सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स
सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स
वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये। जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥शब्द आणि अर्थ ज्याप्रकारे एकामेकात संपृक्त आहेत , ओतप्रोत भरलेलेआहेत , एकामेकापासुन वेगळेच काढता येत नाहीत तसेच जे जगताचे माता आणि पिता आहेत शिव आणि शक्ती ह्यांना मी माझ्या शब्दांना अन त्याद्वारे मला व्यक्त करायच्या अर्थाला सिध्दता प्राप्त व्हावी ह्यासाठी वंदन करतो !
१.स्थुलWhat exactly assigns the meanings to the words ? शब्दांना त्यांचे अर्थ कोण जोडतं ? म्हणजे कसं की मी पुरणपोळी म्हणालो की तुमच्या डोक्यात पुरणपोळीच येणार आहे . अशी मस्त टम्म पुरण भरलेली गुळाची पुरणपोळी , त्यात तो जायफळाचा सुप्त सुगंध . त्यावर तुपाची धार . अगदी पुरणपोळी चिंब भिजुन निघेपर्यंत . अहाहा . अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहते ना ! आता पुरणपोळी म्हणल्यावर किती लोकांच्या मनात अमेरिकन चीज बर्गर आला ? किंवा किती लोकांच्या मनात जॅपनीज सुशी आली ? शक्यच नाही ! कारण पुरणपोळी हा शब्द आणि पुरणपोळी हा अर्थ अगदी अगदी एकामेकांत सामावलेले आहेत . अभिन्नपणे ! तसेच सर्व नामांचे. त्यात सामान्य नामेही आली आणि विशेष नामेही आली . आणि फक्त नामेच का , सर्वनामांचेही तेच ! तो असे म्हणल्यावर मनात डोळ्यासमोर तोच येतो , ती म्हणल्यावर तीच येते आणि ते म्हणल्यावर तेच येते . मग आता ते LGBTQIA+ वाल्यांनी कितीही गजहब माजवला तरी काही फरक पडत नाही. कारण हे शब्द आणि अर्थ मॅपिंग हे लोकोत्तर आहे. ज्यांना Zie/zir/zirs /Co/co/E/em/eir/ They/them/theirs वापरायचे आहे त्यांना वापरु दे बापडे. आजारी माणसांना जास्त त्रास देऊ नये. हेच सर्व किर्यापद , विशेषण, क्रियाविशेषण अव्यय, केवलप्रयोगी अव्यय , शब्दयोगी अव्यय , उभयान्वयी अव्यय सर्वच बाबतीत हे सत्य ! "आणि" ह्या शब्दाचा अर्थ "आणि" असाच आहे , "किंवा" ह्या शब्दाचा अर्थ "किंवा" असाच राहतो. तुम्हाला पटत नाहीये का ? तुम्ही एकदा AND च्या ऐवजी OR लाऊन तुमची SQL Query रन करुन पहा , लगेच पटेल तुम्हाला. ( सर्व्हर क्रॅश होऊन बॉसच्या शिव्या पडल्यास आमची जबाबदारी नाही. ) कर्ता , कर्म , क्रियापद , कर्तरी प्रयोग , कर्मणी प्रयोग , भावे प्रयोग ह्यांना त्यांचे असे विशिष्ठ अर्थ आहेत. आणि ते त्या शब्दांपासुन भिन्न करता येत नाहीत. एकवेळ शब्द नामशेष होईल, विस्मरणात जाईल , एकवेळ भाषा नष्ट होईल पण "शब्द : अर्थ" हे मॅपिंग नष्ट होऊ शकत नाही.
२. सुक्ष्मआणि हे मॅपिंग केवळ जड स्थूल वस्तुंबाबतच आहे असं नाही . हे सुक्ष्म वस्तुंबाबतही आहे. ओडीसामध्ये छेनापोडा नावाचा एक नितांत सुंदर गोड पदार्थ बनवतात , मी त्यावर खंडीभर लेख लिहिले तरी त्याची चव कशी गोड कशी , त्याचा सुगंध कसा होता , त्याचे टेक्श्चर कसे, हे समजाऊन शकत नाही. कस्तुरी म्हणाल्यावर कस्तुरीच आठवते , पारिजातक आठवत नाही ! रोमॅन्टिक जॅझ म्हणल्यावर मनात सॅक्सोफोन व्हायोलीनचे च सूर येतात , राग मारवा नाही येत की तांबडी चामडी चमकते उन्हातनं लकालकालकालकालका हे ही येत नाही! आणि हे मॅपिंग इतकं सटल आहे की तुम्हाला "त्याचा" प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय "ते" नक्की काय आहे कळुच शकत नाही. तुम्ही एकवेळ उपमा अलंकार वापरु शकाल पण तो केवळ निर्देशक असेल , प्रत्यक्ष नव्हे ! आता उकडीचे मोदक म्हणजे काय असं विचारल्यावर काही लोकं "स्वीट कोकोनट जॅगरी राईस स्टीम्ड मोमो " असं वर्णन करुन सांगतात. काय बोलणार ! असो.
