मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सृष्टी माया

Bhakti · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
वाजे लडिवाळ घुंगूरवाळा चरितसे गोजिरी कपिला | धरती गळा फुलांच्या माळा फुलपाखरांनी श्वास रंगला | वाहे धीरगंभीर निर्झर निळा नाद ,सृष्टी मंदिरा घुमला | स्पर्शाचा भोवरा, दाटे उमाळा पाकळ्यांची बरसात रान सजला| अवचित पावा वाजला सावळा समाधी मनीची ,हरी हसला | -भक्ती

वाचने 2056 वाचनखूण प्रतिक्रिया 5
एक मुलगी सृष्टीची किमया- गोजिरी गाय,झरे,फुलपाखरे,वारा त्याचा कोमल स्पर्श,फुलं, त्या फुलांच्या रंगीत पाकळ्या या साऱ्याने मोहून गेली,एक समाधीचं तेव्हा चित्तात 'हरी'म्हणजे कृष्णाचा भास होतो आणि या सखीच्या अवस्थेला तो मोहक स्मित देतो :) टीप-खुप दिवसांनी मुक्त कविता सुचली होती! प्रतिसादासाठी धन्यवाद!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 23/10/2023 - 09:46
अवचित पावा वाजला सावळा. छान. लिहिते राहणे. -दिलीप बिरुटे

राघव 26/10/2023 - 01:19
आवडली! पुलेशु. :-)