माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..
राम राम मंडळी,
आजपर्यंत गाण्याबजावण्याच्या दुनियेत खूप मुशाफिरी केली. ती करत असताना अनेक जुनी-दुर्मिळ ध्वनिमुद्रणे, इतिहासाची साक्षिदार असलेली जुनी-दुर्मिळ प्रकाशचित्रे माझ्या संग्रही जमा होत गेली. त्यातली काही प्रकशचित्रे आज इथे देत आहे. ह्या प्रकाशचित्रांचे श्रेय त्या सर्व अज्ञात प्रकाशचित्रकारांना. परंतु त्यावरील शीर्षके-शब्दांकन-टिप्पणी अर्थातच तात्या अभ्यंकरांची..!
१) ॐ भास्कराय नम:
पं भास्करबुवा बखले. संगीताच्या दुनियेत खरोखरच ज्याला भास्कर म्हणावं असा गवई, उतम गुरू. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर या तीन घराण्यांवर हुकुमत. स्वयंवर नाटकात 'नाथ हा माझा', 'स्वकुल तारक सुता', 'सुजन कसा मन चोरी' या सारखी एकापेक्षा एक सुरेख पद देणारा एक खूप महान कलाकार, महान संगीत दिग्दर्शक. आणि मास्तर कृष्णराव, नारायणराव बालगंधर्व यांसारखे शिष्योत्तम घडवणारा एक महान गुरू! भास्करबुवंना सलाम..!
-----------------------------------------------------------------------------------------------
२) रसिला आग्रेवाला!
उस्ताद विलायत हुसेन खासाहेब! आग्रा गायकीचा एक रसिला, रंगीला गवई. एक उत्तम बंदिशकार. आत्ता हे लिहीत असतांना खासाहेबांनी गायलेली 'पवन चलत..' ही परज रागातील बंदिश कानात रुंजी घालत आहे. मस्तच गायचे खासाहेब! :)

३) राजकल्याणाचा बादशहा!
वसंतराव! खास मुडात दिसत आहेत :)
सुरालयीवर जबर हुकुमत असलेला कलाकार. माणूस म्हणूनही तेवढाच जिंदादिल आणि उमदा..!

४) उड जाएगा हंस अकेला..!
कुमार गंधर्व! एक प्रयोगशील आणि विलक्षण प्रतिभावान कलाकार. पारंपारिक घराणेदार गायकीपेक्षा संपूर्णपणे वेगळी अशी स्वत:ची गायकी निर्माण करणारा कलाकार! कबीर, सुरदास आणि मीरेची निर्गुणी भजनं आपल्या चालीत, आपल्या ढंगात गाऊन श्रोत्यांना अंतर्मुख करणारा कलाकार!
कुमारांची मैफल सुरू आहे आणि तालालयीचा बादशहा वसंतखा देशपांडे प्रेमाने, आदराने आपल्या मित्राकरता तबल्याच्या ठेक्याला बसला आहे! संवादिनीच्या साथीला आमचे आप्पा जळगावकर आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------
५) गुणीदास!
पं जगन्नाथबुवा पुरोहित. आमच्या जगन्नाथबुवांबदल काय बोलू? एक आभाळाइतका मोठा माणूस! आग्रा गायकीतली अधिकारी व्यक्ति. स्वत: अतिशय उत्तम बंदिशकार. अतिशय श्रवणीय व गेय अश्या रचना असत जगन्नाथबुवांच्या. जोगकंसासारख्या एका अप्रतीम रागशिल्पाची निर्मिती! एक फार मोठा गुरू. संगीतभूषण पं रामभाऊ मराठे, पं यशवंतबुवा जोशी, माणिक वर्मा, पं जितेंद्र अभिषेकी, पं भाई गायतोंडे अशी जगन्नाथबुवांची शिष्य परंपरा पाहिली की बुवा ही किती असामान्य आसामी आहे हे लक्षात यावं! इतका मोठा गुरू की अभिषेकीबुवा सकाळी सातला तालमीला यायचे असले की बुवा पावणेसातलाच स्वत: सतरंजी वगैरे घालून, तानपुरे गवसणीतून काढून सिद्ध रहात. स्वयंपाक तर अतिशय उत्तम करायचे असे आम्हाला माणिकताई सांगायच्या!
जगन्नाथबुवांना माझा साष्टांग दंडवत!

