यू -ट्युबवरील मराठी नाटके: दृष्टीक्षेप
नाटक पाहणारी मंडळी आता आपण थोडीच राहिली आहोत. म्हणून जर तुम्हाला नाटक आवडले असेल तर तुमच्या मित्र परिवाराला ते पाहण्यास जरूर सांगा, जेणेकरून ही खालची सर्व आसने भरली जावीत.यावर अधिक बोलणे न लगे. खऱ्याखुऱ्या नाट्य रसिकाला अधूनमधून नाटक पाहिल्याशिवाय काही चैन पडत नाही आणि नवे नाटक वरील कारणांमुळे पाहण्याचे राहून जाते. मग अशा रसिकासाठी दुधाची तहान ताकावर का होईना पण भागवण्यासाठी आंतरजालावरील युट्युबचा एक बरा पर्याय उपलब्ध आहे. तिथे आपल्याला अनेक जुनी नाटके पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी काही नाटके ही मुळातच चांगल्या अनुभवी कलाकारांना घेऊन व्यावसायिक पद्धतीने चित्रित केलेली आहेत. काही नाटके महाराष्ट्रातील विविध नाट्य स्पर्धांमध्ये किंवा हौशी रंगभूमीवर सादर झालेली आहेत. तर अन्य काही नाटके दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पूर्वी प्रक्षेपित झालेली आहेत.
गेल्या ७ वर्षांमध्ये यू-ट्युबवरील अशा अनेक नाटकांचा मी आस्वाद घेतला. मी पाहिलेल्या नाटकांची यादी एक संदर्भ म्हणून इथे लिहून ठेवतो. यथावकाश प्रतिसादांमधून त्या नाटकांबद्दल अजून माहितीची भर घालत राहीन. ज्या वाचकांनी या माध्यमातून नाटके पाहिली असतील त्यांनीही प्रतिसादांमधून त्या नाटकाबद्दल थोडक्यात लिहायला हरकत नाही. अशा तऱ्हेने या धाग्याच्या निमित्ताने मराठी नाटकांची एक आंतरजाल संदर्भयादी सर्वांसाठी उपलब्ध राहील.
आता थोडे अशा नाटकांच्या चित्रफित-दर्जाबद्दल. काही नाटकांचा दर्जा खरोखरच उत्तम आहे. काहींचा तो मध्यम आहे परंतु त्यातून नाट्य संवादांचा अनुभव चांगला घेता येतो. सह्याद्री वाहिनीवरील जी नाटकं इथे चढवली गेली आहेत त्यांचा दर्जा मात्र साधारण आहे आणि त्यातील ध्वनीमुद्रण फारसे खास नसते.
प्रतिसादांमधून लिहिताना आपणही संबंधित नाटकाचे नाव, लेखक, प्रमुख कलाकार, तुमचे मत आणि चित्रफितीच्या दर्जाबद्दल जरूर लिहावे. आता मी पाहिलेल्या नाटकांची लेखकानुसार फक्त यादी लिहितो. ती गेल्या ५-७ वर्षांपासून पाहत असल्याने आता एकदम प्रत्येकाबद्दल छोटा परिच्छेद लिहीणे अवघड आहे. पण अगदी अलीकडे जी नाटके पाहिलीत किंवा यापुढे जी पाहीन, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती प्रतिसादांमधून देईन. या नाटकांचा लेखनकाल अंदाजे गेल्या ५०-५५ वर्षांपूर्वीपासूनचा आहे. सध्याच्या तरुण पिढीला आवड असल्यास ही नाटके जरूर पाहता येतील. त्यातले एखादे नाटक आपण पूर्वी प्रत्यक्ष रंगमंदिरात पाहिले असल्यास आता त्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येईल.
