अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.
In reply to महत्वाचे निरीक्षण. त्याची by गवि
In reply to विमानाला वर नेण्यासाठी जी by कंजूस
विमानाला वर नेण्यासाठी जी अधिक इंधन देणारी दांडी सरकतात ती काही वेळाने परत फिरून लॉक व्हावी असा काही घातपात केला असेल का?नाही. तसे करता येणे फारच कठीण. जवळपास अशक्य. आणि इंधन बंद झालेले नाही.
In reply to महत्वाचे निरीक्षण. त्याची by गवि
In reply to कोणता व्हिडिओ नक्की? by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to फ्लाइट रडार २४ चेक केले असता by आनंद
In reply to 11 A सीटचा चा प्रवासी वाचला. by Bhakti
In reply to May day call म्हणजे काय ? by मारवा
In reply to भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकर आयुरारोग्य प्राप्त होओ... by कर्नलतपस्वी
In reply to भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकर आयुरारोग्य प्राप्त होओ... by कर्नलतपस्वी
In reply to एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर by आग्या१९९०
In reply to बरीच अधिकची माहिती मिळते आहे. by गवि
प्रत्यक्षात ती शक्यता नगण्य.आपण या विषयातले जाणकार आहात त्यामुळे आपण जी शक्यता नगण्य म्हणत आहात तीच शक्यता अधिक आहे. आम्ही जाणकार नाही पण साधं लॉजीक असं आहे की, विमान उडालं आहे, आणि हळुहळु खाली येतंय याचा अर्थ त्याची पॉवर कमी झाली आहे. एक इंजीन चालू असतं तर, कदाचित वळण घेवून लँडींगला आलं असतं म्हणजे एकही इंजीन चालू नाही. एकही चालू नाही म्हणजे दोन्हीही बंद पडले उडण्याची क्षमता गमावली आहे. आपल्या यंत्र तंत्राच्या भाषेत लॉस ऑफ पॉवर हतबल ही स्थिती त्यामुळे जे तांत्रिक फेल्युअर झालं ते मशीनचं. एकदा उडून ही स्थिती यावी हे जे जरा तर्कापलिकडे जातंय. उडतंय म्हणजे पॉवर सुरु होतं आणि हळुहळु खाली येतंय म्हणजे अचानक पॉवर लॉस हतबल स्थिती, हा यांत्रिक बिघाड सापडला पाहिजे. दुसरं यात पायलटचा दोष दिसत नाही. विमान वर उडते राहावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले असावे. आता लँडींग झालं तर धोका तितकाच होता म्हणून त्याचं प्राधान्य विमान वर उडवायला असणार पण दुर्दैवाने विमान उंच झेप घेऊ शकले नाही. आज उद्या विमान कंपन्यावर येणारं बालट, कंपन्यांचं नुकसान होऊ नये म्हणून पायलटवर खापर फोडतात काय इतकंच पाहणे बाकी आहे. एक्सपर्ट लोकांनी तर्क पटणारा केला पाहिजे. इतकी माफक अपेक्षा. -दिलीप बिरुटे
In reply to तर्क गंडतोय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण साधं लॉजीक असं आहे की, विमान उडालं आहे, आणि हळुहळु खाली येतंय याचा अर्थ त्याची पॉवर कमी झाली आहे. एक इंजीन चालू असतं तर, कदाचित वळण घेवून लँडींगला आलं असतं म्हणजे एकही इंजीन चालू नाही.