साहित्यः
बटाटे - १/२ किलो
लालबुंद टोमॅटो - १/२ किलो
सिमला मिर्ची - १ नग (मोठी)
मटार दाणे- १/२ वाटी
कांदे :- भाजी साठी २ वरून सजावटीसाठी २
अमूल बटर - ४०० ग्रॅम
काश्मिरी मिरच्या - १०-१२
मीठ - चवीनुसार
धणे पावडर - २ टेबलस्पून
पावभाजी मसाला (बादशहा किंवा एव्हरेस्ट) - २ टेबल स्पून
लसूण पेस्ट - १ ते १-१/२ टेबलस्पून
कोथींबिर - वाटीभर
छेडर चिझ - १०० ग्रॅम
कृती:
बटाटे उकडून, साले काढून, कुस्करून ठेवावेत.
टोमॅटो, सिमला मिरची, कांदे बारीक चिरून ठेवावेत.
मटारचे दाणे उकडून ठेवावेत.
काश्मिरी मिरच्या गरम पाण्यात अर्धातास भिजवून मिक्सर मधून ग्राइंड करून त्याची मुलायम पेस्ट करून ठेवावी. पेस्ट जितकी मुलायम होईल तितका त्याचा रंग जास्त लाल भडक होत जातो.
प्रथम एखाद्या पसरट जाड बुडाच्या पातेल्यात मंद गॅस वर २०० ग्रॅम अमूल बटर गरम करावे. बटर पूर्ण वितळण्याआधीच त्यात बारीक चिरलेला अर्धा कादा घालावा आणि परतावा. (नुसते बटर लवकर जळते) नंतर, सिमला मिरची, उकडलेले मटार घालून परतावे. परतून, शिजून मऊ झाले की पावभाजी करण्याच्या चेपणीने मस्त चेचून घ्यावेत. फायनल चवीत ही पायरी खूप बदल घडवू शकते. शिजलेला कांदा, सिमला मिरची, वाटाणे चांगले चेचून एकजीव झाले पाहिजेत. नंतर, त्यावर बटाटे, टोमॅटो, धणे पावडर, पावभाजी मसाला, लसूण पेस्ट, काश्मिरी मिरची पेस्ट घालून नीट परतावे. थोडे थोडे पाणी घालून चेपणीने चेचत राहावे. गॅस फुल्ल असावा. चेचून चेचून सर्व भाजी एकजीव झाली, बटर किंचीत दिसायला लागले की त्यात अर्धी कोथींबिर आणि पुन्हा १०० ग्रॅम बटर घालून सर्व एकजीव करावे. थोडेथोडे पाणी घालून भाजीचा पोत सांभाळावा.
आता गॅस बंद करून भाजी खाली उतरवावी. एखाद्या बाऊल मध्ये भाजी काढून त्यावर थोडी कोथींबिर भुरभुरून वरून १०० ग्रॅम चिझ किसून टाकावे.
प्लेट मध्ये तो बाऊल ठेवून शेजारी बारीक चिरलेला कांदा, लिंबू , हिरवी मिरची आणि खरपूस भाजलेले पाव ठेवून सादर करावे.
शुभेच्छा....!Taxonomy upgrade extras
वाचने
43813
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
कळफलक खलास झाला
तोंडाला पाणी सुटले.. टोमॅटोंबद्दल मत धनंजय यांच्यासारखेच.
In reply to कळफलक खलास झाला by धनंजय
धन्यवाद..
In reply to तोंडाला पाणी सुटले.. टोमॅटोंबद्दल मत धनंजय यांच्यासारखेच. by सुवर्णमयी
तुमचं हे दरवेळचं आहे पंत,
टेट्रापॅक टोमॅटो पल्प....
हं...
शुभेच्छा...
In reply to हं... by स्वाती दिनेश
पावभाजी...
In reply to शुभेच्छा... by प्रभाकर पेठकर
हरकत नाही....
In reply to पावभाजी... by स्वाती दिनेश
आहा!
वेळ झाली!
कधी जायचं बोल..?
In reply to वेळ झाली! by सर्वसाक्षी
म्या
In reply to कधी जायचं बोल..? by विसोबा खेचर
ह्म्म्म.....
In reply to म्या by केशवसुमार
फोटो
धन्यवाद...
फोटो
तोंडाला पाणी.
त्या काश्मिरी मिरच्या
धन्यवाद...
पुढच्या महिन्यात
तयार
हा हा हा
In reply to तयार by वरदा
सहभागी....
In reply to तयार by वरदा
तुमची इकडे शाखा का नाही?
In reply to सहभागी.... by प्रभाकर पेठकर
पंत,
In reply to तुमची इकडे शाखा का नाही? by llपुण्याचे पेशवेll
आमची शाखा..खा..खा..खा..!
In reply to पंत, by चतुरंग
मस्कतला
जरूर...
In reply to मस्कतला by वरदा
अरे वा
अवश्य...
अजुन वेळ आहे
फोटो कुठे काढला आहे?
होय...
In reply to फोटो कुठे काढला आहे? by ओंकार
वा !!!
आई शपथ्थ..
हम्म....
In reply to आई शपथ्थ.. by प्राजु
छान. .....
वा !!!!!
अवांतर - मराठी!
In reply to वा !!!!! by umavaidya
माझं मराठी
In reply to अवांतर - मराठी! by विसोबा खेचर
गैरसमज..
In reply to माझं मराठी by umavaidya
धन्यवाद तात्या
In reply to गैरसमज.. by विसोबा खेचर
Thank you
In reply to धन्यवाद तात्या by umavaidya
Tatya, you are simply
In reply to Thank you by दवबिन्दु
उत्तम चव
पेठकर सर?
In reply to उत्तम चव by स्वाती राजेश
ऋण!
In reply to पेठकर सर? by प्रभाकर पेठकर
ऋण?
In reply to ऋण! by विसोबा खेचर
पावभाजी...
चीझ....
In reply to पावभाजी... by कोलबेर
मस्त
धन्यवाद...
In reply to मस्त by लिखाळ
ही चेपणी कुठे मिळेल?
उपहारगृह...
In reply to ही चेपणी कुठे मिळेल? by अंजली
मस्तच----
धन्यवाद...
In reply to मस्तच---- by अमेयहसमनीस
खुप छान!
भाजीचा रंग लाल भडक
मस्त
मस्त
काल रात्री केली..