The Matrix: एका अद्भुत Sci-Fi प्रवासाची कथा
In reply to जबरदस्त चित्रपट आहे by झकासराव
जबरदस्त चित्रपट आहे+१
फक्त action मुळे नव्हे तर सखोल अर्थ असलेली कथा+१
फार आवडता चित्रपट बऱ्याच वेळा पाहिलाय+१
दृष्टीकोन घडवणारा चित्रपट Agent च्या तोंडचे मनुष्याचे वाभाडे काढणारे संवाद देखील तितकेच परिणामकारक होते+१
In reply to सदर लेख by कपिलमुनी
सदर लेख एआयने लिहिला आहे.यंव.
बौद्ध विचारधारामॅट्रिक्स चित्रपटात आहे ही बौद्ध विचारधारा आहे का ? पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना? ब्रह्म सत्य जगन मिथ्या अर्थात दिसणारे भासणारे जग हे मोठ्या असून आपले मूळ स्वरूप जे की ह्याच्या पारे असे असलेले ब्रह्म आहे हा विचार बौद्ध मतातही येतो का ?
In reply to टेक्निकल क्वेरी by प्रसाद गोडबोले
In reply to टेक्निकल क्वेरी by प्रसाद गोडबोले
ॐ असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतं गमय ।हे गाणं आहे ब्वॉ https://youtu.be/A67OhOUoUsc?si=qjAHPlPY4nNyyuuN बौद्ध मतामध्ये ब्रम्ह नाही पण अद्वैताचा स्वीकार आहे, द्वैत नाकारले आहे.कर्माचा पुरस्कार आहे.
In reply to टेक्निकल क्वेरी by प्रसाद गोडबोले
पण बौद्ध मतात जग हे निखालस सत्य आहे असे मानतात ना?ह्याचा काही रेफरन्स (विकीपीडीया व्यतिरीक्त) आहे का? - (अभ्यासू) सोकाजी
In reply to रेफरन्स by सोत्रि
In reply to प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी by प्रसाद गोडबोले
In reply to =)) by सोत्रि
In reply to आणि म्हणूनच by प्रसाद गोडबोले
- ऐकीव (परोक्ष)
- चिंतनमय (परोक्ष)
- प्रत्यक्ष, अनुभूतीमय (अपरोक्ष)
बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. जगाचे सत्यत्व ह्या बाबत महायान काय म्हणतात , हीनयान काय म्हणतात , वज्रयान काय म्हणतात आणि विशेषतः नागार्जुन काय म्हणतो हे समजून घ्यायला मनापासून आवडेल. पण त्यासाठी विशेष कष्ट घ्यायची मला काडीमात्र इच्छा नाही,अशा विरोधाभासी आणि एकंदरीतच ऐकीव माहितीवर आधारित बौद्ध तत्वज्ञानावर जी निष्कर्षात्मक मतं तुमच्या लेखात आणि प्रतिसादात येतात त्याने कुतूहल वाटत आणि ती निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घ्यायची इच्छा होते. प्रतिप्रश्न करण्याचे कारण कोणाच्याही मताचे खंडन-मंडण हा खचितच नसतो. कारण भारतीय तत्वज्ञाचा डोलारा ह्या प्रश्नमंजुषेवर आधारलेला आहे. प्रतिप्रश्न फक्त निष्कर्षात्मक मतं कशी काय बनली हे जाणून घेण्यासाठी असतो जेणेकरून चुकीची मतं, धारणा पसरू नये. वानगीदाखल:
आता बौद्ध धर्म सर्वं शून्य शून्यं म्हणतोमुळात बौद्ध धर्म असं काही नाहीयेय, त्यामुळे नेमकं कोण शून्य शून्यं म्हणतोय? ते शून्य म्हणजे नेमकं काय? हे प्रश्न पडतात आणि तेच विचारले जातात. - (अभ्यासू) सोकाजी
In reply to तत्वज्ञान ३ प्रकारचे असते: by सोत्रि
In reply to प्रश्न : बौद्ध by प्रसाद गोडबोले
In reply to पर्याय २ by सोत्रि
In reply to उत्तम मनपूर्वक धन्यवाद. by प्रसाद गोडबोले
In reply to जग मिथ्या आहे. by प्रसाद गोडबोले
जग मिथ्या आहे.न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्राचे (जड जगत् ) नियम सब-ऑटोमिक जगतात (सूक्ष्म कण), क्वाँटम फिजिक्सला, लागू पडत नाहीत, तिथले नियम आणि वास्तव यांत प्रचंड भिन्नता असते. पण त्यामुळे जड जगत् , जे सूक्ष्म कणांनी बनले असते, ते मिथ्या होत नाही. न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्रांच्या नियमानुसार तेही सुरळीत चालू असते.