३. अतिसुक्ष्मआणि हे शब्दः अर्थ मॅपिंग सुक्ष्माच्याही अजुन खालवर अतिसुक्ष्मातही आहे. प्रेम , राग , लोभ , क्रोध , आणि सर्वच मानवी भावना परफेक्टली मॅप्प्ड आहेत त्या त्या शब्दांशी . आणि इथे तर उपमा अलंकारही पांगळा पडतो . हा सारा अनुभवाचा मामला आहे ! मी कालिदासाप्रमाणे तिच्या नाभीला
"आवर्त मनोज्ञ नाभि:"अशी उपमा देऊ शकतो , अर्थात भोवर्यासारखी खोलवर नाभि: - की जसे भोवर्यामध्ये अडकलेला त्यातुन बाहेरच पडू शकत नाही तसे तिच्या नाभि मध्ये गुंतलेले माझे मन बाहेरच पडु शकत नाही असे काहीसे ! असं म्हणु शकतो ... पण त्याच मनोज्ञ आवर्ताचा मी तळ शोधताना तिच्या रोमरोमातुन उभारलेल्या रोमांचाला काय उपमा देऊ ? कसं सांगु ? आणि मी तरी काय सांगणार ? ती स्वतःच सांगु शकणार नाही शब्दात ! इतकं अतिसुक्ष्म आहे हे ! अर्थात There are things that are beyond words.
४. इव्हेंट होरायझॉनइव्हेंट होरायझॉन म्हणजे काय ? ही एक फिजिक्स मधील ब्लॅकहोल संदर्भातील कन्सेप्ट आहे. ब्लॅकहोलची ग्रॅव्हिटी इतकी प्रचंड असते की महाप्रचंड वेग असलेला प्रकाश देखील त्यातुन सुटु शकत नाही. जिथेपर्यंत प्रकाश गुरुत्वाकर्षणाच्या तावडीतुन सुटु शकतोय तिथे हे इव्हेंट होरायझॉन तयार होईल . त्याच्या पलीकडुन प्रकाशही बाहेर पडू शकत नाहीये , मग त्याविषयी काय बोलणार आपण . ती झाली सिंग्युलॅरिटी !
https://ritholtz.com/wp-content/uploads/2019/04/eso1907h.jpg
असो. तुर्तास टेक्निकल गोष्टी बाजुला ठेवा , आपल्याला फिजिक्सचा क्लास घ्यायचा नाहीये , आपण शब्दांच्या सिंग्युलॅरिटी विषयी बोलत आहोत!
हां तर कुठे होतो आपण ?
तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ह्या शब्दांच्या एव्हेंट होरायझॉन वर आहेत , तुम्ही निर्देशक अशा खंडीभर उपमा वारु शकता पण त्या सार्या केवळ निर्देशक आहेत , प्रत्यक्ष अनुभव घेतल्या खेरीज ते नक्की काय आहे तुम्हाला कळुच शकत नाही .
आता तुम्ही थोडं ह्या इव्हेंट होरायझॉनच्या आत उतरा , प्रयत्न तरी करा . तुम्हाला फ्लॅशेस दिसायला लागतील अशा अनेक गोष्टींचे ज्या तुम्ही शब्दात वर्णनच करु शकत नाही. केवळ निर्देशक म्हणुन शब्द तयार केलेले आहेत बस्स...
झोप
जाग येणे
बेशुध्द होणे
वेदना
सुख
परमोच्च सुख
ऑर्गॅझम
बस शब्द आहेत , प्रत्यक्ष अनुभुती ह्या शब्दांच्या आवाक्याच्या पलीकडे आहे !
Are you getting what I am tying to say ?