मी पाहिलेली (चित्रित) नाटके:
* विजय तेंडुलकर
शांतता ! कोर्ट चालू आहे
अशी पाखरे येती
सखाराम बाईंडर
कमला
*जयवंत दळवी
बॅरिस्टर, पर्याय, लग्न, महासागर, नातीगोती
*वसंत कानेटकर
अश्रूंची झाली फुले, अखेरचा सवाल, बेइमान, मला काही सांगायचंय
* पु ल देशपांडे
सुंदर मी होणार
* आचार्य अत्रे
तो मी नव्हेच
* रत्नाकर मतकरी
इथं हवय कुणाला प्रेम, आरण्यक, ब्लाइंड गेम
* शं ना नवरे
सूर राहू दे
धुक्यात हरवली वाट
* मधुसूदन कालेलकर
शिकार
* अशोक समेळ
कुसुम मनोहर लेले
{केशव मनोहर लेले : लेखक आठवत नाही. सध्या उपलब्ध नाही }
* प्र. ल. मयेकर
आसू आणि हसू
* उदय नारकर
खरं सांगायचं तर ( मूळ इंग्लिश; अगाथा ख्रिस्ती)
* शेखर ढवळीकर
नकळत सारे घडले
* डॉ. शिरीष आठवले
मित्र
* समीर कुलकर्णी
तुझ्या माझ्यात
* वसंत सबनीस
कार्टी काळजात घुसली
* मनोहर सोमण
द गेम
* विजय निकम
रघुपती राघव राजाराम
*सुरेश जयराम
डबल गेम
* चंद्रशेखर गोखले
अनोळखी ओळख
* शिवराज गोर्ले
बुलंद
* क्रांती बांदेकर
कोर्ट मार्शल (मूळ हिंदी - स्वदेश दीपक)
*सुरेश खरे
ती वेळच तशी होती
* बाळ कोल्हटकर
वेगळं व्हायचंय मला
..
मागच्या पिढीतील गाजलेले अभिनेते प्रभाकर पणशीकरांच्या वरीलपैकी एका नाटकाच्या शेवटी त्यांची मुलाखत दिलेली आहे. त्यात त्यांनी नाटकांच्या चित्रीकरणाबद्दलचे त्यांचे बदललेले मत व्यक्त केले आहे. एकेकाळी त्यांचा अशा चित्रीकरणाला कट्टर विरोध होता. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले, की महाराष्ट्रातील मोजकी मोठी शहरे वगळता अन्यत्र जिल्हा पातळीवर देखील चांगली नाट्यगृहे नाहीत. जर नाटकाला महाराष्ट्रातील सर्व इच्छुक प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे असेल तर आता नाटक चित्रीकरण हाच पर्याय उरतो.
कदाचित, अजून पंचवीस तीस वर्षांनी वरील हेतू साध्य करण्यासाठी सशुल्क आंतरजाल वाहिन्या हेच व्यावसायिक नाटक सादरीकरणाचे महत्त्वाचे माध्यम ठरेल काय? माहित नाही. सच्चा नाट्यप्रेमीला हा विचार मानवणारा नसला तरी भविष्यात तो स्वीकारायला लागू शकतो.
***********************************************************************************In reply to मी नियमितपणे नाट्यगृहात जाऊन by श्रीगुरुजी
चारचौघीजुन्या संचातलं चारचौघी मी ३० वर्षांपूर्वी पाहिले होते. चांगले आहे.
In reply to वाह!अगदी मनातलं लिहिले आहे by Bhakti
In reply to ता क-तेव्हा प्रशांत दामले by Bhakti
नाट्यगृहात चांगला बदल झाला आहे.असे काही वाचले की खरंच बरं वाटतं !
In reply to त्यापेक्षा शांतता कोर्ट by nutanm
त्यापेक्षा शांतता कोर्ट चालू आहे , कुसुम मनोहर लेले ही नाटके यू टूयूबवर बघून त्यांच्या विषयांमुळे धक्का बसला व प्रगल्भ माझी मराठी नाट्यसृष्टी असा अभिमानही वाटला.+११ शांतता कोर्ट चालू आहे हे मूळ सुलभा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिकेने गाजले होते. इथे असणाऱ्या नाटकात रेणुका शहाणे आहेत. त्यांनी वठविलेल्या बेणारे बाई या पात्राचे स्वगत अप्रतिम आहे.
