टो गाढवपणा करून by गवि
In reply to सहमत!! by राजेंद्र मेहेंदळे
In reply to सेम हियर . टेरा ल्यूना झटका by गवि
In reply to तुम्ही crypto मध्ये पैसा गमावला याचा खेद वाटतो पण by मारवा
In reply to तुम्ही crypto मध्ये पैसा गमावला याचा खेद वाटतो पण by मारवा
In reply to मी मागे एकदा crypto मध्ये जे mutual funds by मारवा
तरीही गवि तुम्हीसुद्धा?तेच तर म्हणत होतो की. पण लीगल इल्लीगल बद्दल: कॉइन्सविच ही पूर्ण लीगल एंटीटी आहे याची मी खात्री करून घेतली होती. त्यात तुम्हाला कोणतीही क्रिप्टो करन्सी बाहेर काढता येत नाही किंवा जमा करता येत नाही (deposit) केवळ खरेदी विक्री. आणि आपल्या थेट जोडलेल्या बँक खात्यात उघड आवक जावक. सर्व टॅक्स संबंधित कागदपत्रे डाउनलोड. इन्कम टॅक्स नोंदींमध्ये एकूणएक रुपयांची नोंद आणि तीस टक्के कर (फायदा तोटा काही संबंध नाही. Withdrawal= तीस टक्के कर) यात काहीही बेकायदेशीर नव्हते. स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणून याला भारतात मान्यता आहे. अन्य परदेशी काही exchanges जी थेट खाजगी वॉलेटमधे कूट चलन ट्रान्स्फर करू शकतात (म्हणजे ते गडप होते) ते आपल्याकडे बेकायदेशीर आहे. कॉइन स्विचमध्ये प्रत्यक्ष क्रिप्टोला हात लावताच येत नाही. सर्वकाही बंदिस्त आणि बँकेद्वारेच शक्य. आवक आणि जावक फक्त रुपये चलनात उघड उघड. तेव्हा बेकायदेशीर काही केले असे म्हणणे जरा अस्वस्थ करणारे आहे. किमान जाणूनबुजून असे काही केलेले नाही.
In reply to तरीही गवि तुम्हीसुद्धा? by गवि
In reply to तुम्ही crypto मध्ये पैसा गमावला याचा खेद वाटतो पण by मारवा
शेअर बाजारात पैसे कमावणे हे येरागबाळ्याचे काम नाही.
एखाद्या क्षेत्रात पैसे कमावणे हे सकृतदर्शनी जितके सोपे दिसते ते प्रत्यक्षात तितकेच अवघड असते!
एकदम जेन्युईन माणूस