बरं झालं तुम्ही हा मुद्दा मांडलात. मी वर म्हटलंच आहे की लॉस ऑफ पॉवर आणि लॉस ऑफ लिफ्ट असे दोन वेगळे भाग आहेत. फुल पॉवर इंजिन चालू असतानाही लॉस ऑफ लिफ्ट होतो आणि विमान अगदी असेच खाली येते. यासाठी आपल्याला विमान कसे उडते याबद्दल माहिती घ्यायला हवी. तुमची शेवटची काही वाक्ये मला हे सर्व लिहिण्यापासून परावृत्त करत आहेत पण इतर सर्व (खवचट नसलेल्या) मिपाकरांच्या माहितीसाठी कदाचित हे उपयुक्त ठरेल म्हणून लिहीत आहे. विमानाच्या पंखावर जी लिफ्ट (उचल) उत्पन्न होते त्यासाठी पंखाच्या वरून आणि खालून वेगवेगळ्या वेगाने आणि दाबाने वाहणारी हवा कारणीभूत असते. दाबात असा फरक निर्माण व्हावा अशी पंखांची रचना आणि आकार असतो (aerofoil). आता असे पहा, की पंखाचा हवेच्या प्रवाहाशी एक कोन असतो. आणि तो वेगवेगळ्या वेळी बदलतो. टेक ऑफ घेताना आणि वर चढताना तो जास्त असतो. त्याला अँगल ऑफ अटॅक म्हणतात. तो जसा वाढत जातो तसा एका मर्यादेनंतर हवेचा अवरोध वाढायला लागतो. आणि लिफ्ट निर्माण करणारे प्रवाह बिघडू लागतात. अशा वेळी विमानाला वर वर जाणे अधिक अवघड होऊ लागते. मग पॉवर वाढवून ही स्थिती काहीशी नियंत्रणात आणता येते. पण.. फुल पॉवर असताना देखील अँगल ऑफ अटॅकची मर्यादा ओलांडली जाऊ लागली की विमानाच्या पंखावरची लिफ्ट नाहीशी होते. एक लक्षात घ्या की विमानाचे इंजिन कारच्या इंजिनासारखे चाकांना संचालित करत नसून ते हवेला मागे आणि पर्यायाने विमानाला पुढे ढकलत असते. मात्र "लिफ्ट" उत्पन्न करण्याचे कार्य इंजिन करत नसून विशिष्ट वेगाने आणि विशिष्ट कोनात पुढे सरकणारे पंख करत असतात. त्यांचा अँगल ऑफ अटॅक मर्यादा ओलांडून गेला की इंजिने पूर्ण ताकदीने फुरफुर करत राहतील, हवा मागे फेकतील, पण लिफ्ट उत्पन्न होऊ शकणार नाही. या स्थितीला स्टॉल असे म्हणतात. अहमदाबाद विमानाच्या बाबतीत टेक ऑफ पूर्ण वेगाने आणि व्यवस्थित झालेला आहे. इंजिन बंद किंवा कमी पॉवरने चालत असताना हे होणेच अशक्य आहे. हवेत उचलले गेल्यावर ज्या पद्धतीने विमान खाली येत आहे (pancaking) त्यावरून हेच दिसते की लॉस ऑफ लिफ्ट आहे. लॉस ऑफ पॉवरमुळेही लॉस ऑफ लिफ्ट होऊ शकते, तेही एक वैध कारण आहे. पण या बाबतीत दोन्ही इंजिने एकदम बंद पडावीत आणि तीही टेक ऑफ ठीकठाक झालेला असताना त्यानंतर लगेच, हे अशक्य आहे. आता नेमके झाले काय असावे हे नीट मांडायला वेळ लागेल. प्रयत्न करतो एका ब्रेकनंतर. यात लँडिंग गियर खालीच असणे हा मुख्य क्लू आहे. आणि फ्लॅप्स खाली नसणे हाही. इंजिन बंद पडो, लिफ्ट जावो, आग लागो किंवा अन्य काही कारणाने विमान कोसळू लागो, यातील प्रत्येक केसमध्ये लँडिंग गियर विमानाच्या पोटातच असायला हवेत. पहिल्या सहा ते दहा सेकंदांत ते पोटात घेतले जातात आणि वस्तीत क्रॅश होणार म्हणून चाके पुन्हा बाहेर काढणे असे होत नसते. ती आतच ठेवली जातात. हे लिहायला स्फूर्ती दिल्याबद्दल धन्यवाद. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आपला आदर आहेच. बाकी स्वभाव म्हणाल तर मनुष्य म्हटला की बरे वाईट गुण आलेच. असो. गंभीर धाग्यावर अवांतर टाळतो.