In reply to लिस्ट by राजेंद्र मेहेंदळे
In reply to महासागर by हेमंतकुमार
In reply to पहिले महासागर by चौकस२१२
In reply to नातीगोती by हेमंतकुमार
In reply to आसू आणि हसू by हेमंतकुमार
In reply to नाटक आवडलं. यात दोन by श्रीगणेशा
नाटकाच्या शेवटी नाटक, लेखकाला खडसावतं. मी आहे म्हणून तू आहेस, असं सांगून भेडसावतं. लेखकापेक्षा नाटक मोठं असतं नाटक सोडून, सगळं खोटं असतं.
नाट्यगृहांतील गैरसोयीबाबत अभिनेता वैभव मांगलेंनी एक संतप्त फेसबुक पोस्ट लिहिली आहे. वैभव यांचा अलिकडेच ‘संज्या-छाया’ या नाटकांचा पुणे, औरंगाबाद, नाशिक याठिकाणी नाटकाचे प्रयोग झाले. तिथं आलेल्या अनुभवावर ही पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ' टपुणे, औरंगाबाद, नाशिक येथे प्रयोग 'संज्या छाया'चे प्रयोग झाले. एकाही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंगमंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. प्रेक्षक देखील डास आणि प्रचंड उकाड्यात (विशेषतः बालगंधर्व पुणे खूप डास आणि उकाडा, कोथरूड यशवंतराव उकाडा) प्रयोग पाहत होते. एका मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग, हतबलता अनावर झाली. त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का? याचा विचार करू लागले...'
In reply to मराठी नाटक म्हणले की तिस-या by सिरुसेरि
प्रेक्षकांनी त्यांच्या मते कोण गुन्हेगार आहे ते मत लिहुन द्यायचे असते . यामधुन प्रेक्षकांच्या बहुमताद्वारे गुन्हेगार कोण आहे हे ठरवले जात असे . व त्याप्रमाणे ते पात्र गुन्हेगार असणे व त्याचा गुन्हा पकडला जाणे अशा कथानकावर दुसरा अंक सादर होत असे. हे भारीचं होतं
In reply to सखाराम बाईंडर नव्या संचात by श्रीगुरुजी
In reply to सौभद्र हे संगीत नाटक by सिरुसेरि
"नभ मेघांनी आक्रमिले " , "प्रिये पहा ..रात्रीचा समय सरुनी"छान आहेत ती पदे.
In reply to या धाग्याच्या प्रेरणेने by चौथा कोनाडा
डॉक्टर, तुम्ही सुद्धा ?+१११ अनेक वर्षांपूर्वी रंगमंदिरात पाहिले होते.
"अशी पाखरे येती"प्रेमात पडावे असे आहेच !! वातावरणनिर्मिती उत्कृष्ट . आनंद इंगळेचा बंडा देखील झकास आहे ..
In reply to +११११११ by हेमंतकुमार
आनंद इंगळेचा बंडा देखील झकास आहे ..हा ... हा .... हा .... हा .... ! अगदी ... भारी "संस्कारीत" गप्पा ठोकणारा ! टिपि़अल हाफ पॅण्ट संघ दक्ष !
In reply to रंगमंचावर... by हेमंतकुमार
In reply to रंगमंचावर... by हेमंतकुमार
नाटक संपल्यानंतर सर्व कलाकार तर रंगमंचावर येऊन उभे राहतातच. परंतु त्याच बरोबर नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक आणि सर्व पडद्यामागील तंत्रज्ञानाही रंगमंचावर बोलावले जाते आणि प्रेक्षकांना अभिवादन केले जाते. हा सुद्धा एक सुरेख पायंडा म्हणावा लागेल..... खूपच स्वागतार्ह आहे हे. आजकाल बर्याच नाटकांच्या शेवटी हे सत्र करतात ... याच वेळी रसिकांना त्यांच्यासमवेत फोटो काढायला मिळतात. नाटक व्यवसायाला टॉनिक मिळण्यासाठी हे खूप आवश्यक आहे !
In reply to काचेचा चंद्र by हेमंतकुमार
In reply to कोर्ट मार्शल शोधतांना ..... by सुधीर कांदळकर
In reply to मासा ही अमृता सुभाष यांचा by चौथा कोनाडा
In reply to मासा ही अमृता सुभाष यांचा by चौथा कोनाडा
In reply to मासा by हेमंतकुमार
मी नियमितपणे नाट्यगृहात जाऊन