बस इतके हे समजून घेणे हा दुःख निर्मुलनाचा सर्वात सोप्पा मार्ग आहेहे समजून घेणे हा झांगडगुता आहे. समजून घ्यायचे म्हणजे नक्की काय? तर कोणीतरी हे असं म्हणालंय हे विचारांच्या पातळीवर मानायचे. मानायचे म्हणजे तशी श्रद्धा ठेवायची. ते इतकं सोप्पं असत तर सगळेच मुक्त झाले असते आणि ही चर्चा करायलाच कोणी नसतं. पण चर्चा तर होते आहे... अरे हो, पण जगन्मिथ्या असं म्हटलं गेलय, म्हणजे ते मानल पाहिजे, म्हणजे ही सगळी चर्चाही मिथ्याच झाली की :) असो,
जग मिथ्या आहे. => मग जगातील विषयांच्या सयोगाने निर्माण होणारे दुःख ही मिथ्या ठरते. => दुःख असं काही नाहीच. => जगाचं मिथ्यत्व लक्षात आलं की तिथेच ब्रह्म सत्यं झालं. => तिथं दुःख संपलं. => जग , त्यातील विषय, त्यांच्या संयोगाने होणारे व्यवहार, त्याने सुख दुःख आदी मानणारा भोगणारा "अहं" हे सर्वच मिथ्या आहे.ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय. पण जन्म-मृत्यू चक्र, जगणं, आहेच. ते सत्य आहे. त्यामुळे जे काही सभोवताली घडतंय ते मिथ्या नाही त्याच्या मागे कार्यकारण भाव आहे (cause & effect) हे स्वानुभूतीच्या पातळीवर अनुभवलं की खालील भवचक्राचे ज्ञान होते: अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (दु:ख) ह्या चक्रातल्या तृष्णा आणि आसक्ती ह्या कड्या तोडल्या की भवचक्र (जन्म-मृत्यू चे चक्र) तोडता येते. ह्या कड्या तोडत सर्व कर्मसंस्कारांचे निर्मूलन म्हणजे मुक्ती, म्हणजेच निर्वाण (गीता ६.१५ श्लोकातंल निर्वाण) - (नश्वर) सोकाजी
In reply to जग मिथ्या आहे. by सोत्रि
ह्यात जग मिथ्या आहे हे गृहीतक धरलंय त्यामुळे पुढचं सगळच मिथ्या होऊन जातंय.बौद्ध तत्जत्वज्ञानुसार जग मिथ्या आहे की सत्य ? कारण सनातन तत्त्वानुसार तरी जग मिथ्या च आहे, पुढील सगळच मिथ्या आहे, चर्चाही मिथ्या आहे. सगळं सोप्पेच आहे , सगळे मुक्तच आहेत, मिथ्या चर्चेचा उद्देश मिथ्या व्यामोह हटवणे हाच आहे. एकदा ह्या जगाच्या मित्यत्वाचीं जाणिव झाली की बोलायला, चर्चा करायला काही राहतच नाही. ह्याला माऊली "शब्देवीण संवादु, दुजेविण अनुवादु" असे म्हणतात. तात्पर्य इतकेच की जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहे आणि तुम्हाला हे कळले आहे तर आपली चर्चा सफल झाली आहे. आता बोलायला काहीच नाही. :) आणि तुम्ही म्हणत असाल की जग मिथ्या आहे हे माझे गृहितक आहे तर मग चर्चेच्या सुरुवातीलाच मी म्हणालो ते मॅट्रिक चित्रपटात गृहीत धरलेली संकल्पना हिंदू ठरते, बौद्ध नव्हे.
