ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी
लेखनप्रकार
जानेवारी ०५ - परमहंस योगानंद यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने..
तीन वर्षांपूर्वी मी लॉस अँजेल्स ला शिफ्ट झालो. हळू हळू माझी इथे असणाऱ्या योगानंद परमहंसांच्या self realization fellowship आणि क्रिया योगाची ओळख झाली.
https://www.quora.com/Which-famous-people-got-inspired-by-the-book-Autobiography-of-a-Yogi
https://yogananda.org/
कोलकात्याचे परमहंस योगानंद जवळपास १०० वर्षांपूर्वी लॉस एंजेलिस ला आले. इथे येऊन त्यांनी भारतीय संस्कृती, योग, व प्रामुख्याने ध्यानसाधनेचा (क्रिया योग) प्रसार केला. आज अख्य्या जगात योगानंदांचे अनुयायी पसरलेले आहेत.
८० वर्षांपूर्वी योगानंदांनी लिहिलेले ‘ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी’ हे पुस्तक जगविख्यात आहे. आजवर ५० हून अधिक भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे. स्टीव्ह जॉब्स, विराट कोहली आणि अनेक इतर मान्यवरांवर या पुस्तकाचा खोलवर प्रभाव होता/आहे. जीवनाला कलाटणी देणारं पुस्तक अशी याची ओळख आहे. खूप 'addictive' असे हे पुस्तक आहे.
श्री कृष्ण -> महावतार बाबाजी -> लाहिरी महाशय -> स्वामी युक्तेश्वर -> परमहंस योगानंद अश्या गुरु-शिष्य परंपरेतून घडलेल्या योगानंदांची कथा हे पुस्तक उलगडून सांगते. हे पूर्ण पुस्तक क्रिया योगा वर आधारित आहे असेही म्हणता येईल.
योगानंदांनी स्थापन केलेलेय ‘self realization fellowship (srf)’ चे मुख्यालय ही लॉस एंजेलिस मधेच आहे. भारतात हीच संस्था योगोदा सोसाइटी च्या नावाने काम करते.
लॉस एंजेलिस मधे योगानंदांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर आहेत. पूर्ण अमेरिकेत, बऱ्यापैकी सगळ्याच महत्वाच्या शहरात srf चे सेंटर्स आहेत.
srf ची तीन महत्वाची ठिकाणं लॉस एंजेलिस मधे आहे -
१. लेक श्राइन - योगानंदांनी १०० वर्षांपेक्षाही आधी स्थापन केलेला आश्रम. खूपच सुंदर आहे.
जागोजागी ध्यान करण्यासाठी जागा बनवल्या आहेत.
योगानंदांना जगभरातून भेट म्हणऊन मिळालेल्या वस्तूंचे प्रदर्शन आहे.
महात्मा गांधींच्या अस्थी पण आहेत.
https://lakeshrine.org/
२. मदर सेंटर - इथे १५ वर्ष योगानंद वास्तव्याला होते. माउंट वॉशिंग्टन मधे हे भव्य असे सेंटर आहे.
https://yogananda.org/locations-international-headquarters
३. योगानंदांची समाधी (crypt) - मदर सेंटर पासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यांच्या बाजूला मायकल जॅक्सन ची कबर आहे.
https://devotee2devotee.com/wordpress/index.php/paramahansa-yoganandas-forest-lawn-crypt/
मागील २ वर्षात मी या सगळ्या जागांवर जाऊन आलो. त्यांची शिबीरं पण अटेंड करतोय. अमेरिकन लोकांचा फॉलोविंग खूप आहे. त्यामुळे थोड्या चर्च स्टाइल च्या पूजा इकडे होतात. (म्हणजे चर्च मधील संडे मास सारखं)
---------------------------------------
भारतातील ३० वर्षांच्या वास्तव्यात मला योगानंद परमहंस आणि क्रिया योग विषयी कधी काही वाचण्यात, ऐकण्यात आले नाही याचा मला नंतर खूप आश्चर्य वाटलं. आणि माझ्या कक्षा किती रुंद आहे याची जाणीव पण झाली.
आज जानेवारी ०५, योगानंदाच्या जन्मदिन च्या निमित्ताने लिहिण्याचा थोडा प्रयत्न करतोय. वाचणाऱ्यांपैकी अगदी एकानेही नव्याने ऑटोबीओग्राफी वाचलं, तरीही या लेखाचं सार्थक झालं असा समजेन मी. धन्यवाद.
वाचने
5048
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
धन्यवाद
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
धन्यवाद जोशी साहेब
छान माहिती.
In reply to छान माहिती. by Bhakti
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
हे आत्मचरित्र माझ्या संग्रही
In reply to हे आत्मचरित्र माझ्या संग्रही by श्रीगुरुजी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
माझ्याही संग्रही आहे.
In reply to माझ्याही संग्रही आहे. by कर्नलतपस्वी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मी आठ वर्षांपूर्वी वाचले होते
In reply to मी आठ वर्षांपूर्वी वाचले होते by कंजूस
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by जुइ
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मराठी भाषांतरीत पुस्तक वाचले आहे
In reply to मराठी भाषांतरीत पुस्तक वाचले आहे by अर्धवटराव
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
In reply to मराठी भाषांतरीत पुस्तक वाचले आहे by अर्धवटराव
योग शक्ती...
योगायोग
पुस्तक