तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे
नमस्कार मिपाखरांनो! महाराष्ट्रात आंब्याचे लोणचे घालायचे दिवस येऊ घातलेत. त्यानिमित्ताने तेलंगाणा पद्धतीचे आंब्याचे लोणचे ही पाककृती सादर करत आहे. आवड असल्यास नक्की करून पहा. साहित्य:
- कैऱ्या - चार किलो
- लसूण - अर्धा किलो
- आलं - अर्धा किलो
- तिखट - एक किलो
- मीठ - एक किलो
- मोहरी पूड - ५० ग्राम
- जिरे पूड - ५० ग्राम
- मेथी पूड - ५० ग्राम
- शेंगदाण्याचे तेल - तीन किलो
- कच्चे आंबे (कैऱ्या) ह्या निबर, गडद हिरव्या सालीच्या, आतून पांढऱ्या, आंबट अश्या बघून घ्याव्यात. मऊ, पिवळट, गोडसर अश्या घेऊ नयेत.
- लसूण हा चांगल्या घट्ट गड्ड्यांचा, तीक्ष्ण चव व वासाचा असा घ्यावा.
- आलं हे चांगल्या प्रतीचे, मोठमोठ्या खांडांचे, तीक्ष्ण चव व वासाचे घ्यावे.
- तिखट हे लाल रंगाचे, तिखट चवीचे घ्यावे.
- बरण्यांत घातल्यावर नेहमीच लोणच्यावर तेलाचा वर थर असावा. फोडी उघड्या पडू नयेत, नाहीतर लोणचे खराब होऊ शकते.
- वरील साहित्याचे मोजमाप हे, तयार लोणचे चार जणांच्या कुटुंबाला पैपाहुणे, शेजारी-पाजारी यांसहित वर्षभर पुरेल अश्या हिशेबाने दिले आहे. आपापल्या गरजेप्रमाणे त्यात कमी अधिक बदल करावा.
- फोटोंतील दिसणारे साहित्य प्रमाणात दिलेल्या असेलच असे नाही.
- सदर पाककृती माझ्या अर्धांगिनीने सिद्ध केली आहे. मिपाखरांच्या कौतुकावर तिचा अधिकार आहे.
- महाराष्ट्रात, "पहिला पाऊस पडून गेल्यावर आंब्याचे लोणचे घालावे म्हणजे टिकते. उन्हाळ्यात घातले तर उष्णतेने खराब होऊ शकते" असे म्हणतात.
- आंध्र-तेलंगाणात, "आंब्याचे लोणचे उन्हाळ्यातच घालावे म्हणजे टिकते. एकदा पावसाळा सुरु झाला की मग दमटपणाने खराब होऊ शकते" असे म्हणतात.
In reply to जबरदस्त. by कंजूस
In reply to वाह..! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टिकणे हीच समस्या आहे. आंबूस होते.
वर्षभर टीकले पाहिजे नंतर नंतर खराब व्हायला लागते.तेलुगु पद्धतीच्या कैरी, आवळा, लिंबू वगैरे लोणच्यांवर तेलाचा थर रहायला हवा. खराब होणार नाही. काही महिन्यांनी तेल कमी झाले तर तेल तापवून थंड करून पुन्हा घालायला हवे. "इतकं तेलकट लोणचं खाणं आरोग्याला चांगलं आहे का?" असं वाटत असल्यास पानात वाढताना तेल काढून टाकावं. याशिवाय, आम्ही एक-एक किलोच्या बरण्यांमध्ये लोणचं घालून ठेवतो. एक संपल्यावरच दुसरी काढतो. आजवर खराब झालेलं नाही.
