अनवधानातील गमतीजमती . . .
गुडघेदुखीचा रुग्ण आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत. आता आलेले डॉक्टर त्याची विचारपूस करतात. त्याने आपल्या गुडघ्याबद्दलची प्रगती डॉक्टरांना सांगितली अन त्याची नोंद करताना डॉक्टर लिहून गेले :
On the second day the knee was better, and on the third day it
disappeared.
. .
सर्जन मंडळींना शरीरातील विविध ग्रंथींची (glands) तपासणी करावी लागते. त्यामध्ये प्रामुख्याने थायरॉईड, स्तन आणि प्रोस्टेट यांचा समावेश असतो. एखाद्या खूप गर्दीच्या दिवशी या तिन्ही प्रकारचे अनेक रुग्ण जर हाताळले असतील तर डोक्यात आजारांची अगदी सरमिसळ होऊ शकते.
प्रोस्टेटच्या तपासणीसाठी संबंधित पुरुषाला कुशीवर झोपवून त्याच्या गुदद्वारात डॉक्टरांनी बोट घालून त्या ग्रंथीचा अंदाज घ्यायचा असतो. एक मूलभूत तपासणी म्हणून तिचे महत्त्व आहे. एकदा प्रोस्टेटसाठी म्हणून अशी तपासणी केल्यानंतर एक सर्जन बघा काय लिहून गेलेत :
Rectal examination revealed a normal sized thyroid !!
कुठे प्रॉस्टेट, कुठे ती दूरवरची थायरॉईड, पण गफलत झाली आहे खरी. हे वाचल्यानंतर एकाने आणि त्यावर विनोद केला,
“अरे बापरे ! या डॉक्टरांचे बोट एवढे लांब आहे काय” !!
. . .
रुग्णालयातील तातडीच्या वैद्यकीय सेवेचा विभाग नेहमीच गजबजलेला असतो. तिथे असंख्य प्रकारचे वेदनाग्रस्त रुग्ण येतात. त्यांच्या शारीरिक तपासणीबरोबर काही मूलभूत चाचण्यांची सोय तिथे केलेली असते. अशाच एका महिला रुग्णाला x-ray वगैरे तपासण्या करून काही विशेष न निघाल्याने घरी पाठवून देण्यात आले होते. त्याची डॉक्टरांनी केलेली ही नोंद :
While in the Emergency room, she was examined, x-rated and sent home.
..
बद्धकोष्ठाची समस्या तर अनेकांच्या पाचवीलाच पुजलेली असते. या विकारावर निरनिराळे उपचार करून रुग्ण देखील कंटाळलेले असतात. अशाच एक बाई डॉक्टरांकडे नियमित यायच्या. त्यातून परिचय वाढल्याने डॉक्टरनी त्यांच्याशी व्यक्तिगत स्वरूपाच्या गप्पा देखील मारल्या होत्या. एकदा त्या उपचारासाठी येऊन गेल्यानंतर डॉक्टर अवचितपणे लिहून गेले :
She stated that she had been constipated for most of her life,until
she got a divorce.
. .
मनोरुग्णांच्या नोंदींमध्ये तर अनेक उलटीपालटी वाक्ये बऱ्याचदा आढळतात. अनेक रुग्णांवर दीर्घकालीन उपचार चालू असतात. एका डॉक्टरांनी नैराश्याच्या रुग्णाबाबत केलेली ही टिपणी :
The patient has been depressed since she began seeing me in 1993.
वाक्यरचना गंडलेली .
….
रुग्णालयातील बहुतेक रुग्णांच्या भरपूर प्रयोगशाळा तपासण्या होतातच. लॅबमधून वॉर्डात रिपोर्ट आले की ज्या त्या रुग्णानुसार त्या रिपोर्टचा गोषवारा मुख्य केसपेपरमध्ये लिहिणे हा एक वेळखाऊ उद्योग असतो. एका रुग्णाच्या यकृताच्या आरोग्यासंबंधीचा टेस्ट रिपोर्ट लिहिताना हे डॉक्टर काय लिहून गेलेत बघा :
The lab test indicated abnormal lover function.
एका महत्त्वाच्या शब्दाच्या एकाच अक्षराने चुकलेल्या स्पेलिंगमुळे छानपैकी विनोद होऊन गेला खरा !
..
आणि आता शेवटी शारीरिक तंदुरुस्ती विभागात एक फेरफटका. अनेक संस्थांमधून विशिष्ट कामासाठी नेमणूक करताना शारीरिक तंदुरुस्तीचा दाखला अधिकृत रुग्णालयाकडून मिळवावा लागतो. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांमध्ये अर्थातच निरोगी लोकांचा भरणा जास्त असतो. त्यांच्या काही तपासण्या करून काही सुप्त दोष निघतोय का ते पाहणे हे डॉक्टरांचे काम. सर्व तपासण्या केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा एकंदरीत आढावा घेणारा गोषवारा शेवटी लिहितात. एका मध्यमवयीन व्यक्तीच्या बाबतीत अशी नोंद केली गेली :
Patient has two teenage children, but no other abnormalities.
