पहिलीपासून हिंदी निर्णय की राजकीय हत्यार ?
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to शक्यता आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि by सुबोध खरे
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/somaiya-accuses-minister-mushrif-of-over-100-cr-corruption/articleshow/86178643.cms?from=mdr
पुलवामा असो ,उरी असो वा आताचे ऑपरेशन सिंदूर, भाजपा नेत्यांबद्दल नेहमीच संशय निर्माण होतो.
In reply to सध्याचा प्रश्न आहे तो मुंबई by कंजूस
In reply to दिंडी का रांडा होणार ते लवकरच कळेल. by कर्नलतपस्वी
In reply to जय महाराष्ट्र ते जय गुजरात by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to शरद पवार, उद्धव आणि आदित्य by रात्रीचे चांदणे
In reply to जय महाराष्ट्र ते जय गुजरात by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जय महाराष्ट्र ते जय गुजरात by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to माणसं सत्तेसाठी आणि by सुबोध खरे
In reply to पूर्ण राजकीय निर्णय by चंद्रसूर्यकुमार
In reply to तुम्ही म्हणता तस खरंच झालं by रात्रीचे चांदणे
एवढं सगळं करण्यापेक्षा गेल्या सहा सात वर्षात मुंबईकरांचे जे काही प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला असता तर बरं झालं असतं की? त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीस धरायची कांय गरज होती?याविषयी मला तरी काही सांगता येणार नाही. मी भाजप समर्थक आहे हे जगजाहीर असले तरी मी पक्षाचा प्रवक्ता नाही त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट केली तर ती का केली किंवा केली नाही तर का केली नाही याविषयी मी माझे तर्क मांडू शकतो- पक्षाची भूमिका नाही. बाकी स्थानिक पातळीवर सगळे चोर असतात. कोणत्याही पक्षाला स्थानिक पातळीवर खरोखरच काही करावे असे वाटते असे मला तरी वाटत नाही. आज मुंबईत काही शे ठिकाणी मोठमोठ्या टॉवर्सचे बांधकाम सुरू आहे. एकेक फ्लॅट तीन-चार कोटींचे आहेत. म्हणजे किती हजार कोटींची उलाढाल तिथे नुसत्या टॉवर्सच्या बांधकामात चालली आहे याची कल्पना करता येते. सध्या कोणाचा किती टक्के रेट आहे कल्पना नाही पण बर्यापैकी असावा. इतका मलिदा कोणी सोडेल याची खात्री सोडाच अपेक्षाही नाही. त्यामुळे असेच मोठेमोठे टॉवर बनत राहणार आणि पुढील तीसेक वर्षात मोठ्ठा पूर येऊन हे शहर बुडणार. त्यामुळे महापालिकेत कोणीही सत्तेत आले तरी त्यात बदल होईल याची मला तरी अपेक्षा नाही. राजकीय दृष्टीने तो निर्णय का घेतला असेल याविषयी वर लिहिलेच आहे. तसाही हा निर्णय यावर्षी अंमलात येणे कठीणच होते. एप्रिल-मे मध्ये निर्णय झाला आणि जूनपासून लगेच अंमलबजावणी तशीही सुरू होणार नव्हती. त्यामुळे समजा ठाकरेंनी थंड घेऊन भाजपचा पोपट केला असता तर मग सगळा धुराळा खाली बसल्यावर शांतपणे तो निर्णय मागे घेतला असता. त्यात आजच राजन विचारेंच्या कार्यालयात मराठी बोलले नाही म्हणून काही दुकानदारांना कानफाटवल्याचा व्हिडिओ ट्विटरवर बघितला. ते बघून फडणवीसांना मनातल्या मनात गुदगुल्या होत असतील.
