झाला तो सत्वर, मॅनेजर!
Taxonomy upgrade extras
एकतर दुपारच्या जेवणानंतर लगेच असलेली मीटिंग मला अजिबात आवडत नाही! त्यात भर दुपारच्या मीटिंग दरम्यान आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करुन झोप टाळायची आणि समोर सुखेनैव सुस्तावलेले काही डोलकर प्राणी बघितले की आपण जाणीवपूर्वक डोळे उघडे ठेऊन का बसलो आहोत ह्याचा सात्विक संताप येतो! X(
पूर्वी जात्यावर जशा बायकांना ओव्या स्फुरायच्या ना तव्दतच अशाच एका मीटिंगच्या दळणादरम्यान स्फुरलेल्या ओव्या! ;)
(ओव्यांच्याच चालीवर म्हणून बघा! )
कलत्या दुपारी, टेबलाच्या तीरी
पेंगतो मुरारी, मंद पहा..
टकल्या बेरका, उनाड वाळका
सारे एकमेका, टाळी देती..
'पॉईंट पॉवर', सरे भराभर
पहा रे समोर, कशासाठी?..
सावरीत 'कुंभ', उभा जणू खांब
बोले पहा शुंभ, भडाभडा..
झोपेतच दंग, डोलते सर्वांग
असंगाशी संग, का रे करा..
घोरतो हा बाबा, अवघड सभा
साहेबाच्या बोंबा, हापिसात..
मिटले नयन, घडले शयन
होणार शासन, काय आता?..
अहो चमत्कार, की हा अनाचार?
झाला तो सत्वर, मॅनेजर!..
वशिल्याचा सूर, 'रंगा' म्हणे दूर
गाजे भरपूर, जिथेतिथे..
चतुरंग
वाचने
5101
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
एकदम झकास! सुरेख पकडलाय वास्तव
नेमकी आणि मिटिंगवरच लिहिणाऱ्या सर्वसाक्षींचीच पहिली प्रतिक्रिया यावी हा विलक्षण मामला.
हाहाहा!
मस्त! माझ्यासाठी मिटींग मिटींग म्हणजे ऐकत असल्यासारखं करत खाणं, पिणं आणि वेळ मिळालाच तर मस्त डुलकी...एकाचवेळी इतक्या गोष्टि म्हणजे त्रासच! ;)
हेच वर्णन दुपारी असलेल्या टॉक्स आणि सेमिनार्सनाही लागू पडतं! चांगला वक्ता कसा ओळखावा: त्याच्या टॉकात झोप नाही आली तर वक्ता चांगला.
ओव्या आवडल्याच!
प्राजुच्या 'कृष्णमयी' ला मी चाल लावलेय. त्या चालीवर ही कविता मस्त जमतेय.
त्या कवितेचं हे विडंबन तर नव्हे ना रंगराव. :)
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
In reply to मस्त. by प्रमोद देव
मागे ज्यावेळी प्राजूची कविता आली त्यावेळी विडंबन करायचे डोक्यात होते म्हणून काही ओळी करुन ठेवलेल्या. नंतर ते मागे पडले, सगळे संदर्भही विसरलो.
मग पुन्हा ह्या मीटिंगच्या नाटकाने वेगळ्याच विषयाने उचल खाल्ली आणि कच्च्या मसुद्यात हा खर्डा सापडला. त्याबरोबर ओव्या पूर्ण केल्या आणि टाकल्या.
जुना संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद प्रमोदकाका! :)
चतुरंग
ओव्यांच्याच चालीवर म्हणून बघितली.
जमली की मस्त!
मीनल.
मी तर शक्य असेल तेव्हा तेव्हा टेलीकॉन्फरंस करतो...फार नाईलाज झाला तरच प्रत्यक्ष मिटींगला जातो.
(कर्मचारी)बेसनलाडू
मस्त जमलेय!!
राघव
मस्त जमलेय!
In reply to मस्त by यशोधरा
मस्त जमलेय!
- (नवनिर्वाचित म्यानेजर) टिंग्या
ओ रंगासाहेब, एक लंबर जमलंय हो... मिटिंगांचं वास्तव एकदम सह्ही पकडलंय... मला तर मिटिंग सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र कधीही असली तरी झोप येऊ शकतो...
बिपिन कार्यकर्ते
मजा आहे.
झक्कास !
:)
--अवलिया
मस्तच जमली आहे.
वाचताना , कुठेतरी वाचली आहे असं वाटत होतं . प्रमोदकाकांच्या आणि तुमच्या प्रतिसादावरून लक्षात आलं सगळं..
आवडलं विडंबन्/कविता.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
हे हे हे
यक नंबर !
अवांतर :- 'अत्यंत प्रभावी कविता, वाचता वाचता झोप यायला लागली' असे लिहिले तर मार बसेल काय ?
झोपाळु
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
वशिल्याचा सूर, 'रंगा' म्हणे दूर
गाजे भरपूर, जिथेतिथे..
वा रंगा..!
तात्या.
ओव्या आवडल्या,वास्तव एकदम नेमक्या शब्दात चपखल मांडलं आहे,
स्वाती
कलत्या दुपारी, टेबलाच्या तीरी
पेंगतो मुरारी, मंद पहा..
खी खी खी !!!
टकल्या बेरका, उनाड वाळका
सारे एकमेका, टाळी देती..
लै भारी !
स्वगत: हा कवी लैच चाप्टर दिसतो ! काय बारकावे हेरत असतो.
-दिलीप बिरुटे
सही !!
(|: =)) =)) क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
रंगाशेठ,
ही कविता कशी काय सुटली आमच्या नजरेतून..
उत्तम चलु आहे चालू दे..
(बहुतेक तुमच्या सारख्याच मी पेंगा काढत असणार)
(डुलक्या)केशवसुमार
वा वा