"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...
वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.
लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.
असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.
व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
वाचने
122906
प्रतिक्रिया
590
मिसळपाव
प्रतिक्रिया
BJP ने बिजली सब्सिडी पर AAP को घेरा, केजरीवाल से पूछे ये 5 सवाल
In reply to केजरीवाल ने देश को दीं 10 गारंटी by मुक्त विहारि
दिल्ली के मोहल्ला क्लिनिक में फर्जीवाड़ा, CBI जांच होगी:आरोप- नकल
In reply to केजरीवाल ने देश को दीं 10 गारंटी by मुक्त विहारि
कुठल्या प्रकारचे रोजगार? आपचे कार्यकर्ते व्हा आणि सरकारचे पैसे उ
In reply to केजरीवाल ने देश को दीं 10 गारंटी by मुक्त विहारि
हे मिसळपाव आहे की छोले भटूरे
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to हे मिसळपाव आहे की छोले भटूरे by अमरेंद्र बाहुबली
इतकीच हिंदी आवडते तर मराठी
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to इतकीच हिंदी आवडते तर मराठी by अमरेंद्र बाहुबली
ज्ञान महत्त्वाचे... भाषा
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
भाषेतील ज्ञान महत्त्वाचे.
In reply to ज्ञान महत्त्वाचे... भाषा by अमरेंद्र बाहुबली
In PCR call, Swati Maliwal
लिंक बद्दल धन्यवाद
In reply to In PCR call, Swati Maliwal by अहिरावण
'अगर आपने कमल का बटन दबाया तो मैं जेल...', हरियाणा में रैली के द
पूर्णपणे सरंजामी वसाहतवादी
In reply to 'अगर आपने कमल का बटन दबाया तो मैं जेल...', हरियाणा में रैली के द by मुक्त विहारि
कोणती पिलावळ काय आहे ते
In reply to पूर्णपणे सरंजामी वसाहतवादी by अहिरावण
तुम्ही गेला होता का
In reply to कोणती पिलावळ काय आहे ते by अमरेंद्र बाहुबली
नाही.
In reply to तुम्ही गेला होता का by सुबोध खरे
हाहाहा. त्यांच्या उत्तराची
In reply to सत्याचे प्रयोग केले तेव्हा ही by आग्या१९९०
सध्या ही जमात बेक्कार मार खाऊ
In reply to हाहाहा. त्यांच्या उत्तराची by अमरेंद्र बाहुबली
खरे आहे.
In reply to सध्या ही जमात बेक्कार मार खाऊ by आग्या१९९०
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to कोणती पिलावळ काय आहे ते by अमरेंद्र बाहुबली
सरकारी स्कूलों की बदहाली देख भड़का दिल्ली HC
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
आप के विधायक ने किया, सरकारी स्कूल के प्रिंसीपाल पे हमला...
In reply to सरकारी स्कूलों की बदहाली देख भड़का दिल्ली HC by मुक्त विहारि
दिल्ली का सरकारी स्कूल जहां पर 3600 बच्चे टीन शेड के नीचे करते ह
In reply to आप के विधायक ने किया, सरकारी स्कूल के प्रिंसीपाल पे हमला... by मुक्त विहारि
दिल्ली हाई कोर्ट ने अप्रयुक्त सरकारी स्कूल भवनों पर नाराजगी व्यक
In reply to दिल्ली का सरकारी स्कूल जहां पर 3600 बच्चे टीन शेड के नीचे करते ह by मुक्त विहारि
सच एक होता है झूठ कई होते हैं
In reply to दिल्ली हाई कोर्ट ने अप्रयुक्त सरकारी स्कूल भवनों पर नाराजगी व्यक by मुक्त विहारि
चांगल्या शाळा आहेत या !
In reply to सच एक होता है झूठ कई होते हैं by मुक्त विहारि
हो ना....
In reply to चांगल्या शाळा आहेत या ! by अहिरावण
AAP विधायक अमानतुल्लाह खान और बेटे अनस के खिलाफ गैर जमानती वारंट
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
स्वाति मालीवाल के साथ हुई मारपीट पर पूर्व पति नवीन जयहिंद का बया
स्वाति मालीवाल से मारपीट के सवाल पर केजरीवाल चुप:लखनऊ प्रेस कॉन्
'केजरीवाल बहाने बनाकर समन पर नहीं हुए पेश, ये आरोपी होने का संके
दिल्ली अस्पताल घोटाला ....
रेटून खोटे बोल....
In reply to दिल्ली अस्पताल घोटाला .... by मुक्त विहारि
केजरीवाल के पीए को 5 दिन की पुलिस रिमांड:बिभव कुमार की अग्रिम जम
US-कनाडा और अरब के कई देशों से AAP को खूब मिला फंड, ED ने MHA को
CM केजरीवाल ने साफ किया रुख, बोले- 'इंडिया गठबंधन की सरकार बनी त
स्वाति मालिवाल ने बोला 'केजरीवाल कैबिनेट' पर हमला, कहा- पूरी ट्र
स्वाति मालिवाल केस ...DVR को FSL जांच के लिए भेजा
मनीष सिसोदिया की जमानत याचिका खारिज, HC ने कहा- आरोपी प्रभावशाली
अब अरविंद केजरीवाल क्यों अलाप रहे 'पाकिस्तानी-पाकिस्तानी'? BJP क
कन्हैया कुमार के लिए CM अरविंद केजरीवाल ने किया चुनाव प्रचार, बो
निष्पक्ष जांच हो और न्याय मिले...', स्वाति मालीवाल से मारपीट केस
केजरीवालांसारखे लोक आहेत
In reply to निष्पक्ष जांच हो और न्याय मिले...', स्वाति मालीवाल से मारपीट केस by मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to केजरीवालांसारखे लोक आहेत by अमरेंद्र बाहुबली
-- म्हणून देशातल्या प्रामाणिक लोकांना आशा आहे.
In reply to केजरीवालांसारखे लोक आहेत by अमरेंद्र बाहुबली
शाळा चांगल्या करणे म्हणजे
In reply to -- म्हणून देशातल्या प्रामाणिक लोकांना आशा आहे. by चित्रगुप्त
स्वाति मालीवाल मामले में अरविंद केजरीवाल ने 9 दिन बाद तोड़ी चुप्
केजरीवालला दहा प्रश्न.
स्वाती मालीवाल भाजप एजंट आहे.
In reply to केजरीवालला दहा प्रश्न. by चित्रगुप्त
इमानदार मुख्यमंत्री हेच
In reply to स्वाती मालीवाल भाजप एजंट आहे. by अमरेंद्र बाहुबली