In reply to तुम्ही म्हणता तस खरंच झालं by रात्रीचे चांदणे
In reply to पूर्ण राजकीय निर्णय by चंद्रसूर्यकुमार
In reply to पूर्ण राजकीय निर्णय by चंद्रसूर्यकुमार
In reply to पूर्ण राजकीय निर्णय by चंद्रसूर्यकुमार
In reply to नामी संधी by चंद्रसूर्यकुमार
इतकी वर्षे उबाठासेनेने मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे तोंडदेखले लावून धरले होते. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांचा खरा संबंध नव्हताच याविषयी मिपावर अनेकदा चर्चा झाली आहे तेव्हा त्याविषयी परत लिहित नाही.अजिबात लिहू नका, असे वाटते. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा स्व.बाळासाहेब ठाकरेंनी लावला. हिंदूत्ववादी संघटना म्हणूनच स्व.बाळासाहेब ठाकरें यांच्या शिवसेनेची ताकद होती. भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले. 'जेवायला ताट द्यावे, पण बसायला पाट देऊ नये' अशी म्हण आहे. ताट आणि पाट दोन्ही दिल्यामुळे भाजप डोईजड झाली. महाराष्ट्रातून हिदुत्ववादी म्हणजे आम्हीच अशी इमेज शिवसेनेची कमी होत गेली. आणि भाजपचं फावलं अर्थात हिंदुत्ववाद्यांचा आणि धर्माचा वापर केवळ मतांसाठीच उपयोग होतो. स्पेशल हिंदूमाणसासाठी रुपयाचा फायदा नाही, हे मागील लोकसभेत लोकांच्या लक्षात आलं आहेच. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे
In reply to सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व by सुबोध खरे
In reply to २१ वर्षे by चंद्रसूर्यकुमार
In reply to भाजपने सेनेचं बोट धरुन by सुबोध खरे
भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले.याविषयी मिपावर यापूर्वी अनेकदा वेगवेगळ्या प्रतिसादांमध्ये लिहिले आहे. त्यातील एक तरी मुद्दा चुकीचा आहे हे सिद्ध करता येईल का? १. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनसंघाला पूर्ण देशात ४ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी अर्ध्या- म्हणजे दोन जागा आताच्या महाराष्ट्रातून आल्या होत्या. त्या होत्या- रत्नागिरीतून प्रेमजीभाई असर आणि धुळ्यातून उत्तमराव पाटील. तेव्हा शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता. ज्या काळात काँग्रेसच्या नावावर दगडही निवडून यायचा त्या काळात एका राज्यातून दोन लोकसभेच्या जागा जिंकणे ही तितकी सोपी गोष्ट नव्हती. ती जनसंघाने केली होती. २. १९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती? ३. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती? या जागा राज्याच्या वेगवेगळ्या भागात होत्या हे लक्षात घ्यायला हवे. ४. जनसंघाने महाराष्ट्रात १९६७ च्या निवडणुकांमध्ये ४, तर १९७२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ५ जागा जिंकल्या होत्या. भाजपची स्थापना झाल्यावर १९८० आणि १९८५ मध्ये अनुक्रमे १२ आणि १६ जागा जिंकल्या होत्या. त्याउलट शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षांच्या काळात महाराष्ट्र विधानसभेत फक्त चार आमदार निवडून आणले होते आणि ते सगळे मुंबईतूनच होते. मुंबईबाहेर त्यांची ताकद शून्य होती. ते चार आमदार होते- १९७० मध्ये परळमध्ये पोटनिवडणुकीत वामनराव महाडिक, १९७२ मध्ये विधानसभा निवडणुकीत गिरगावमधून प्रमोद नवलकर, १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत माझगावमधून छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत पार्ल्यातून रमेश प्रभू. तुलनाच करायची झाली तर २०२२ मध्ये एकाच निवडणुकीत केजरीवालांच्या आपने दिल्लीतून येऊन गुजरातच्या वेगवेगळ्या भागात मिळून ५ जागा जिंकून दाखविल्या होत्या. आणि शिवसेनेने १७ वर्षात तब्बल चार आमदार आणि ते पण सगळे मुंबईतून. ५. १९८४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे नेते भाजपच्या कमळ या चिन्हावर लढले होते. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह १९९० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळाले. ते पण का मिळाले? तर १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विद्याधर गोखले मुंबईतून लोकसभेची जागा जिंकले- भाजपशी युती असताना. १९८९ मध्ये शिवसेनेचे इतर तीन खासदार निवडून आले होते- वामनराव महाडिक, औरंगाबादमधून मोरेश्वर सावे आणि परभणीतून अशोक देशमुख. त्यांना तर निवडणुक आयोगाने शिवसेना या पक्षाच्या नावावर निवडणुक लढूही दिली नव्हती आणि ते अपक्ष म्हणून निवडणुक लढले आणि जिंकले. १९८५ मध्ये छगन भुजबळ जिंकले ते मशाल या चिन्हावर. १९८५ च्याच महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना सगळ्या वॉर्डांमध्ये एकच चिन्ह नव्हते त्याचे कारण केंद्रीय निवडणुक आयोगाने कोणतेही चिन्ह तेव्हा शिवसेनेला दिलेच नव्हते त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठीही एकच चिन्ह शिवसेनेच्या उमेदवारांना नव्हते. आणि असल्या पक्षाने महाराष्ट्रात भाजपला मोठे केले. घंटा.