अजुन थोडे आत उतरु अन सिंग्युलॅरिटीकडे जाऊ...
जन्मला येणे
मृत्यु
ध्यान
समाधी
विदेहस्थिती
जीवनमुक्तावस्था
आपल्याला बस शब्द म्हणुन माहीती आहेत ... प्रत्यक्ष अनुभुती कुठाय ?
अजुन खोल काहीतरी "त्या" तिथे आहे जे शब्दांच्या परे आहे .... पण नक्की काय आहे "ते" ? काय आहे ते जे की काहीही केल्या शब्दांच्या आवाक्यातच येत नाहीये
आत्मा ब्रह्म आणि स्वरुप ...जीव शिव आणि ईश्वर ... विश्वरुप विश्वंभर ... हेही नुसतेच शब्द ...
आत्मा ब्रह्म आणि स्वरूप । हें मायेचेंची रूप ।
रूप आणि अरूप । सकळ माया ॥ १६ ॥
जीव शिव आणि ईश्वर । हाही मायेचा विस्तार ।
विश्वरूप विश्वंभर । अवघी माया ॥ १७ ॥ - आत्माराम - समर्थ रामदास
हे शब्द नुसतेच क्षितीजावर रेंगाळात आहेत , नुसताच निर्देश करत आहेत त्या सिंग्युलॅरिटीकडे ! पण नक्की काय आहे "ते " ?
सत् ... चित् ... आनंद... हे ही केवळ निर्देशक ...
एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु ।
अनन्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥
हिरण्यगर्भ ... भर्ग ... सवितृ ...
ओमित्येकाक्षर ब्रह्म ! ब्रह्मैवाहमस्मि !
तत्वमसि !
तो तूच आहेच !
(ॐ)
५. सिंग्युलॅरिटीसोऽहम् (ॐ) आता ? आतां होणार तें होईना कां । आणि जाणार तें जाईना कां । तुटली मनांतील आशंका । जन्ममृत्यूची ॥ ४४॥ जालें साधनाचें फळ । संसार जाला सफळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥ २६ ॥ हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा । साध्य होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥ २७ ॥ स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें । सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये ॥ २८ ॥ - समर्थ रामदास योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहातां पाहातां मना नपुरे धणी ॥१॥ देखिला देखिला माये देवाचा देवो । फ़िटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥ अनंतरुपें अनंतवेषें देखिलें म्यां त्यासी । रखुमादेविवरीं खुण बाणली कैसी ॥३॥ - ज्ञानेश्वर माऊली मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों ॥१॥ आतां पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥ध्रु.॥ जालों बरा बळी । गेलों मरोनि तेकाळीं ॥२॥ दोहींकडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥३॥ - तुकाराम महाराज (ॐ) ||हरि ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ||
In reply to युनिवर्सल कॉसमॉस by तुर्रमखान
In reply to +१ by वामन देशमुख
In reply to प्रत्यक्ष अनुभव घेतल्या खेरीज by सुबोध खरे
In reply to प्रत्यक्ष अनुभव घेतल्या खेरीज by सुबोध खरे
In reply to पण मग 10 पैसे परत दिलेत का साधूने ? by मारवा
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/9/9d/10_Indian_paise_%281965%29.jpg
कुठल्यातरी धातुच्या तुकड्यावर काही तरी लिहिलेलं आहे किंव्वा कोणत्यातरी कागदाच्या चिटोर्याला रंग देऊन कोणीतरी ह्याला 'पैसे/ रुपये' म्हणत आहे, तरी तुम्हाला ठामपणे ठाऊक आहे की मुल्य म्हणजे काय ! इतके ठामपणे की तुम्ही ते परत मागत आहात ! तुम्हाला मुल्य म्हणजे काय हे दाखवता येत नाही , पण 'कळंत' तर आहे ! नाणे , नोटा हे केवळ निर्देशक आहे मुल्याचे ! मुल्य म्हणजे नाणे नव्हे !
तसेच 'गोडीचे' आहे , तुम्हाला गोडी म्हणजे काय हे कोणालाच दाखवता येणार नाही, खडीसाखर केवळ निर्देशक आहे त्या गोडीची ! तुम्हाला गोडी ही स्वतःची स्वतःच अनुभवावी लागेल !
