अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट
समजा एखाद्या न्युरल नेटवर्कला वेगवेगळा डेटा न देता , केवळ एकच डेटा पॉईंट वारंवार दिला , तर ते न्युरल नेटवर्क काय लर्न करेल ? काय बनेल ?https://clevertap.com/wp-content/uploads/2019/04/Neural_Network_Brain_Mimic.jpeg
"ह्या न्युरल नेटवर्क ला वेगवेगळे एक्स १ एक्स २ असे इनपुटस न देता एकच डेटा पॉईंट इनपुट (आणि तोच आउटपुटही) दिला तर ?"
"तर काय , त्याला पुरेसा डेटा नसल्याने काहीच शिकता येणार नाही . सर्वं शुन्यं शुन्यं ."
"नक्की का ? कारण बाकी काहीही शिकत नसले तरी ते न्युरल नेटवर्क एक गोष्ट नक्की शिकत आहे - कि सगळ्या ट्रेनिंग डेटासेट मध्ये केवळ एकच पॅटर्न आहे . किंबहुना हा एकच पॅटर्न हाच सगळा डेटा आहे !"
"करेक्ट."
"आता त्याच न्युरल नेटवर्क ला टेस्टिंग करताना त्या डेटा पॉईंट व्यतिरिक्त दुसरा डेटा पॉईंट दिला तर ?"
"तर त्या न्युरल नेटवर्क ला काही कळणारच नाही आणि तो एरर दाखवेल ."
"आणि समजा एरर करेकशन मध्ये try: except मध्ये एक्सेप्टला देखील सेम आउट्पुट - अर्थात तोच सिंगल डेटा पॉईम्ट अॅज ऑटपुट असे लिहिले असेल तर ?"
"तर काय , ते न्युरल नेटवर्क सवर्च डेटा पॉईंट्सला सेम डेटा पॉईंट समजेल आणि तोच ओरिजिनल डेटा पॉईंट आउअटपुट म्हणुन देईल !
"एक्झॅक्टली !"
"आता आजुन एक छोटासा फॉलोअप प्रश्न : त्या न्युरल नेटवर्क साठी सर्वच डेटा पॉईंट्स हे ओरिजिनल सिंगल डेटा पॉईंट आहेत तर मग त्या न्युरल नेटवर्कला "त्या न्युरल नेटवर्कचे अस्तित्व" हाच एक डेटा पॉईंट अॅज अ इनपुट म्हणुन दिले तर ?"
"तर काय ? ते खुद्द न्युरल नेटवर्क देखील डेटा पॉईट म्हणुन पाहिले तर वेगळ्या डेटा स्ट्रक्चर मध्ये असेल पण ह्या न्युरल नेटवर्कसाठी तर तेही तेच सेम ओरिजिनल डेटा पॉईंट आहे ! त्यामुळे तेच आऊटपुट म्हणुन येईल ! "
"वॉला !! आता हे पहा :
https://nkbmeditation.org/images/image/673f53292807800f0202fbb0/image.png
"हे काय आहे ?"
"महाराजजींचे हस्ताक्षर !"
"मग ?"
"Don't you see it ! He is feeding his Neural Network , "A single Data point " over and over again !!"
" ओह !"