..
असं आहे हे गमतीदार संकलन. डॉक्टरांच्या सहकारी असलेल्या नर्सेस आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या टिपणांमध्येही अशी 'वेचक रत्ने' सापडतात - त्यांची जातकुळी थोडीफार वेगळी. कळत नकळत अशा चुका हातून होणे हा मानवी गुणधर्म आहे. इंग्लिशमधील नोंदींच्या बाबतीत वरवर पाहता असं वाटू शकेल की ती मातृभाषा नसलेल्या लोकांकडून अशा चुका होतात. परंतु असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. या चुकांची व्याप्ती पाश्चात्य जगतासह अगदी जागतिक आहे ! जालावर त्याचे असंख्य नमुने वाचायला मिळतात.
संपूर्ण संगणकीकरण झालेल्या रुग्णालयांमध्ये देखील अशा नोंदींची अचूकता दाद द्यावी इतकी नाही. हस्तलेखन असो अथवा संगणक टंकन, या दोन्ही कृती करणारा शेवटी माणूसच असतो. स्पीच टायपिंगच्या वाढत्या वापरानंतर तर काही नव्या प्रकारच्या चुका आढळू लागल्यात (बोलायला गेलो एक. . .). जोपर्यंत अशा चुकांनी कुठल्याही निर्णय प्रक्रियेवर परिणाम झालेला नसेल तोपर्यंत काळजीचे कारण नाही. अनवधानातून अकस्मात झालेले मनोरंजन अशा दृष्टीकोनातून त्यांच्याकडे पाहता येईल.
तसंही कामाच्या व्यापतापाने शिणलेल्या मनांना अशा घटकाभर विरंगुळयाची अधूनमधून गरज देखील असते. सातत्याने होणाऱ्या काही भाषिक गफलती आणि विनोदांमधून कधीकधी बोलीभाषेला नवे वाक्प्रचारही मिळून जातात. अनेक अभ्यासक्रमांच्या लेखी व तोंडी परीक्षांदरम्यान कधीकधी भले भले विद्यार्थी सुद्धा एखादी गफलत किंवा घोडचूक करून बसतात आणि त्यानंतर दुसऱ्याच क्षणी सावरून स्वतःच्या कपाळावर हात मारून घेण्याची वेळ त्यांच्यावर येते. तणावपूर्ण वातावरणाचा तो परिणाम असतो.
वैद्यकीय वगळता अन्य कार्यक्षेत्रांमध्ये देखील या प्रकारच्या मौजमजा होत असणार. वाचकांनी त्याबद्दलचे आपापले अनुभव प्रतिसादातून लिहिल्यास लेखातून झालेले मनोरंजन द्विगुणीत होईल.
**********************************************************************तसंही कामाच्या व्यापतापाने शिणलेल्या मनांना अशा घटकाभर विरंगुळयाची अधूनमधून गरज देखील असते.होय होय मी जेव्हा पेपर चेकिंगला जायचे ,तेव्हा खुप खुप अशी गमतीशीर उत्तर सापडायची.मग आम्ही सगळे शिक्षक उत्तरं वाचून खूप हसायचो.खुप काळ लोटला.इतकं आठवत नाही पण एकदा दोनदा दोन पानांच्या उत्तरात सुरूवातीला थोडं उत्तर मध्ये पानभर कुठले तरी सिनेमाचं गाणं नंतर परत शेवटी चार ओळी काहीतरी उत्तर लिहिले होते. एकजणाने खुप गरीब आहे,नापास झालो तर जीव देईन,पास करा अशी दीनवाणी लिहिली.पण तो नापासच झाला..किती क्रूर होते मी ;) आता परीक्षा ऑनलाइन आणि NEP मुळे कमी मार्काची प्रश्नपत्रिका आहे.ती खरडघाशीची गम्मत संपली.
In reply to माणूसच अशा गमतीशीर चुका करणार by Bhakti
अशी दीनवाणी लिहिली.पण तो नापासच झाला>> ओ हो ! एकेकाळी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला काही विद्यार्थी सातत्याने नापास होत. त्यांच्या पेपरांमधून अशा बऱ्याच करामती होत असल्याचे (अगदी पैशांची नोट टाचून ठेवण्यापर्यंत) ऐकलेले आहे.
In reply to गमतीदार.. हसू आले. by गवि
गंभीर चुका, ज्यातून पुढील ट्रीटमेंट चुकू शकेल>> महत्त्वाचा मुद्दा ! जिथे अक्षम्य चूक झालेली असेल तिथे संबंधितांना कानपिचक्या मिळण्यापासून ते कायदेशीर कारवाई होण्यापर्यंत परिस्थितीनुसार काहीही होऊ शकते. एका वेगळ्या क्षेत्रातले उदाहरण इथे पूर्वी लिहिलेले आहे. लेखक ह मो मराठे दैनिकात काम करीत असताना त्यांच्या हातून अल्सरच्या ऐवजी कॅन्सर लिहीले गेल्याने त्यांची नोकरी गेली होती.