आणि समजा तुमच्या अनुभवास आले की ही गोडी म्हणजे काय आहे तरी तुम्ही ती कोणालाही समजाऊन शकणार नाहीये ! तुम्ही केवळ निर्देशक शब्द वापरु शकाल . दॅट्स द मॅक्स दॅट यु कॅन डू !
दॅट्स द सिंग्युलॅरिटी !
कळ्ळं का ?
उपरोधाने नाही , मनापासुन कळकळीने विचारत आहे , कळंलं का ? आर यु गेटींग इट ?
---
कोणाला कळ्ळं काय किंवा नाही कळ्ळं काय , त्या 'सिंग्य्लॅरिटीला' काही फरक पडत नाही ! ज्यांना "कळ्ळं " असं वाटतंय त्यांना बस निमिष मात्र हा आनंद आहे की - "हेच तर ज्ञानेश्वर माऊली म्हणत होते !!!!! " . आणि पुढच्या क्षणी तोही आनंद विरुन जाणार आहे त्या सिंग्युलॅरिटीमध्ये !
तैसें दाविलें नाहीं । तरी हाचि ययाचा ठाईं । ना दाविला तरीही । हाचि यया ॥ ७-२२५ ॥
जागृती दाविला । कां निदा हारविला । परी जैसा येकला । पुरुषपुरुषीं ॥ ७-२२६ ॥
कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो । तही ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥
ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया । तही कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥
तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता । चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥
||ॐ||
In reply to प्रत्यक्ष अनुभव घेतल्या खेरीज by सुबोध खरे
साधु -- ब्रम्हदर्शन असंच असतं, ते स्वतःलाच अनुभवायला लागतं.हा अनुभव-किस्सा आवडला. अर्थात हे इतरही अनेक ठिकाणी लागू पडू शकते. आम्ही तीन मित्र मध्यरात्री दोन-अडीच वाजता वैष्णोदेवी देऊळ डोंगराच्या पायऱ्या उतरत होतो. त्यावेळी एका विशिष्ट वळणावर कुठेतरी सोनचाफ्याची झाडे होती. अर्थात अंधारात ती झाडे दिसत नव्हती. पण त्या झाडांच्या फुलांचा अतिशय मनमोहक सुगंध येत होत होता. तितका उत्कट सुगंध त्यापूर्वी कधीही आला नव्हता. पंधरावीस मिनिटे आम्ही तो सुगंध अनुभवत तिथेच थांबून होतो. तो अनुभव शब्दांत मांडणे अशक्य आहे! तसा विलक्षण सुगंधानुभव पुन्हा कुठेही कधीही मिळाला नाही.
In reply to साधु -- ब्रम्हदर्शन असंच असतं by वामन देशमुख
प्रत्यक्ष अनुभुती शब्दांच्या आवाक्याच्या पलीकडे आहे !यथार्थ! - (मुमूक्षू) सोकाजी
In reply to यथार्थ जितके टोकदार तितक्या ब्रह्मादी संकल्पना मादक वाटतात का ? by मारवा
In reply to तथास्तु ! by प्रसाद गोडबोले
In reply to अभिनंदन आणि शुभेच्छा! ! by मारवा
In reply to One for the road by मारवा
In reply to परत एकदा तेच म्हणतो ... by प्रसाद गोडबोले
In reply to तुमच्या अंतर्यामी असलेल्या by मारवा
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा ब्रह्म्याला माझे हृदय पूर्ण वंदन.तुम्ही एक तर लेख नीट वाचलाच नाहीये किंवा वाचुन तुम्हाला कळाला नाहीये , किंवा तुम्ही माझे नाव वाचुन आधीच ठरवुन आला होता की काय प्रतिसाद द्यायचे ! मी लेखाचे नावच सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स असे लिहिले आहे , तस्मात तुम्ही वापरलेले हे सगळे शब्द केवळ इव्हेंट होरायझन वर आहेत ! आणि कसलं वंदन अन कसलं काय ? कोण कोणाला काय वंदन करणार ? हे सगळे इव्हेंट होरायझॉनवर , "सिंग्युलॅरिटी" मध्ये नाही !