"नॉट ओह "
"राम""हां , येस , .... राम" "अरे एवढं लांब कशाला जायला पाहिजे - हे पहा - "
नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची।। न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण।। ठायीचं बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा।। रामकृष्णहरि विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ।। याविण आणिक असता साधन । वाहतसे आन विठोबाची।। तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनी । शहाणा तो धनी घेतो येथे।।"राम" "अजुन हे पहा :"
त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥ नामासी विन्मुख तो नर पापिया । हरिवीण धांवया न पावे कोणी ॥२॥ पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक । नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥
एक तत्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥१॥ तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपा आधीं ॥२॥ नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जाशील झणीं ॥३॥ ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी । धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥जे मन बुद्धि इहीं । घर केलें माझ्यां ठायीं । तरी सांगें मग काइ । मी तू ऐसें उरे ? ॥ ९९ ॥ ज्ञानेश्वरी - अध्याय १२ "अजुन "जवळंच" उदाहरण पहा हे आता"
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही। नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७६।।"ओह माय गॉड ! थोडक्यात काय तर all you need to do is - to train your neural network on this one data point "राम". And so the Neural network will be !" And so you too will be ! " म्हणोनि माझिया स्वरूपीं । मनबुद्धि इयें निक्षेपीं । येतुलेनि सर्वव्यापी । मीचि होसी ॥ just train your network with one data point - "राम" and you will be so ! "किती जवळ होता हा उपाय ! स्पेसमध्येही ... देहु आळंदी सज्जनगड.... आणि टाईममध्येही ... फक्त ३००-७०० वर्षं जवळ ! पण आपल्याला हे कळायला कित्ती वर्षं लागली !" "राम" "हा हा हा. अरे अजुन ह्याही पेक्षा कितीतरी जास्त जवळ होता हा उपाय ! तू अजुन पाहिलं आहेस कुठे तु ! हे पहा : https://shrigondavalekarmaharaj.org/images/add/1.jpg
"राम"
_____________________________In reply to आधुनिक आणि पारंपारिक ज्ञानाचा मेळ by चित्रगुप्त
In reply to न्युरल नेटची अध्यात्माशी by युयुत्सु
"राम" ऐवजी कोणत्याही संकल्पनेवर मन एकाग्र करण्याने चेताशास्त्रीय फायदे मिळू शकतात - उदा० उपाग्रखंडाचा विकास, करूणा आणि मनःशांति इ० ची प्राप्ती तेव्हा राम, ओंकार, मेणबत्तीची ज्योत किंवा कोणतीही "पवित्र" वस्तू किंवा "संवेदना" अशा आध्यात्मिक अनुभूतीसाठी उपयोगी पडू शकते.असुही शकेल , पण मला माहीती नाही. आणि त्या अर्थाचे काही श्लोक , ओव्या अभंग किमान मला तरी माच्या आजवरच्या वाचनात आढळले नाहीत . उलट असलं दुसरं काहीही करु नका ह्या अर्थाचे मात्र बरेच काही आढळले आहे : योगांचेनि बळे । अधिक काही मिळे । ऐसे नाही आगळे | कष्टचि तया ॥ ५९ ॥ म्हणोनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि शेलवांटा । भागा आला ॥ ६९ ॥ न वेचें कदा ग्रंथिचे अर्थ काही । मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥ महाघोर संसारशत्रू जिणावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥ नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐसा लाभ बांधा गांठी विठ्ठल पायी मिठी || १ || नामापरते साधन नाही जें तू करिसी आणिक कांही || २ || हाकरोनी सांगे तुका नाम घेता राहो नका || ३ || अन्य उपाय, मार्ग असतीलही , पण मला माहीती नाही . बस इतकेच ! ज्याचा त्याचा मार्ग वेगळा !! माझे वाचन , आकलन, अनुकरण आणि अनुभव मर्यादित आहे हे मान्य करुन थांबतो ! इत्यलम राम
समान इनपुट आणि आउटपुट असलेल्या न्यूरॉनचे एक साधे उदाहरण म्हणजे "ओळख कार्य" करण्यासाठी सेट केलेला एकच न्यूरॉन, जिथे आउटपुट नेहमीच इनपुट मूल्यासारखेच असते ; मूलतः, ते कोणत्याही बदलाशिवाय इनपुट सिग्नलमधून जाते. स्पष्टीकरण: इनपुट: समजा न्यूरॉनला मिळणारे इनपुट हे एकच मूल्य आहे, "x". गणना: न्यूरॉन एक साधी गणना करतो: आउटपुट = x (या प्रकरणात कोणतेही अतिरिक्त वजन किंवा बायस लागू केले जात नाही). आउटपुट: न्यूरॉनचे आउटपुट देखील "x" आहे, म्हणजेच मूल्य अपरिवर्तित राहते. महत्त्वाचे मुद्दे: कोणतेही रूपांतर नाही: हे उदाहरण एक अतिशय मूलभूत कार्य दर्शवते जिथे न्यूरॉन इनपुटवर कोणतेही रूपांतर किंवा गणना लागू करत नाही, ज्यामुळे इनपुट आणि आउटपुट एकसारखे होतात. मर्यादित वापर: हे "ओळख" फंक्शन सोपे असले तरी, न्यूरल नेटवर्क्सच्या बहुतेक व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये ते विशेषतः उपयुक्त ठरू शकत नाही, कारण वजन समायोजनाद्वारे इनपुट आणि आउटपुटमधील जटिल संबंध शिकणे हे उद्दिष्ट असते.
