चप्पलच्या दुकानातंही आत
चपला काढून शिरावं लागतं .
धर्म नावाचं मूल्य मनात,
असं खो Sssलपर्यंत जिरावं लागतं
नुसतच," हे असं कसं !? "
असं म्हणून भागत नाही .
एकट्यानीच जगायचं . . ?,
तर मग
यापेक्षा काहीच लागत नाही .
पण टोळीत जगणार ना तुम्ही ?
मग द्यायला हवी हमी .
पत्ते आवडत नसले खेळायला,
तरी जमवावी लागेल रम्मी !
जिंदगीचा डाव शिकायला
मनाविरुद्ध वागावं लागतं .
चप्पलच्या दुकानातंही आत
चपला काढून शिरावं लागतं .
सालं त्याचं बिचाऱ्याचं तरी काय चुकलं ?
आपणच चपलेला "इथे" आणून ठेवलं !
त्याचा मान राखायचा नादात नादात
तिचाच मान राखायला लागलो आपण !
आणि तिच्याच दुकानात जाताना
तिलाच काढून ठेवायला लागलो आपण !
सालं, मूल्य कुठलं ?चप्पल कुठली ?
नक्की कोण कुणाला मारतय ?
माझच खेटरं आता माझ्याकडे
पाहून खुदुखुदु हसतय!
आज चांगलीच तोंडात बसली
माझा मीच म्हणालो .
आणि नव्या चपला घेऊन
जुन्या पायात घालून निघालो !
==============
अतृप्त . .
काव्यरस
वाचने
3332
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
हल्ली कविता भावूक होऊ लागल्या
हा हा
In reply to हल्ली कविता भावूक होऊ लागल्या by कंजूस
माझाच वर्गमित्र
कवितेला पण वय आसतं...
भावगंभीर तरल काव्य रचना.
सहमत. आणि यात असलेली
In reply to भावगंभीर तरल काव्य रचना. by प्रचेतस
@चपलांच्या ह्या काव्यात कवीने
In reply to भावगंभीर तरल काव्य रचना. by प्रचेतस
ही हरेश्वरची दिवादांडी* आहे.