मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उरलेला गतकाल

जागु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उरले जे जगायचे, वाया क्षण गतकालीचे, जगूनी क्षण साफल्याचे, माघारी तव फिरुनी यावे. राहीले जे मिटायचे, वाद आप्त - परकीयांचे निपटून सारे वाद, गोडी-गुलाबी परतूनी यावे. राहीले जे अधुरे, स्वप्न मनातील जागपणीचे स्वप्न साकारुन मनीचे, समाधान जिंकून यावे. उरले जे ऋण भाळीचे, संकटकाळी उपकाराचे फेडुन ऋण उपकाराचे, ऋणास त्या वंदूनी यावे. राहीले जे जुळवावयाचे, आप्तसंबध माणूसकीचे जोडूनी नाते माणूसकीचे, माणूस बनुनी माणसांत यावे. राहीले जे योग्य फलाचे, कर्तव्य ते जीवनाचे फळ मिळवून कर्माचे, कर्तव्यदक्ष बनुनी यावे. राहीले जे भोगावयाचे, भोग जगल्या पापाचे भोगुन भोग गतकालाचे, उरले जीवन पुर्ण जगावे. .

वाचने 3369 वाचनखूण प्रतिक्रिया 14

दशानन Mon, 05/11/2009 - 13:00
उरले जे जगायचे ते, वाया क्षण गतकालीचे, जगूनी क्षण साफल्याचे, माघारी तव फिरुनी यावे. सुंदर.. मागे फिरणे नेहमीच सोपे नसते ! कधी कधी मोहामुळे तर कधी मागे फिरल्यामुळे होणा-या त्रासामुळे मागे फिरण्याची इच्छा होत नाही .... माणूस जगणे विसरतो मोहापायी... तर मागे वळणे जवळ जवळ अशक्य. थोडेसं नवीन !

उदय सप्रे Mon, 05/11/2009 - 13:49
उरले जे जगायचे ते, वाया क्षण गतकालीचे, जगूनी क्षण साफल्याचे, माघारी तव फिरुनी यावे. छान आहे , हेच म्हणतो !

In reply to by उदय सप्रे

सँडी Tue, 05/12/2009 - 06:40
छान आहे. -संदीप. काय'द्याच बोला.

क्रान्ति Mon, 05/11/2009 - 20:53
राहीले जे मिटायचे, वाद आप्त - परकीयांचे निपटून सारे वाद, गोडी-गुलाबी परतूनी यावे. 'भले-बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर' आठवले. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** www.mauntujhe.blogspot.com

जागु Tue, 05/12/2009 - 10:40
मराठे, राजे, अवलिया, सँडी, उदय, क्रांती, प्राजू, कर्क, सायली. तुमचे मनापासुन धन्यवाद.

यशोधरा Wed, 05/13/2009 - 13:30
उरले जे ऋण भाळीचे, संकटकाळी उपकाराचे फेडुन ऋण उपकाराचे, ऋणास त्या वंदूनी यावे. सुरेख आहे ही कल्पना! आवडली.

मदनबाण Wed, 05/13/2009 - 21:01
राहीले जे जुळवावयाचे, आप्तसंबध माणूसकीचे जोडूनी नाते माणूसकीचे, माणूस बनुनी माणसांत यावे. सुंदरच... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.