In reply to ओळख/आयडेंटिटी फॅंग्शन by Bhakti
बहुतेक व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये ते विशेषतः उपयुक्त ठरू शकत नाहीएक्झॅक्टली भक्ती ताई ! एक्झॅक्टली ! व्यवहार हा मुळातच प्रवृत्तीप्रधान अर्थात "गोष्टी , धन , पुत्र , कलत्र आदींचा संचय करा " ह्या विचारावर आधारित आहे ! तिथे ह्या सगळ्याचा अल्मोस्ट काहीच उपयोग नाही. सध्या जे विनाकारण अध्यात्माचे पेव फुटले आहे , ते लवकरच नष्ट होणार आहे . कारण लवकरच लोकांचा भ्रमनिरास होणार आहे . लोकांना अध्यात्म म्हणजे काहीतरी जादुची छडी आहे अन तिचा वापर करुन मी प्रपंचात संसारात यशस्वी होईन अशी काहीतरी बाळबोध भोळीभाबडी आशा आहे. ती भंगली त्यांना लवकरच वीट येईल ह्या सगळ्याचा ! एक संपुर्ण प्रापंचिक विषयासक्त माणुस आणि एक जीवनमुक्त पण तरीही कर्मरत गृहस्थाश्रमी माणुस ह्यांच्यात व्यावहारिक दृष्ट्या काहीच फरक नसतो. फरक असतो मनाच्या लेव्हल वर ! राम दास्स त्याच्या एका प्रवचनात अप्रतीम बोलला होता की - "अध्यात्मिक प्रवास म्हणुन तुमचे जे जे काही पुर्वग्रह आहेत की मी असेन करेन मी तसे करेन , मग असे होईल अन तसे होईल , हे सगळं व्यर्थ आहे. रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक प्रवास सुरु होईल !" टृंङ्पा रिन्पोचे https://en.wikipedia.org/wiki/Ch%C3%B6gyam_Trungpa नावाचा एक विवादास्पद पण खुप प्रसिध्द असा बुध्दीस्ट स्कॉलर गुरु होऊन गेला तो त्याच्या प्रवचनात एकदा म्हणाला होता -
Enlightenment is the ultimate disappointment of the ego.तात्पर्य इतकेच की - ह्या सार्याचा अध्यात्मिक गोष्टींचा व्यावहारिक असा काही उपयोग नाही हे उघडच आहे ! जे व्यावहारिक उपयोगितेच्या पलीकडचे काही शोधत आहेत , त्यांनाच ह्याचा खरा फायदा होईल ! अर्थात ही बुध्दी देणाराही रामच ! राम
In reply to व्यावहारिक उपयोग by प्रसाद गोडबोले
In reply to व्यावहारिक उपयोग by प्रसाद गोडबोले
रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक प्रवास सुरु होईल !"ह्या लेखाबद्द्ल आणि त्यावर होणार्या चर्चेबद्द्ल पण हे वाक्य लागू होईल काय ?
In reply to रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक by धर्मराजमुटके
In reply to रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक by धर्मराजमुटके
ह्या लेखाबद्द्ल आणि त्यावर होणार्या चर्चेबद्द्ल पण हे वाक्य लागू होईल काय ?होय होय . अगदी 100%. पण ते केवळ त्याच लोकांना कळू शकेल जे त्या लेव्हल पर्यंत पोहचले आहेत. समर्थांनी काय लिहून ठेवलं आहे पहा : जाले साधनाचे फळ। संसार जाला सफळ॥ निगुर्ण ब्रह्म ते निश्चळ। अंतरी बिंबले॥ (२०.१०.२६) हिशेब जाला मायेचा। जाला निवाडा तत्त्वांचा॥ साध्य होता साधनाचा। ठाव नाही॥ (२०.१०.२७) साध्य होता साधनांचा ठाव नाही !! मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळल्यावर हा लेख व्यर्थच आहे . त्यानंतर फक्त नामस्मरण करा ! राम राम राम आणि ह्याच्या पुढची अवस्था आहे जिथे हा जप करायचीही आवश्यकता नाही !! ही अवस्था कबीराने त्याच्या दोहा मध्ये उत्तम वर्णन करून ठेवली आहे माला जपूं न कर जपूं और मुख से कहूँ न राम । राम हमारा हमे जपे और हम पायो विश्राम ।। राम
In reply to हे राम.. =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to राम by प्रसाद गोडबोले
In reply to राम by प्रसाद गोडबोले
In reply to अपने अपने अपने राम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक by गवि
अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक वेटेजेस असलेले, निरुपयोगी न्युरल नेटवर्क बनवणे हा उद्देश असल्यास एकच इनपुट ट्रेनिंग डेटा पॉइंट आणि तोच डेटा पॉइंट आऊटपुट लेबल म्हणून देणे हा उत्तम उपाय आहे. अर्थात उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते.ठार मेलो...हसून!