In reply to एकदा नक्की सांगा काय ते by प्रसाद गोडबोले
जर तुम्ही म्हणता तसे बौद्ध तत्त्वानुसार जग मिथ्या आहेह्या मूळ प्रश्नावर दिलेले प्रतिसाद वाचूनही हाच निष्कर्ष काढला असेल तर खरंच बोलायला काहीच नाही! :) इत्यलम! - (अभ्यासू) सोकाजी
In reply to असो! by सोत्रि
In reply to अहो, by प्रसाद गोडबोले
In reply to ओह्हो, त्या प्रतिसादाच्या by सोत्रि
In reply to टेक्निकल क्वेरी by प्रसाद गोडबोले
In reply to चित्रपट लेखिका-दिग्दर्शिका by कॉमी
कुठेतरी बॅक ऑफ द माईंड ट्रान्सजेंडर लोकांचा क्लेश त्यांच्या विचारात होता.असे वाटले नाही... याबाबत पण अजून समजून घ्यावे लागेल. आणि मॅट्रिक्स मध्ये इतकं स्पष्टपणे मायाजालचाच प्रत्येक काळी समावेश आहे, वैदिक अध्यात्म संकल्पनांची क्षणोक्षणी आठवण येत राहते
In reply to द मॅट्रिक्स आणि बौद्ध तत्त्वज्ञान by कपिलमुनी
बौद्ध धर्मात “माया” म्हणजे सगळं जग एक भास आहे, भ्रम आहे. आपल्याला जे दिसतं, वाटतं ते खरं नसतं.माया ब्रह्म वगैरे मांडणी वेदांतातील आहे. बौद्ध तत्त्वज्ञान ब्रह्म आत्मा वगैरे मानत नाहीत . अनात्मा उल्लेख तुम्हीच केलेला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.
In reply to बौद्ध धर्मात “माया” म्हणजे by प्रसाद गोडबोले
बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून मॅट्रिक्स चित्रपट बनवला असता तर ज्या क्षणी निओ ला मॅट्रिक्स सोबत जोडणारी कनेक्शन काढली त्याक्षणी स्क्रीन ब्लॅक आउट होऊन चित्रपट संपेल, कारण निओ ची "मी निओ आहे" ही कल्पनाच आत्मकल्पना असल्याने खोटी ठरते.तुम्ही म्हणाला होतात , “बौद्ध तत्वज्ञानाचा माझा अभ्यास विकिपीडिया आणि काही मोजके खरे बुद्धिस्त लोकं ह्याकडून ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे.” त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतो, जो यथार्थ नाही. पण तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढण्याचा तुम्हाला अधिकार (फ्री वील ;) ) आहे आणि तो मान्यही आहे. (ऐकीव गोष्टींवर आधारित निष्कर्ष काढण्याच्या प्रयत्नांच नेहमीच कुतूहल वाटतं राहिल.) - (कुतूहल न शमलेला) सोकाजी
In reply to बौद्ध तत्त्वज्ञानास अनुसरून by सोत्रि
त्यामुळे स्क्रीन ब्लॅक आउट होईल हा निष्कर्ष ऐकीव गोष्टींवर आधारित ठरतोहे बघा , मॅट्रिक्स अर्थात जग मिथ्या मानले आणि निओला त्या मॅट्रिक्स मधुन बाहेर काढले तर तो जो काही निओ दिसतो आहे त्याला वेदांती आत्मा म्हणातात , बौध्द मतानुसार आत्मा असं काही नाही, सर्व शुन्य आहे. व्हॉईड आहे , मग काय उरलं ? अर्थात बौध्द मतानुसार मॅट्रिक्सच्या "बाहेर" असं काहीच नाही . मग स्क्रीन ब्लॅकाऊट होऊन पिक्चर संपणार नाही का ! चुकीचे असेल तर तुम्ही सांगा - बौध्द मतानुसार काय होईल निओला मॅट्रिक्स मधुन बाहेर काढल्यावर! अवांतर : मला काहीकाही लोकं विचारतात की तुला 'कळलं' आहे ना , तु तर 'बाहेर पडला' आहेस ना , मग तु कशाला ह्या भानगडीत पडतोस चर्चा वगैरे करण्याचा ? -कारण एकदा बाहेर पडुन परत आत आल्यावर "मजा " आहे राव !!
लेखामध्ये असलेल्या इंग्रजी लिपीबद्दल क्षमस्व