In reply to पण साधं लॉजीक असं आहे की, by गवि
In reply to क्रॅश निश्चित झाल्यामुळे (मे by गवि
पण जमिनीवर नुकसान कमीतकमी व्हावे यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींत:मला स्वतःला ही शक्यता फार कमी वाटते की जमीनीवर लँडींग करावे वगैरे. पहिलं प्राधान्य झेप घेणे इतर प्राधान्याचा विचार फार कमी वेळा येत असावा. यावरुन आठवण झाली. लॉस ऑफ पॉवर आणि जमीनीवर लँडींगचा हा व्हीडीयो आपण पाहिलाच असेल असे वाटते. -दिलीप बिरुटे
In reply to क्रॅश निश्चित झाल्यामुळे (मे by गवि
In reply to इंधन कमी कसे केले जात असते ? by मारवा
समजा वेळ असता तर अशा परिस्थितीत इंधन कमी कोणत्या मार्गाने केले जात असते ? म्हणजे काय technique वापरली जात असते ?मुख्यतः मोकळ्या भूभागावर किंवा पाण्यावर जाऊन गोल फिरत राहून इंधन जाळून संपवणे. लँडिंग वेट अचिव्ह करण्यासाठी. किंवा क्रॅश लँडिंगमध्ये हानी कमी करण्यासाठी.
In reply to पण साधं लॉजीक असं आहे की, by गवि
अहमदाबाद विमानाच्या बाबतीत टेक ऑफ पूर्ण वेगाने आणि व्यवस्थित झालेला आहे.इथपर्यंत आपली मतं बरोबर वाटत आहेत.
इंजिन बंद किंवा कमी पॉवरने चालत असताना हे होणेच अशक्य आहे.मुद्दा हाच आहे की, विमानाने टेक ऑफ पूर्ण वेगाने व्यवस्थित केलेला आहे, मग असे काय घडले की ते खाली खाली येत गेले. लॉस ऑफ लिफ्ट असो की लॉस ऑफ पॉवर असो, हे जे अचानक कसं घडलंय तेच अपघाताचे कारण की अन्य काही, तेच महत्वाचं आहे. तपशीलवार निबंधाबद्दल आभारी आहे. लिहिते राहा. वाचतोय. -दिलीप बिरुटे
In reply to तेच म्हणतोय.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे जे अचानक कसं घडलंय तेच अपघाताचे कारण की अन्य काही, तेच महत्वाचं आहे.या स्टेजला सर्वच गोष्टी अंदाज या कॅटेगरीत येतात. पण काही अंदाज सहज नाकारता येतात, इंजिन बिघाड किंवा तांत्रिक बिघाड हा या बाबतीत सकृत्दर्शनी शक्य दिसत नाही. १. फ्लॅप्स वर २. लँडिंग गियर खालती. ३. स्टॉल सदृश अटीट्युड (विमानाचे ओरिएंटेशन म्हणा) ४. यशस्वी टेक ऑफ ५. उड्डाणाच्या आधी फ्लॅप्स खाली करणे विसरावे हे विमान होऊ देणेच अशक्य अशी यंत्रणा (ड्रीमलाइनरची) ६. मोठ्या संख्येने पक्ष्यांचा अभाव (दोन्ही इंजिने तातडीने बंद पडण्याइतके मोठे पक्षी थव्याने असणे आवश्यक) ७. धूर, काजळी, आगीचा लोळ नसणे (पक्षी आत गेले की यातले काहीतरी होणार) ८. सर्वात महत्वाचे. टेक ऑफ घेताना सर्वात जास्त इंजिन पॉवर आणि लिफ्ट मिळण्यास सर्वाधिक अनुकूल स्थिती असते. त्यामुळे पंखाचा आकार काही प्रमाणात बदललेला नजरेला दिसतो. पुरेशी लिफ्ट मिळत असते तेव्हा पंखांची टोके वर वळतात. पंखात लवचिकता ठेवलेली असल्याने हे वाकणे स्पष्ट दिसते (स्नायू तटतटतात तसे). इथे लिफ्ट नसल्याचे दिसते आहे. पंख सरळ आणि पडके आहेत. या सर्व मुद्द्यांमुळे ठळक शक्यता हीच उरते की लिफ्ट कमी पडली. का? - उड्डाणाच्या नंतर लगेच फ्लॅप्स वर घेतले जाणे. - उड्डाणाच्या नंतर लगेच चाके वर घेतली न जाणे. या दोन्हींमुळे विमानाची लिफ्ट पुरती निकामी लेव्हलला येऊ शकते. हे असे होण्यात कुठेतरी मानवी चूक वाटते. अंदाजच असला तरी तो सध्याच्या स्थितीत सर्वाधिक शक्यतावाला अंदाज आहे. पुढे तो चुकीचा ठरला तर करेक्शन करूच.