मायेच्या आवरणाखाली जरी माझे शूद्र ब्रह्म झाकलेले असले तरी मी एक दिवस नक्कीच तुमच्या बरोबर बसून अहं ब्रह्मास्मी चा जयघोष करणारच.मायेचे आवरण , झाकलेले ब्रह्म वगैरे शब्द तुमचे बाळबोध आकलन आणि तुम्ही लेख वाचलाच नाही ह्याची प्रतीती देत आहेत ! . तुम्हाला कळणार नाहीयेच , पण तरीही रिव्हिजन म्हणुन लिहिति - माया ह्या शब्दाची व्युतप्त्तीच या मा सा माया अर्थात जी नाहीच ती म्हणजे माया अशी आहे . ह्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी अतिषय सुंदर ओवी लिहिली आहे -
अविद्या येणें नांवें । मी विद्यमानचि नव्हे । हे अविद्याची स्वभावें । सांगतसे ॥पुढे माऊली म्हणतात :
आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥बाकी तुम्ही शुद्र वगैरे म्हणालात त्यातुन तुमचे पुर्वग्रहदुषित अंतःकरण दिसुन येते , कारण मी माझ्या लेखनात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र , एकुणच सनातन वर्णाश्रम धर्म ह्या विषयी चकार शब्द काढलेला नाही . समर्थांनी स्पष्ट म्हणुन ठेवलं आहे -
ब्राह्मणांचें ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचें ब्रह्म तें ओंवळें । ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचिना ॥ २५॥तुमचे पुर्वग्रह तुमच्यापाशी , मला त्यांचा स्पर्ष होत नाही. मी कित्येक अशा शुद्रवर्णातील लोकांना ओळखतो ज्यांचे सनातन धर्मावर , वर्णाश्र्रम व्यवस्थेवर ठाम श्रध्दा आहे , आणि मी एका अशा महाभाग ब्राह्मणालाही ओळखतो जो भोळ्या भाबड्या भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडतो आहे. माझ्या लेखी हे असे शुद्र अशा ब्राह्मणांपेक्षा कैकपटीने उच्च आहेत ! आणि तुम्ही लेख नीट वाचला तर तुम्हाला लेखाच्या शेवटी जगद्गुरु संत तुकाराम महाराज ह्यांच्या ब्रह्मानुभुतीचा अभंग दिसेल . तुकोबा स्वतःहुनच "याति शुद्र केला वेवसाय " असे म्हणाले आहेत . तरी त्यांच्या अभंगात मला तीच झलक दिसते जी ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगात आहे , समर्थांच्या श्लोकात आहे ! फक्त त्यासाठी दृष्टी पाहिजे ! जोवर तुम्ही "मी शुद्र" ह्या अहंकाराला कवटाळुन बसला आहात तोवर तुम्हा सिंग्युलॅरिटी तर सोडाच पण इव्हेंट होरायझॉन देखील दिसणार नाही !
आणि एक दिवस अखिल विश्वातील शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण इतकेच काय म्लेच्छ ब्रह्मंसुद्धा एकमेकांत बसून जयघोष करणारच वयं ब्रह्मास्मी वयं ब्रह्मस्मीआता हे तुम्ही उपरोधिक पणे लिहिले आहे की खर्या श्रध्देने हे तुमचे तुमालाच ठाऊक , पण कसेही असले तरी परत एकदा तेच म्हणतो जे आधी दोन वेळा म्हणालो आहे - तथास्तु ! अर्थात तसेच असो ! जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ इत्यलम ! अवांतर : समुद्रमंथनाच्या वेळेला जेव्हा भगवान विष्णु मोहिनी रुप घेऊन देवांना अमृत वाटत होते तेव्हा मायावी राहु देवांचे रुप घेऊन त्यांच्या प़तीत जाऊन बसला, इतकेच नव्हे तर त्याने चक्क अमृत प्राशनही केले पण ते लक्षात आल्यावर भगवंतांनी तत्काळ सुदर्शनचक्राने त्याच्या शिरछेद केला आणि अमृत पोटात जाऊन पचण्या आधीच राहु मेला ! अमृत प्राशन करुन देखील मेला ! अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ फार मजेशीर गोष्ट आहे नै ! =))))
In reply to अभिनंदन आणि शुभेच्छा! ! by मारवा
In reply to यथार्थ जितके टोकदार तितक्या ब्रह्मादी संकल्पना मादक वाटतात का ? by मारवा
In reply to पण पाश्चात्य लोक ब्रम्ह by Bhakti
In reply to पण पाश्चात्य लोक ब्रम्ह by Bhakti
In reply to ब्रह्म वा तत्सम संकल्पना आहेत. by मारवा
त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्यावर चर्चा करण्यासाठी मोठा आनंद आहेच. जसे फुलराणी या रम्य कवितेविषयी चर्चेत इतकंच काय तिला उलगडून पहतानही आनंदच येत असतो.