In reply to वाह..! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वर्षभर टीकले पाहिजे नंतर नंतर खराब व्हायला लागते.(तांत्रिक दृष्ट्या व्यवस्थीत, सुयोग्य व्यवस्थापित) घरगुती फ्रिजमध्ये मागच्या बाजूस ठेवलेल्या निर्जंतूक निर्वात बरण्यांमधील लोणचे सर्वसाधारण पणे वर्षभर टिकावयास हवे. सिमेंटांने तापणार्या घरांमध्ये फ्रिज मध्ये लोणची ठेवण्याशिवाय पर्याय नसावा. पारंपारीक लाकडी धाब्याची मोठ्या (जाड) भिंतीच्या किंवा मातीच्या घरांमधील नैसर्गिक थंडावा राखण्याची व्यवस्था सिमेंटांने तापणार्या घरांनी घालवली आसल्यामुळे कदाचित पारंपारीक पद्धती आता दाद देत नसाव्यात. पारंपारीक लोणचे टिकवण्याच्या पद्धतीत जाड (थिकनेस) चिनी मातीच्या मोठ्या बरण्या गरमपाण्याने निर्जंतूक करून लोणच्यातील मीठाचे मोठे प्रमाण, तेलाचा मोठा तवंग ठेवून बरणी बंद केल्यानंतर कापडाने बांधणे मग घरातील सावलीच्या त्यातल्या त्यात थंड जागी अशी बरणी ठेवली जात असे. काढताना हात चमचा आदींच्या निर्जंतुकतेची कडक काळजी घेऊन छोट्या बरणीत रोजच्या वापराचे लोणचे काढून मुख्य साठवणीची बरणी कमीत कमी वेळा उघडली जाईल याची दक्षता घेत. तरीही काही वेळा प्रयोग फसत असल्याचे ऐकण्यात येई नाही असे नाही. पण एकुण पाकशिस्तीमुळे माझ्या घरी माझ्या लहानपणी लोणची न टिकल्याचा अनुभव कधी आला नाही. आंध्र तेलंगाणा आणि मराठ्वाडा लोणचे घालण्याच्या काळातला फरक कदाचित आंध्र कोस्टल भागात वादळी पावसाचा कालावधी मुळे फरक असावा. पहिल्या पावसाच्या आधीच्या वार्यामुळे कैर्या आपोआप पडून रास्त दरातील उपलब्धता आणि तापमान जरासे कमी होण्याचा फायदा होत असावा. पण लोणची फ्रीज मध्ये साठवली जाणार असतील तर पावसाच्या आधी का नंतर याने खुपसा फरक पडू नये. तळटीप : फ्रीज मध्ये पदार्थ टिकवण्यासाठीचे नियम अर्थातच वेगळे असतात.
In reply to @ प्रा. डॉ. सर by माहितगार
सुचवलेल्या उपाययोजना सरकारच्या कानावर घालण्यात येतील. आभार.
नटसम्राट आणि धागालेखकाची क्षमा मागून.
======= गप्पासम्राट=======
अप्पा : कावेरी, गेल्या पाच पंचवीस वर्षात एक
गोष्ट तुला सांगायची मी विसरुन गेलो, आता सांगणार आहे ती.
कावेरी : कोणती ती ?
अप्पा : तू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर.
इश्श! या गोष्टी बोलायच्या असतात का ?
अप्पा : अजून एक ?
कावेरी : काय ?
अप्पा : लोणचे बरणीतलं तितकं थोडं फ़्रिज मधे ठेवत चला, बरं का !
खराब होत नाही.
कावेरी : आणि हे काय मला माहीत नव्हतं ? वर्षानुवर्ष तसंच करतो.
अप्पा : तरीही एकदा सांगावंसं वाटलं.
======== पडदा ==========
- दिलीप बिरुटे
(आपला अप्पा बेलवलकर उर्फ़ )
In reply to हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to या निमित्ताने विचारतो - by कंजूस
गोंगुरा पचडी किंवा लोणचे म्हणा केले आहे काय?हे काय विचारणं झालं का साहेब? माझी जीव की प्राण आहे! पेरुगु-अन्नं-पच्चडि यात बहुतेक वेळा गोंगुरा पच्चडिच असते. गोंगुरा पच्चडि == अंबाडीचा ठेचा दोन-तीन दिवसात संपवायचा असेल तर हिरव्या मिरच्या घालायच्या. महिनाभरापर्यंत हवा असेल तर वाळलेल्या लाल मिरच्या घालायच्या. या फोटो सर्वात कमी दिसणारा पदार्थ पहा -
In reply to गोंगुरा पचडी किंवा लोणचे by वामन देशमुख
जबरदस्त.