मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही क्षण.

जागु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
असेही काही क्षण आयुष्यात असतात मनाच्या आकाशात लुकलुकत असतात अवखळ क्षण, खळखळाट भरलेले मनाला भिडलेला चंचलपणा मौज-मस्तीचा उधाण वारा दिशाहीन कुठेही वाहणारा श्वास रोखणारे सुखही असते गुदमरुन, हृदयी कोंडलेले भार पेलवत नाही सुखाचा म्हणुन नयन कडांतुन ओसांडलेले. क्षण असतात सुख-दु:ख एकोप्याचे दु:खातून सुख शोधण्याचे सुखातील दु:ख जाणण्याचे सुख-दु:ख आनंदण्याचे.

वाचने 2026 वाचनखूण प्रतिक्रिया 6

मदनबाण 15/05/2009 - 19:19
क्षण असतात सुख-दु:ख एकोप्याचे दु:खातून सुख शोधण्याचे सुखातील दु:ख जाणण्याचे सुख-दु:ख आनंदण्याचे. व्वा. मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

क्षण असतात सुख-दु:ख एकोप्याचे दु:खातून सुख शोधण्याचे सुखातील दु:ख जाणण्याचे सुख-दु:ख आनंदण्याचे. दुसरे आपण करुच काय शकतो चुचु

क्रान्ति 18/05/2009 - 20:26
सुन्दर कविता. :) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

प्राजु 18/05/2009 - 22:32
मौज-मस्तीचा उधाण वारा दिशाहीन कुठेही वाहणारा सुरेख कल्पना! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/