In reply to हे जे अचानक कसं घडलंय तेच by गवि
In reply to पण साधं लॉजीक असं आहे की, by गवि
In reply to लॉस by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to लॉस by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to अनुभवी पायलट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आपण चर्चा करत आहोत. by कंजूस
पण कुणी आपला मुद्दा मान्य न झाल्यास चिडण्याचे कारण नाही.+१ सहमत. काही लोकांना वाटतं आपण एक्सपर्ट आहोत ना मग आपलेच प्रतिसाद लोकांनी वाचत जावेत. आणि वाहवा..! छान म्हणत जावे. काळ बदलला आहे आधुनिक आणि अद्ययावत माहितीची नवनवीन साधने आलेली आहेत त्यामुळे विविध विषयांची आणि अद्ययावत माहिती कोणाकडेही असू शकते. -दिलीप बिरुटे
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१ सहमत. काही लोकांना वाटतं आपण एक्सपर्ट आहोत ना मग आपलेच प्रतिसाद लोकांनी वाचत जावेत. आणि वाहवा..! छान म्हणत जावे.अगदी बरोबर. पण.. मुख्य उद्देश आणि उत्साह माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा आहे की पूर्ण परिश्रम एखाद्याला चूक ठरवण्यासाठी करायचे आहेत हे आधी ठरवून घेतल्यास ध्येय साध्य करणे सोपे होते. अर्थात हे तुम्हाला आम्ही काय सांगावे. जुने जाणते तुम्ही... :-) शुभेच्छा.
In reply to आपण चर्चा करत आहोत. by कंजूस
In reply to फ्लॅप्सचे कार्य तुम्ही by गवि
In reply to माझ्या मूळ मुद्द्याचा अर्धा by कंजूस
In reply to फारच वाईट by अभ्या..
एअर लाईनपेक्षा दुप्पट लगेज घेऊ देतात हा मोह होता पण कदाचित हे सुध्दा कारण असु शकतेशक्यता अगदीच नाकारता आली नसती एरवी. उन्हाळी हवेचे प्रचंड उच्च तापमान आणि त्यामुळे विरळ झालेली हवा. लिफ्ट पुरेशी मिळायला अधिक लांब अंतर लागते. पण इथे टेक ऑफ योग्य जागी योग्य रित्या झाला आहे. वर चढत जाण्याचा दर केवळ कमी नसून ते खालीच येताना दिसत आहे. स्टॉल सदृश स्थितीही दिसून येत आहे. त्यामुळे परमिटेड लिमिटपेक्षा जास्त सामान घेऊन गरम वातावरणात उड्डाण हा औरंगाबाद क्रॅशच्या वेळचा सीन इथे नव्हता.
In reply to एक्स वर एकाने लिहिलेली पोस्ट by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to अगदीच दूरस्थ शक्यता. इतक्या by गवि
In reply to आताच हा दुवा पाहिला. by अकिलिज
In reply to विमानाचं वजन करता येतं का? by कंजूस
१५+७ किलो वजन नेत असेल तरएअर इंडिया २३*२ + ७ असे नेऊ देते
In reply to १५+७ किलो वजन नेत असेल तर by विजुभाऊ
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झालेले by गवि
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to आपण भारतीय लोक निवाडा देण्यात by सुबोध खरे
In reply to हरकत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सध्या by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to चौकशी समिती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to एक व्हॉट्स अप फॉरवर्ड by स्वधर्म
In reply to एक इंजिन रनवे वरच अंशतः किंवा by गवि
क्रॅश होतानाच्या शेवटच्या