अगदी अगदी..
ब्रम्ह संकल्पनेच्या? यशाचे हे एक मोठे कारण आहे...आनंद!
गोळीबंद संकल्पना नव्हतं माहिती, नवीन समजलं.In reply to ब्रह्म वा तत्सम संकल्पना आहेत. by मारवा
In reply to ब्रह्म वा तत्सम संकल्पना आहेत. by मारवा
In reply to ब्रह्म वा तत्सम संकल्पना आहेत. by मारवा
In reply to यथार्थ जितके टोकदार तितक्या ब्रह्मादी संकल्पना मादक वाटतात का ? by मारवा
अशा टाईप च्या ज्या कोणत्याही आध्यात्मिक संकल्पना असतात त्या करोडोत एखादा जाणतो अनुभवतो या रीतीने च मांडणी प्रत्येक पंथात आवर्जून केलेली असते. शिवाय तुमचा प्रयास वगैरे ही मुप्योगाचा नाही कृपा वगैरे हवी. किंवा तुम्ही मूलतः अतिशय नालायक किंवा पतित इतके आहात की you are not eligible. सर्वसाधारणपणे सर्वच धर्मात ब्रहादी संकल्पना अनुभूती बद्दल मांडणी असते.दुर्दैवाने हे तंतोतंत खरे आहे.
ब्रह्म काय आहे कसे असावे याचा कोणीच अनुभव घेऊ शकत नाहीह्याला कारणीभूत आहे वरच्या परिच्छेदातील पंथ आणि त्यांची माडणी. अध्यात्माला शास्त्रिय दृष्टीकोनातून न बघता त्यात इश्वरी, दैवी, धार्मिक अंगाने बघून कृतीवर भर न देता शब्दांचे अवडंबर केल्याने ब्रह्म काय आहे कसे असावे याचा
- पक्ष
- साध्य
- सिद्धता
- निष्कर्ष
In reply to अहं ब्रह्मस्मी! by सोत्रि
In reply to अहं ब्रह्मस्मी! by सोत्रि
In reply to विपश्यनेच्या बाबत by स्वधर्म
शब्दांचा पिसारा फुलवून भुलवणार्या लोक व ग्रंथ यापासून मुक्ती मिळवण्याचा आनंदहेच आम्ही सांगितलं तर तुम्हाला पटत नाही . गट क्रमांक १ आणि २ हे अन डिस्युटेबल आहेत . गट क्रमा़ १ मधील कोणीही काहीही लिहिलं तरी तुम्हाला शब्दाचा पिसारा वाटणार आहे . साधं सोप्पं आहे बघा , १९५६ साली बाबासाहेबांनी समस्त जगाला बुध्दाचा मार्ग दाखवुन दिलेला आहे . तुम्ही कशाला ह्या गट क्रमा़ १ वाल्यांच्या शब्दाचा पसारा अन भुलवणारे ग्रंथ वगैरे बघत बसता ! सरळ विपश्यना करा ! मोक्ष बिक्ष आत्मा ब्रह्म बिम्ह सब झूट आहे हे तुम्हाला माहीत आहेच की आधीच ! कशाला तुम्ही हा शब्दांचा पिसारा बघुन त्रास करुन घेताय ? देश स्वतंत्र आहे , ग्रंथ बिंथ जाळायला तुम्हाला मोकळीक आहे ! अगदीच हा लेख आवडला नसेल तर ह्या लेखाची प्रिंट काढुन जाळा ! जाळपोळ करायची परंपरा ही आहेच ! पण ज्यांना शब्दांचा पिसारा फुलवायचा आहे , ग्रंथ वगैरे वाचायचे आहेत त्यांना वाचु द्या की ! त्यांन्नी तुम्हाला आमंत्रण दिले आहे का वाचायचे ? कि तुम्हाला त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची आहे ? तुम्ही तुमच्या आनंदात रहा , त्यांना त्यांच्या आनंदात राहु दे ! तुम्ही बुध्दाच्या मार्गाचे आचरण केले तर त्यात आम्हाला आनंदच आहे कारण आम्ही बुध्दाला विष्णुचा ९वा अवतार मानतोच ! एके हाती दंतु | जो स्वभावता खंडितु | तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा ||१-१२|| असे म्हणुन माऊलींनी बौध्दमताला गणेशाचा रुपात स्थान दिलेले आहेच ना ! कसेही करा , कोणताही मार्ग आचरा , किंवा कोणताही मार्ग टाळा . आमची कसली सक्ती नाही कि कसला आग्रह नाही ! आमचं काही भांडण नाही विपश्यनेशी . उलट आम्हालाही कौतुकच आहे ! जो जे वांच्छील तो ते लाहो हीच आमची प्रार्थना आहे पहिल्यापासुन ! म्हणुनच म्हण्तो - तथास्तु !