In reply to घंटा by चंद्रसूर्यकुमार
In reply to खोटं बोल रेटून बोल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुंबईत शिवसेनेची स्व. बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापना केल्यानंतर, पहिल्या चार पाच वर्षात चार-पाच आमदार निवडून आले.कोणते चार-पाच आमदार हो? कोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते?
भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० झाली.भाजप हाच पूर्वाश्रमीचा जनसंघ होता हे तुमच्यासारख्या झंटलमन प्रा.डॉ ना माहित नाही?
पहिल्या काही काळात दहा-पंधराच्या वर कधी भाजपाच्या आमदारांची संख्या गेली नाही.बरं मग? आणीबाणीपूर्वी जनसंघाची सर्वोत्तम कामगिरी लोकसभेत होती ३५ खासदार- १९६७ मध्ये. सुरवातीला असाच संघर्ष करत, झगडत भाजप आज आहे तितका मोठा झाला आहे. पण शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षात केवळ चार आमदार निवडून आणले होते हे माझे म्हणणे खोडून काढून दाखवा आधी.
महाराष्ट्राच्या भूमीत कधीच भाजपाला पोषक वातावरण नव्हतं.तसंच गुजरातमध्ये नव्हते, कर्नाटकात नव्हते, त्रिपुरात नव्हते, हरियाणात नव्हते. अनेक राज्यांमध्ये नव्हते. आज गुजरात भाजपचा बालेकिल्ला आहे. त्रिपुरात दोन विधानसभा निवडणुका सलग भाजपने जिंकल्या आहेत. कर्नाटकातही पक्षाचे सरकार पूर्वी होते. लोकसभेत राज्यात २८ पैकी २५ जागा जिंकण्यापर्यंत पक्षाने मजल मारली आहे. या सगळ्या राज्यांमध्ये भाजपने इतकी मोठी मजल मारलीच ना? मग पूर्वी कधीतरी भाजपला पोषक वातावरण नव्हते याचा नक्की काय रेलेव्हन्स आहे?
कॉंग्रेस आणि विविध पक्षांया काळात भाजपाला महाराष्ट्रात कुत्रही विचारत नव्हतं.जसं काही शिवसेनेला हत्ती-घोडेच पालख्या घेऊन आले होते विचारायला. हॅ हॅ हॅ
दहा पंधराच्या पुढे कधीही न गेलेल्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा स्व. बाळासाहेबांच्या हिंदूत्व आणि मराठीच्या युतीला १९९० ला भाजपाच्या विधानसभेच्या जिंदगीत ४२ जागा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हाही स्व.बाळासाहेबांच्या बुलंद तोफेमुळे शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या हा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास आहे.हे टिपीकल वागळे छाप आर्गुमेन्ट झाले. १९८४ ते १९८९ या काळात भाजपने राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या २ जागांवरून ८६ जागांपर्यंत मोठी उडी मारली होती. तेव्हा महाराष्ट्राबाहेर कोणते बाळासाहेब मदतीला होते? त्या काळात रामजन्मभूमी आंदोलन तापले आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. बरं १९९० मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाली त्याचवेळेस गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातही विधानसभा निवडणुक झाली होती. इतर राज्यांमध्ये भाजप पूर्वीच्या तुलनेत कुठे गेला हे माहित आहे का? गुजरातमध्ये ११ वरून ६७, मध्य प्रदेशात ५८ वरून २२०, राजस्थानात ३९ वरून ८५ तर हिमाचल प्रदेशात ७ वरून ४६. त्या राज्यांमध्ये कोणते बाळासाहेब मदतीला आले होते? १९९० मध्ये महाराष्ट्रात भाजपने २८८ पैकी ११४ जागाच लढविल्या म्हणून ४२च निवडून आल्या. शिवसेनेला १७४ जागा द्यायची अवदसा आठवली नसती तर स्वबळावर ७० पर्यंत जागा तेव्हाच भाजपच्या आल्या असत्या असा माझा दावा आहे. कारण इतर राज्यांमध्ये भाजपने तशीच मोठी उडी मारली होती. ती महाराष्ट्रात मारता आली नसती असे म्हणायला काहीही कारण नाही. तरीही तुमचा मुद्दा असेल की शिवसेना बरोबर होती म्हणून भाजप १६ वरून ४२ वर गेला तर मग त्यावर माझे काऊंटर आर्ग्युमेंट हे की भाजप बरोबर असल्यामुळे शिवसेना २ (१९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत जिंकलेले छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत जिंकलेले रमेश प्रभू) वरून ५२ वर गेला. जाऊ द्या प्रा.डॉ. असल्या निवडणुकीच्या आकड्यांवर माझ्याशी चर्चा करायला येऊच नका. नाही झेपायचे तुम्हाला. तुम्ही आपले कुसुमाग्रजांच्या कवितांमधील सामाजिक आशय वगैरे विषयांमध्ये रमता तेच ठीक आहे.
