पानिपत आणि शेरलॉक होम्स
पानिपत आणि शेरलॉक होम्स
बेकर स्ट्रीटवर २२१बी पाशी बग्गी थांबली. मजल्यावरील खिडकीतून डॉ वॉटसननी डोकावून पाहिले. ओव्हर कोट मधील शेरलॉक होम्स उतरताना त्यांनी पाहिले. त्यांच्या मनात आले आज कोणत्या केसवर काम चालू आहे ते कळेल.
हॅट, ओलसर ओव्हरकोट रॅकवर लटकला. ईझीचेयरचा कुरकूकता आवाज करून शेरलॉक बसले.
गोलाकार पाईप स्टँडमधून एक सीटर पाईप हातात घेऊन त्यांनी टोबॅको पाऊच मधील तंबाखू पाईपच्या चेंबरमधील बाऊलमधे भरली. घट्ट दाबून बसायला प्रेसरवर जोर दिला.
पहिला धूर नाकातून येताना पाहून वॉटसनला कळले की आज नवी केस हातात आली आहे…
'यू सी, माय डियर वॉटी',
'ओरिएंटल मॅप्स, पिक्चर्स ऑलवेज फॅसिनेट मी. लुक धिस वन. गॉट इट फ्रॉम डॅनीज कलेक्शन्स ऑन पॅनिपात बॅटल… '
'ओह, डोंट मेक बॅफल्ड फेस वॉटी…!'
झालं आणि त्यांच्यात चर्चा रंगली. 'आपल्या लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीतील हे चित्र आहे.. विंको ओक रिटायर्ड फ्रॉम एयर फोर्स आहेत. ही इज् फॅसिनेटींग पर्सन. ते इतिहासकार काय म्हणतात त्यापेक्षा नकाशे फिक्चर्स तुमच्याशी संवाद साधताना काय दिसते, उमगते यावर भर देतात'.
डॉ वॉटसननी चित्र आपल्याकडे ओढून पाहिले. बरीच गिचमिड असलेल्या काळेपांढऱ्यारंगात जनावरे, लष्करी हत्यारे धरून असलेले शिपाई वगैरे मधून काही अर्थबोध होत नाही असे वाटून ते चित्र परत शेरलॉक यांच्याकडे तोंड करून ठेवले.
'लूक, १७६१ साली मराठाज व दुर्रानी अहमद शा यांच्यात पॅनीपात गावाजवळ एक बॅटल खेळले गेले. त्याचे ते डीटेल चित्र आहे. मॅनोज डॅनी ने ते त्यांच्या “इन लाईट ऑफ रिडिसकव्हर्ड पानिपत बॅटल” पुस्तकात छापले आहे. शॅशी ओक सेंट इट टू मी'.
‘ओह आय् सी!’ डॉ वॉटसननी ते चित्र जवळून पहायला सुरवात केली. ‘तो अफधाली रंगीत करून दाखवलाय. लहान मोठ्या तोफांचे तांडे बार उडवत हवेत धुराचे लोट उठवत आहेत. हत्तीवरून काही सरदार ते पहात आहेत. सॉर्ट ऑफ डिंगडाँग बॅटल. एम् आय् करेक्ट’?
'ओ दॅट्स फाईन, वंडरफूल, सर्च, सर्च मोअर... !'
‘डिड यू नोटिस, लेफ्ट साईड डाऊन कॉर्नर’?
‘नो’!
‘हॅव ए क्लोज लुक माय डियर, डॉक्टर वॉटसन ! तिथे एक वेगळेच 'डिंगडाँग' चालले आहे!'
'कुड यू लोकेट? व्हॉट इज् दॅट’?
'विंग कमांडर ओक रिक्वेस्टेड् कि या चित्रातील या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध कसा लावायचा? तो छडा मी लावावा. पत्र पाठवून ते मला म्हणतात, "सर शेरलॉक होम्स, तुम्ही ही केस हातात घेऊन सॉल्ह करा…!"
"पण मला वाटते की इंडियन्सनी ह्याचा अर्थ लावला पाहिजे. माझे टेक्निक्स वापरून".
….
म्हणून ही केस इथल्या लोकांनी सोडविण्यासाठी सादर केली आहे…
वर्गीकरण
वाचने
8303
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
> A circa 1770 Faizabad style
धाग्याचा मुळ मुद्दा कोपर्यातील घटनांचा शोध आहे
रोचक
In reply to रोचक by Bhakti
धन्यवाद
रोचक वाटतयं. शोधून सापडते का
शेवटचं चित्र दिसत नाही आणि
In reply to शेवटचं चित्र दिसत नाही आणि by खेडूत
धन्यवाद खेडूत,
वरील विचार
एलमेंटरी, डिअर वॉटसन, व्हेन
ट्रू सर
जेमिनी विद्याधर यांनी केलेले रसग्रहण
जेमिनी विद्याधर यांनी केलेले रसग्रहण
In reply to जेमिनी विद्याधर यांनी केलेले रसग्रहण by शशिकांत ओक
चुकून पुन्हा सादर झाले आहे
लढाई नंतर शरीराचे चिथड़े कसे दिसतात ते चित्र
उंटावरून पळवून नेताना मागे वळून पाहतानाचे विदारक सत्य
सत्य दर्शन आणि कठोर वास्तव: चित्रकाराची धिटाई