In reply to है का ! by प्रसाद गोडबोले
In reply to तसं जर असेल तर by स्वधर्म
मग इथल्या प्रत्येक प्रतिसादाला प्रतिसाद आपण का देता?तुम्ही इतर प्रतिसाद वाचत नाही काय ? ह्या प्रश्नाचं उत्तर मी खालीच एका प्रतिसादात आधीच दिले आहे - मला मजा येत आहे म्हणुन ! तुम्हाला पटलं तरी हरकत नाही , नाही पटलं तरी हरकत नाही . आम्ही तुमच्या भाषेत "शब्दांचा पिसारा " फुलवत राहु , तुम्ही बस त्रास करुन घेऊ नका ! बाकी ह्या निमित्ताने तुम्ही तुकोबांची गाथा वाचताय , वेदांचा अर्थ समजुन घेताय हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे , मग मजा तर येणारच ना ! :)
In reply to रीकन्सिलेशन by कॉमी
In reply to कारण सनातननुसार by Bhakti
In reply to मार्ग आहेत हे ठीक. पण का? by कॉमी
In reply to स्वतःचा साक्षात्कार हे चूक by Bhakti
In reply to ब्रम्हाला कर्माची फिकीर कशाला by कॉमी
In reply to उत्तर by प्रसाद गोडबोले
आपलं आपल्याला कळाल्याशी मतलब. आपल्याला जे कळलं अनुभवाला आलं त्याचेच निरनिराळे पैलु आपणच उपभोगावेत ह्यासाठी लिहावे हे उत्तम !अशी प्रस्तावना केल्यावर लेख 'गंगार्पणमस्तू' म्हणून सोडून देण्यातच गंमत आहे (हे माझ मत)! - (स्वांतसुखी होण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
In reply to ह्म्म्म by सोत्रि
In reply to उत्तर by प्रसाद गोडबोले
In reply to उत्तर by प्रसाद गोडबोले
In reply to स्वतःचा साक्षात्कार हे चूक by Bhakti
स्वतःचा साक्षात्कार हे चूक आहे.हे कसं काय चूक आहे? नेमकं काय म्हणायचं आहे ते कळलं नाही म्हणून हा प्रश्न आहे.
तुम्ही अलिप्त कधीच होऊ शकत नाहीअलिप्त होण हीच मुक्ती आणि त्यासाठीच तर सर्व अट्टाहास आहे! असो, अलिप्त होऊ शकत नाही हे तुमचे म्हणणे जरा स्पष्ट करून सांगाल का? - (अभ्यासू) सोकाजी
In reply to साक्षात्कार by सोत्रि
In reply to मार्ग आहेत हे ठीक. पण का? by कॉमी
ज्यांना स्वतःचा साक्षात्कार झाला आहे आणि ज्यांना शरीर म्हणजे आपण नाही आहे हे समजले आहे ते शरीराची उस्तभार कशाला करतातदोन उदाहरणं ह्यासाठी. १. ज्ञानेश्वर माउली, त्यांना जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहीपर्यंत शरीराची उस्तभार केली. त्यानंतर त्यांनी समाधी घेऊन शरीराचा त्याग केला. २. गौतम बुद्धाला जेव्हा बोधीप्राप्ती झाली तेव्हा त्याच्यातल्या करुणेमुळे, ते ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे ह्यासाठी उर्वरीत जीवन त्याची शिकवण शिकवण्यासाठी शरीराची उस्तभार केली सगळे साक्षात्कारी मोस्टली ह्या दोन कॅटेगरीमधे मोडतात. - (मुमूक्षू) सोकाजी
In reply to शरीराची उस्तभार by सोत्रि
युनिवर्सल कॉसमॉस