• घरी सत्यनारायण पूजेच्या प्रसादाला आलेल्या शेजारच्या काकूंना मी सांगितले, “सत्यपीर ही बंगालातील मुसलमानांची पूजा आपण कॉपी केली आहे.” घरचे भडकले आणि पूजा संपेपर्यंत मला घराबाहेर काढले. सांगा, माझे काय चुकले?
• “बाळा, लवकर ये. आम्ही तुझी वाट पाहतोय,” असे प्रिवेडिंग बेबीशूटचे फोटो त्याने फेसबुकवर टाकले. “त्याचे तो ९ महिने घेईलच ना, लवकर कसा येईल?” मी कमेंट मधे विचारल्यावर त्याने फोन करुन घाण घाण शिव्या देऊन पुन्हा असे करू नकोस म्हणून बजावले. सांगा, माझे काय चुकले?
• शिक्षकदिनी, व्हॉट्सअप समूहात गुरुजींच्या आठवणी सुरू होत्या. “आमचे गुरुजी कडक होते, मारायचे, आमची शाळा अशी होती,” वगैरे वगैरे चर्चा सुरू होती.
“काय दिवे लावले?” त्यांनी मला स्वतः समुह सोडून जा नाहीतर रिमूव्ह करू म्हणून सांगितले. सांगा, माझे काय चुकले?
• “हिंदुत्वरक्षणासाठी आनंद साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्याच्या मोर्चात सहभागी व्हा, अभी नही तो कभी नहीं.” असा आनंद साहेब युवा मंच ह्या व्हॉट्सअप समूहात मॅसेज आला.
“साहेबांचा मुलगा हिंदुत्व रक्षणासाठी टोरांटोहून कुठल्या फ्लाइटने येतोय?” मी विचारले.
दहा मिनिटांनी मला हिंदूद्रोही ठरवून समूहातून रिमूव्ह केले नी आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस म्हणून बजावले. सांगा, माझे काय चुकले?
• निवडणुकीत अमुक साहेबांना विजयी करा, असं व्हॉट्सअप समुहात सांगन्यात आले. , “सध्या आपल्या शहराचा मानवी विकास निर्देशांक काय? आणि साहेब तो कुठे नेणार?” मी विचारले. “मत दिले नाहीस तरी चालेल, पण तू समूहात नको,” म्हणून मला समूहातून बाहेर काढन्यात आले. सांगा, माझे काय चुकले?
• शाळेत असताना “व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते,” असे मास्तरांनी सांगितले.
“मग तुमचं पोट कसं सुटलंय?” मी विचारले.
मास्तरांनी मला मैदानात झाडू मारायला पाठवले. सांगा, माझे काय चुकले?
• जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले, “आपण ह्या विचारांचा प्रसार करतो.”
“पण अमलात किती आणतो?” मी विचारले.
पुढच्या कार्यक्रमात दिसू नकोस, अशी सक्त ताकीद देऊन मुख्याध्यापकांनी मला सोडले. सांगा, माझे काय चुकले?
• प्रात: संघशाखेत स्वयंसेवक दंडप्रहार शिकवत होते. “अशा प्रकारे दंड डोक्यात हाणावा.”
“ पण दंड हाणायला “मोहल्ल्यात” कधी जायचे?” मी विचारले. “ह्याला पुन्हा शाखेत कुणी आणले रे?” ते ओरडले. सांगा, माझे काय चुकले?
• खोटे मित्र कसे ओळखावे ह्याचे तंत्र मला वडिलांनी सांगितले. “तरीही तुमच्या सख्या भावानेच तुम्हाला कसे फसवले?” मी विचारले. ते काठी शोधे पर्यंत मी धावत पळत काकांचे घर गाठले. सांगा माझे काय चुकले?
• दोन वर्षांचा भाचा मोबाईल चार्जरसोबत खेळत असताना मी त्याला समजावले, “आईला मारू नकोस.” त्याने डोक्यात हाणलेला चार्जर वडिलाना दाखवत तिने सांगितले “ह्यानेच त्याला शिकवले,” . वडील मला रागावले. सांगा, माझे काय चुकले?
• कंपनीत मुलींच्या ग्रुपमध्ये चर्चा चालूअसताना मी ऐकले. “आपल्या देशातल्या मुली सर्वात लाजाळू असतात,”
“मग तरीही देशाची लोकसंख्या जगात अव्वल कशी?” मी विचारले. दोन मुलीनी तोंडावर हात ठेऊन पलायन केले. उरलेल्यांनी मला ये आता म्हणून सांगितले. सांगा, माझे काय चुकले?
• मंदिरात दर्शनाला आलेल्या वहिनींना मी विचारले, “आपण दर्शन घ्यायला येतो की देवाला दाखवायला?”, “तुमचे नी कल्याणीचे प्रकरण आईना सांगते!” वहिनीनी धमकावले. त्या दिवशी निघालेले भांडे घासून मी प्रकरण मिटवले. पण सांगा, माझे काय चुकले?
• मटण आणायला गेलेल्या काकांना मी मटण दुकानदारासमोर श्रावण महिन्याची आठवण करून दिली. काका मटण न घेताच परतले. खाटकाने सुऱ्याला धार लावत माझ्याकडे संतापाने पाहिले. सांगा, माझे काय चुकले?
सांगा सांगा माझे काय चुकले?
वाचने
6589
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
अबा, सो इनोसन्ट
काय चुकलं?
आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस
पण मी चुकीचे काय बोललो होतो?
In reply to आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस by सुबोध खरे
तुमचे काहीच चुकले नाही. असेच
In reply to पण मी चुकीचे काय बोललो होतो? by अमरेंद्र बाहुबली
सौ सुनारकी
In reply to तुमचे काहीच चुकले नाही. असेच by गवि
पण मी चुकीचे काय बोललो होतो?
In reply to पण मी चुकीचे काय बोललो होतो? by अमरेंद्र बाहुबली
सत्य असले तरी बोललेच पाहिजे
In reply to पण मी चुकीचे काय बोललो होतो? by सुबोध खरे
सत्य असले तरी बोललेच पाहिजे असे नसते.अच्छा. असे होय. शाळेत भिंतीवर “नेहमीखरे बोलावे असे साने गुरुजींच्या फोटोसह लिहिलेले होते ते का म्हणून? :(खरं बोलून पाहा मोठेपणी हे
In reply to सत्य असले तरी बोललेच पाहिजे by अमरेंद्र बाहुबली
चांगलं लिहिलय बाहुबली. मी ही
ह्यावर आणखी एक.
In reply to चांगलं लिहिलय बाहुबली. मी ही by रात्रीचे चांदणे
निवड्नुकीनंतर
“संशय येऊ नये म्हणून तसे
In reply to निवड्नुकीनंतर by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to “संशय येऊ नये म्हणून तसे by अमरेंद्र बाहुबली
भाजपचा spy असावा.
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to भाजपचा spy असावा. by अमरेंद्र बाहुबली
एस म्हणून म्हणून तुम्ही आता
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादाला by सुबोध खरे
अंबा, तुम्हीच एक वाटसप ग्रूप
खिक्क. :)
In reply to अंबा, तुम्हीच एक वाटसप ग्रूप by कंजूस
२
मस्त
दहा मिनिटांनी मला हिंदूद्रोही
हाहा. खरं आहे. ;)
In reply to दहा मिनिटांनी मला हिंदूद्रोही by संजय खांडेकर
हाहा