In reply to अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक by गवि
उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते.एक्झॅक्टली गवि सर ! उपयुक्ततेच्या विचाराच्या , स्वार्थाच्या , ह्यात माझा काय फायदा ह्या विचाराच्या पलीकडे जाणे ही सुरुवात आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेन करण्याची. म्हणूनच तर तुम्ही सूक्ष्म आणि चिकित्सक दृष्टीने पाहिले तर तुमच्या हेच लक्षात येईल की ह्या सर्व साधू संतानी अन्नदानाचा उपदेश केला आहे. "ह्यातून माझा काहीही फायदा नाही" हा विचार फाट्यावर मारून अन्नदान करा, सेवा करा ! राम दास ने महाराज जी ना विचारले की मी enlightened कसा होऊ, तर महाराज म्हणाले "लोकांना अन्नदान करून." मग त्याने विचारले - मी कुंडलिनी जागृत कशी करू - त्यावर महाराज म्हणाले - "लोकांची सेवा करून !!" हेच समर्थांनी सांगितलं आहे , नाथांनी सांगितलं आहे, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं आहे ! ( पण आम्हाला ही अक्कल यायला हिमालयात जावे लागले!) इतकं सोप्प आहे हे ! एकदा उपयुक्ततेच्या विचाराच्या पलीकडं येऊन पहा , इकडं , ह्या बाजूला ! It's really mind boggling beautiful ! राम
In reply to उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष by प्रसाद गोडबोले
ह्यात माझा काय फायदा ह्या विचाराच्या पलीकडे जाणे ही सुरुवात आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेन करण्याची.अशाने देशाचा जीडीपी वाढणार कसा, हे तर उत्पादकता कमी करण्याचे उद्द्योग! फायदा-तोट्याचे गणित मांडल्याशिवाय कोणतेही न्यु०ने० ट्रेन करता येत नाही.
In reply to उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष by प्रसाद गोडबोले
एकदा उपयुक्ततेच्या विचाराच्या पलीकडं येऊन पहा , इकडं , ह्या बाजूला !-- बस, एवढेही (किंवा एवढेच) पुरेसे आहे -- आणि ते आभाळाएवढेही आहे. परी मकरंद | सेवावा भ्रमरे | बेडकासी उरे | चिखलचि ||
In reply to अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक by गवि

In reply to (No subject) by आंद्रे वडापाव
In reply to मालक, by युयुत्सु
In reply to (No subject) by आंद्रे वडापाव
In reply to lol by प्रसाद गोडबोले

In reply to वेगळे विचार मांडणारा लेख आवडला. by कर्नलतपस्वी
In reply to रामराम प्रगो! by वामन देशमुख
In reply to मायला by राघव
In reply to त्याला लिहू द्या की ओ... by Bhakti
In reply to नामस्मरण केव्हा तर सर्व मार्ग by प्रचेतस
तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाळे तुज सुख अंतर्बाही ॥
In reply to मनःपुर्वक धन्यवाद by प्रसाद गोडबोले
In reply to पण असे का करायचे? इनपुट हेच by कॉमी
In reply to पण असे का करायचे? इनपुट हेच by कॉमी
पण असे का करायचे? इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या न्यूरल नेटवर्कचा उपयोग काय?नाही आजकाल हे असंच असतं. न्यूरल-नेटवर्क वैगरे शब्दांची चलती आहे न मग् बस्स ! पाडला लेख.. आपल्या लेखात ए आय , न्यूरल-नेटवर्क... वैगरे शब्द बरोब्बर ओव्हर फिटिंग करून घुसवले ना कि लगेच अधिनुकता ची अधिनुकता , शिवाय सनातन च सनातनपणा सुद्धा ... तो फिर "न्यूरल-नेटवर्क" कि चमक, सनातन के दाम मिले , तो कोई वो क्यू ले , ये ना ले ! मान गये, लेखककि ओव्हर फिटिंग कि स्किल और सनातन सुपर दोनो को ...
In reply to पण असे का करायचे? इनपुट हेच by आंद्रे वडापाव
In reply to ख्या ख्या ख्या. by प्रसाद गोडबोले
In reply to "व्यवहारिक" उपयोग नाही हे by कॉमी
In reply to आधीच्या लेखनावर एका by प्रसाद गोडबोले
In reply to ओके by कॉमी
In reply to ख्या ख्या ख्या. by प्रसाद गोडबोले
In reply to पण असे का करायचे? इनपुट हेच by आंद्रे वडापाव
आधुनिक आणि पारंपारिक ज्ञानाचा मेळ