In reply to हाहाहा!! by राजेंद्र मेहेंदळे
अमृत मासिकात मुद्रा राक्षसाचा विनोदहो हो.. तू उगीच चहात पाय गाळतोस. बंदूक घेऊन पळणाऱ्या सशाचा पाठलाग करताना.. माननीय मंत्र्यांना पाच सुवासिनींनी आवळले. इत्यादि.
In reply to मस्त मस्त ! by हेमंतकुमार
In reply to मस्त by चंद्रसूर्यकुमार
In reply to मस्त by चंद्रसूर्यकुमार
In reply to रिड्युसिंग रिड्युसिंग by चंद्रसूर्यकुमार
In reply to अगदी अगदी by स्वधर्म
In reply to ओके. कानडी लोक मराठी बोलताना by कानडाऊ योगेशु
In reply to छान छान ! चालू चालू !! by हेमंतकुमार
नजरे करूननजरेखालून असे वाचावे.
In reply to इंग्रजी / मराठी शब्द by कुमार जावडेकर
'बॅकसाइड'ला भेटबरोबर ! हा भारतीय घोळ पण नेहमीचा. मध्यंतरी मी एका जुन्या इंग्लिश कादंबरीत backside passage हा शब्दप्रयोग वाचला. त्याचा अर्थ आहे शौच. आता भारतीय इंग्लिशमध्ये या 'passage' साठी काही वेगळे निघाले आहे का ते पाहावं लागेल !
“आता मी नटवर्य दाते यांना ही चांदीची पीकदाणी अर्पण करीत आहे !!”दुसऱ्या दिवशीच्या सर्व छापील वृत्तपत्रांमध्ये ही बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली होती यात नवल ते कसले? ( भयंकर सुंदर मराठी भाषा या पुस्तकातून साभार )
बर्नार्ड Shaw तर ह्या बाबतीत खूप आग्रही होते आणि त्यांनी त्यासाठी निधी देखील ठेवलेला आहे.यावरनं फिश चं स्पेलिंग ghoti होतं, हा किस्सा आठवला. जॉर्ज बर्नार्ड शॉच्या मते फिश मधल्या फ चा उच्चार enough मधल्या gh सारखा होतो. ई चा उच्चार women मधल्या o सारखा होतो. आणि श चा उच्चार nation मधल्या ti सारखा होतो. म्हणून फिश चं स्पेलिंग = फ + ई + श = gh + o + ti = ghoti असं होतं. आ.न., -गा.पै.
In reply to फिश चं स्पेलिंग घोटी होतं by गामा पैलवान
In reply to मजेशीर किस्से by नपा
Readers Digest मध्ये येणाऱ्या विनोदांचीहोय, अगदी भारी असायचे. अलीकडे इंग्लिश शब्द आणि वाक्प्रचारांच्या (बिनडोक) मराठी गुगल भाषांतराने त्यांची जागा घेतलेली आहे. बहुतेक इ-वृत्तपत्रांमध्ये मूळ इंग्लिशचा मथितार्थ लक्षात न घेता यांत्रिक गुगल भाषांतरे येतील तशी प्रकाशित केली जातात आणि त्यातून बरेच विनोद होतात. काही उदाहरणे : १. fruit bat = फळ फलंदाजी २. " . . . चर्चेदरम्यान पाश्चिमात्य देश कशाचाही विचार करू शकत नाहीत. हा एक मृत अंत आहे".

In reply to थोडेफारच? सगळे नाही? by अनामिक सदस्य
In reply to थोडेफारच? सगळे नाही? by अनामिक सदस्य
In reply to सगळेच धोके कुणी ओळखू शकतो का? by असंका
सगळेच धोके कुणी ओळखू शकतो का? भुकंप झाला तर काय? डॉक्टरला स्वतःलाच काही झालं तर काय? वरून बॉंब पडला तर काय?
अरे हा प्रश्न तर मला सलून मध्ये अर्धी दाढी किंवा कटिंग झाली की पडतो.
भूकंप झाला, कारागीराला अॅटॅक आला, रस्त्यावरुन ट्रक सलूनमध्येच घुसला, बॉम्ब पडला तर आपल्या अर्ध्या दाढीचे कसे? मला तर सेफ्टी रेझरची सवय. सलूनमध्ये वस्तरा असतो. तो काही मला चालवता येत नाही. मग अर्धी दाढी मिशा घेऊन घरी जायचे का? बर त्या सर्व संभावित दुर्घटनेमधे माझ्या जीवाची काळजी नाही येत मनात. येते ते फक्त अर्धीच दाढी किंवा कटिंग झाली तर कसे?
अद्याप तसे काही झालेले नाही पण काळजी वाटायची थांबली नाही ना त्याने.In reply to युथ इन एशिया by चंद्रसूर्यकुमार
माणूसच अशा गमतीशीर चुका करणार