६) भारतरत्न!
उस्ताद अब्दुल करीम खासाहेबांची झिंजोटी रागातली 'पिया बिन नाही आवत चैन' ही थाळी ऐकली आणि आपल्याला गाणं यायला हवं ते असंच सुरेल यायला हवं असा ध्यास घेऊन जगाची काहीही माहिती नसतांना वयाच्या दहाव्या वर्षी एक ध्येयवेडा मुलगा घरातून पळाला. गाणं शिकण्याकरता गुरुच्या शोधार्थ वणवण फिरला. पहाडी सन्यालच्या घरी हरकाम्या नोकरापासून ते अनेक गुणीजनांकडे कष्ट उपसले, अनेकानेक दिवस उपासमार सहन केली. ग्वाल्हेर, रामपूर, बनारस, लखनऊ, इत्यादी उत्तर हिंदुस्थानातल्या अनेक ठिकाणी उमेदवारी केली, जिथे जे मिळेल ते वेचलं. अखेर कुंदगोळात गुरू सापडला. सवाईंच्या छत्रछायेखाली किराणा गायकीची तालीम सुरू झाली. सवाईंकडेही कष्टाचे डोंगर उपसले तेही मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने! पुण्यात १९४६ साली हिराबागेतल्या जाहीर मैफलीत लोकांनी प्रथमच भीमसेनी स्वर ऐकला. तेव्हापासून आजवर अण्णा गाताहेत आणि लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकताहेत हेच घडत आलेलं आहे! सारे स्वर, सार्या शृती हात जोडून पुढ्यात उभ्या! सारी सारी विशेषणं, पदव्या, बिरुदं कमी पडावीत असं दैवी गाणं! नादब्रह्माचा साक्षात्कार!
अगदी तरूण वयातले अण्णा आकशवाणीकरता गातांना-
त्यांची आवडती काका हलवायाकडची साजूक तुपातली जिलेबी घेऊन घरी गेलो होतो. पायांवर डोकं ठेवलं. तो थरथरता हात माझ्या डोक्यावर स्थिरावला! "अण्णा, आपल्याला भारतरत्न मिळालं हे ऐकून अतिशय आनंद वाटला!" असं म्हटलं. तर आमचे अण्णा इतके साधे आणि मिश्किल, की ते एवढंच म्हणाले, "हम्म! भारतरत्न मिळालं खरं! वयाच्या १० व्या वर्षी घरतून पळून गेलो होतो ते अगदीच काही वाया नाही गेलं म्हणायचं इतकंच!" :)
-- तात्या अभ्यंकर.
अजूनही पुष्कळशी प्रकाशचित्रे आहेत त्याबाबत पुन्हा कधितरी! :)

वाचने
15250
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
मस्त!
खुपच छान
सही आहेत
वा वा
तात्या..
फोटो आणि
साष्टांग दंडवत....
मस्त!!
वा ! सुरेख !!
सुरेख
In reply to सुरेख by सहज
वा..
प्रकाशचित्रे
तात्या,खूप
मस्तच ...
In reply to मस्तच ... by नीलकांत
+१
मस्त !
In reply to मस्त ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
धन्यवाद तात्या.
व्वा!!!!!
तात्या,
अप्रतिम...
तात्या
निव्वळ
तात्या,
In reply to तात्या, by रामदास
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
दुर्मिळ
In reply to दुर्मिळ by शिप्रा
+१
अजून
In reply to अजून by सुमीत भातखंडे
सुमीतराव, च
In reply to सुमीतराव, च by लिखाळ
धन्यवाद
In reply to अजून by सुमीत भातखंडे
सुमित चित्रे आवडली!
In reply to सुमित चित्रे आवडली! by चतुरंग
खरंय
अप्रतिम खजिना!
जिवाभावाचे मित्र..
वा ! तात्या,
In reply to वा ! तात्या, by लिखाळ
+१
परत
अप्रतिम ठेवा! दुसरे शब्द नाहीत!
सुमीत
प्रकाशचित्रे!
In reply to प्रकाशचित्रे! by शशिधर केळकर
काहीना
एक
उपकृत...