“आपला भारत देश आता प्रगतीच्या
मार्गावर आहे. आणि भारताला प्रगती
करण्याच्या मार्गात आता कुणी ही खीळ घालू शकत नाही.”
हे मी प्रो.देसायांना चर्चेच्या दरम्यान
सांगत होतो.
आणि मी पूढे म्हणालो,
“भारतात खूप संशोधन संस्था निर्माण केल्या पाहिजेत.TIFR आणि BARC सारख्या संस्था श्री.टाटा आणि डॉ.भाभा ह्यांच्या सहाय्याने सत्तर बहात्तर वर्षांपूर्वी स्थापन झाल्या. स्वतःच्या हिम्मतीवर अणू अस्त्रांवर अभ्यास करून स्वतःची अणू अस्त्रं भारताने निर्माण केली.
भारताने, पाकिस्ताना सारखी इतर देशांकडून माहिती चोरून ही अस्त्रं मिळवली नाहीत.आपल्या शास्त्रज्ञांना त्याबद्दल शाबासकी देऊ तेव्हढी थोडी होईल.
आपल्या देशात विज्ञान शास्त्र शिकलेली खूप तरूण/तरूणीं आजमितीस उपलब्ध आहेत.
विज्ञानाचं महत्त्व त्यांना उमजलं
आहे असं दिसतं
विज्ञान हे ज्ञानाचं प्रवेश द्वार आहे.
असं मला वाटतं. भाऊसाहेब तुमचं
विज्ञानावषयी काय मत आहे?”
असा सरळ प्रश्न मी त्यांना केला.
ते मला म्हणाले,
“आणखी विस्तृत दृष्टीने सांगायचं
झाल्यास - स्वतःला,आपल्या देशाला, आपल्या नात्यांना, आपल्या विचारांना, भावनांना समजून घेण्याचं प्रवेश द्वार, हे विज्ञान आहे असं मला वाटतं.
माझा विश्वास आहे की शिकणं हे एक शास्त्र आहे आणि विज्ञान शास्त्र शिकणं हे आपल्याला आणि आपल्या क्षमतांना एकत्रित करण्यास
मदत करतं.
अज्ञाताची जाणीव, आपल्याला विज्ञानापासून ते कलेपर्यंतच्या सर्व सर्जनशील क्रियाकलापांमध्ये प्रेरित करत असते.
वैज्ञानिक पद्धतीद्वारे ज्ञानाचा शोध, एका मोठ्या उद्देशासाठी, जीवनातील विविध पैलूंना एकमेकांच्या विरूद्ध तोलण्यास मदत करतो.
व्यक्तींना एकत्र आणून, एक नेटवर्क तयार करता येतं.त्यामुळे,वैयक्तिक बुद्धीमत्ता एकत्रित करून एकूण कार्य अधिक सामर्थ्यशाली बनवता येतं.
असं असताना मनुष्याचं नैतिक वर्तन, हे पालनपोषण आणि सामाजिक बंधन यावर आधारित असायला पाहिजे.
कारण माणूस म्हणून, आपण सर्वांनी एकमेकांवर अवलंबून राहून
सहकार्य करून,अद्वितीय वातावरण तयार करण्यासाठी झटलं पाहिजे.
ज्ञानासाठी विज्ञान शास्त्र शिकल्या शिवाय पऱ्याय नाही.असं मला वाटतं.”
क्षणभर प्रो. देसाई भारताच्या तरूण/
तरूणींच्या मनातलंच सांगत आहेत असं मला वाटलं.
वाचने
3140
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
चुंद्रावर लिवा हो ....
लेखातील विचारांचे अभिसरण,
गवि
In reply to लेखातील विचारांचे अभिसरण, by गवि
कसला डोंबलाचा कॉपीराईट? खुशाल
In reply to गवि by भागो
वाक्यावर काॅपीराईट नसेलही कदाचित
In reply to कसला डोंबलाचा कॉपीराईट? खुशाल by गवि
अलेक्सास आव्हान
In reply to लेखातील विचारांचे अभिसरण, by गवि
म्हणजे गंगा पुन्हा
In reply to अलेक्सास आव्हान by नठ्यारा
म्हणजे गंगा पुन्हा हिमालयाकडे
In reply to म्हणजे गंगा पुन्हा by भागो
भारताच्या तरूण/तरूणींच्या
उच्च प्रतिभेचे अनवट लेखन
गवई भौ,कां.लिं. भौ...
जात होतो वाटेनं मी तोऱ्यात जी