In reply to :) by चंद्रसूर्यकुमार
विषय महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचं बोट धरुन मोठं झालेल्या भाजपाचा सुरु असतांना. लोकसभेचा आणि वाटचालीचा काय संबंध आहे..कसं आहे-महाराष्ट्रात काय झाले याची आकडेवारी वरील प्रतिसादात दिली होती ती तुम्हाला समजली नसावी म्हणून मग इतर राज्यातील आणि लोकसभेतीलही द्यावी लागली.
शिवसेनेबरोबारच्या युतीमुळेच दहा पंधराचे ४२ झाले हे मान्य होत नसल्यामुळे 'भक्तछाप' विधाने करावी लागतात.या म्हणण्यात थोडेही तथ्य नाही हा माझा मुद्दा मी अनेकवेळा मांडला आहे. परत मांडणार नाही.
पुन्हा तेच लोकसभेचं तुणतुणे एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना होऊनही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय मजल मारू शकले नाही हे जगमान्य आहे.घंटा
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेली भाजपची आपली आकडेमोड़ पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्या शाब्दिक पोचा-यांच्या चर्चा अजिबात वाचत नाही.ते आकडे माझेच नाही तर सगळ्याच पोलवाल्यांचे चुकले होते. बाकी माझ्या शाब्दिक पोचार्यांच्या चर्चा वाचत नसाल तर मग प्रतिसाद द्यायला का येता? याचा अर्थ एक तर तुम्ही खोटं बोलत आहात- म्हणजे तुम्ही ज्याला शाब्दिक पोचारे म्हणता ते वाचता इतकेच नव्हे तर त्याच पोचार्यांमधील एकेक वाक्य उधृत करून त्याला प्रतिसादही देता. तसे असेल तर मग वाचत नाही असे खोटे का बोलता? तुमच्या विद्यार्थ्यांना पण असेच खोटे बोलायला शिकवता का? समजा तुम्ही खोटं बोलत नसाल- म्हणजे माझे शाब्दिक पोचरे वाचत असाल तरीही वाचत नाही असे लिहित असाल तर मग कदाचित तुमची मराठी भाषेची समजच कमी असावी. कोणी दिली तुम्हाला मराठीत पी.एच.डी?
In reply to घंटा by चंद्रसूर्यकुमार
In reply to घंटा by चंद्रसूर्यकुमार
In reply to @ चंद्रसूर्यकुमार by सुबोध खरे
In reply to +१ by चंद्रसूर्यकुमार
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रमोद नवलकर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to @चंद्रसूर्यकुमार by सुबोध खरे
In reply to मराठी माणसाच्या नावाने by सुबोध खरे
In reply to मराठी माणसाच्या नावाने by सुबोध खरे
माझा भाऊ गेली ३५ वर्षे दोन कारखाने चालवतो.आणि
मराठी म्हणून फार दिवस तो असे लाड करू शकेल असे वाटत नाहीखरे सर .दोन्ही विधाने परस्परविरोधी वाटताहेत.
In reply to मराठी माणसाच्या नावाने by सुबोध खरे
In reply to अरे देवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to भरीव काही दिसलं नाही by सुबोध खरे
In reply to प्रिय काका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रिय काका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to भरीव म्हणजे काय रे भाऊ? by युयुत्सु
In reply to ते नितीन नांदगावकर आहेत, by अमरेंद्र बाहुबली
In reply to काय पण करतात लोक. त्यावर अजुन by सुक्या
In reply to प्रिय काका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे मास्तर by सुबोध खरे
In reply to लवकर बरे व्हा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to धाग्याचे काश्मीर करु नये by कपिलमुनी
हम्म