मिराशी
काव्यरस
मी नाही कुणाचा बाप
मी नाही कुणाचा आजा
रंग बदलतो मी वारंवार
कुंपणावरचा सरडा जसा
मी न कुणाचे खातो, ल्यातो
तो श्रीराम आम्हांला देतो
लळा जिव्हाळा नाती गोती
मी वेशीवर टांगून रहातो
नाही कुणाची पर्वा, आशा
नाही पुसले म्हणून निराशा
स्वानंदाचे टाळ घेऊन हाती
जगतो मी माझीच मिराशी
वाचने
2591
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
मस्त ! छान ! मस्त कलंदर फकीरी म्हणायची !
सगळं सोडून आता वैराग्य प्राप्त झालं !
येऊ देत पुढच्या रचना !
https://www.misalpav.com/node/52047
वरील धाग्याचा खाता उघडलाच नाही.
धन्यवाद चौको भौ.
कर्नलसाहेब
कडॅक सॅल्युट!
छान जगणे !
भरघोस मिशीला पीळ देऊन म्हणणारा की
मी न कुणाचे खातो, ल्यातो तो श्रीराम आम्हांला देतो लळा जिव्हाळा नाती गोती मी वेशीवर टांगून राहतोआमच्या सारख्या शिपाई गड्याला चटकन भावतो...!
मस्त ! छान ! मस्त कलंदर फकीरी