वडील

बहुगुणी जे न देखे रवी...
महिनाभर सुटी काढून आलो होतो भारतात पंचाहत्तरी विसरून उत्साहाने राहिलात एकच शल्य मनात परत येतांना वाढले फक्त तुमच्या सान्निध्यात मी किती क्षण काढले? वय विसरून विमानतळास पोचवायला निघालात "आलास, भेटलास, हेच पुरेसं" म्हणालात एव्ह्ढंसं कुठे नाव झालं सार्‍या सिनीयर सिटिझन्सना कळवलंत तुमच्या साठी मात्र वेळ नव्हता "दगदग होते हो त्याची" म्हणत सांभाळलंत दरवर्षी घरी येताना खूप सुखवेन म्हणतो मात्र परत जाताना काळाची भीती आणतो काय करतोय जगावेगळं? कसलं ध्येय? कसलं नाव? सोडून द्यावं सगळं, सगळं आता घ्यावी घरी धाव
वर्गीकरण
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

19 टिप्पण्या 6,827 दृश्ये

Comments

प्राजु नवीन

काय करतोय जगावेगळं? कसलं ध्येय? कसलं नाव? सोडून द्यावं सगळं, सगळं आता घ्यावी घरी धाव रोज येतं हेच मनांत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चन्द्रशेखर गोखले नवीन

अतिशय भावुक झालो ! फार आवडली..

सहज नवीन

>सोडून द्यावं सगळं, सगळं आता घ्यावी घरी धाव एक रक्कम / तारीख ठरवा आणी होउन जाउ दे. शुभेच्छा!

बहुगुणी नवीन

अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद!

मदनबाण नवीन

कविता फार आवडली. :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

समिधा नवीन

खुप आवडली कविता.खुप जणांच्या मनातली आहे कविता. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

राघव नवीन

मी तर पुण्यात असूनही नागपूरची आठवण येते.. बाहेरदेशी राहतांना काय वाटत असेल! मनापासून आवाडली कविता! मग केव्हा येताय परत?? :) राघव

मीनल नवीन

मानातल लिहिल आहे. लांब राहून एक अपराधी भावना मनात डसत राहते सारखी. आपण काहीतरी चूकतो आहे असच वाटत.प्रेम घ्यायला ,द्यायला, कर्तव्याला सोडून द्यावं सगळं, सगळं आता घ्यावी घरी धाव हेच वाटत राहत. मीनल.

बिपिन कार्यकर्ते नवीन

प्रतिक्रिया देत नाहीये... जस्ट वडिलांना फॉरवर्ड केली आहे... बिपिन कार्यकर्ते

अनामिक नवीन

काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नाहीये.... मनातल्या भावना अगदी सहज उतरल्या आहेत. जवळ्-जवळ सगळ्याच पाल्य आणि पालकांची हीच परिस्थिती आहे! -अनामिक

क्रान्ति नवीन

अगदी खास मनातली मनापासूनची कविता खूप खूप आवडली. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

llपुण्याचे पेशवेll नवीन

खूपच छान. :( पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

जयवी नवीन

खूपच आवडली. कालच "ओढ माहेरची" म्हणून एक लेख पोस्ट केलाय इथे. http://misalpav.com/node/7800 सगळे हेच भाव. अगदी मनातलंच वाचल्यासारखं वाटलं .