७ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे सहाच्या सुमारास 'हमास' (Hamas) ह्या पॅलेस्टाईन मधील 'सत्ताधारी' दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून (Gaza Strip) अवघ्या वीस मिनिटांत सुमारे ४ ते ५ हजार रॉकेट्स डागून इस्रायलवर हल्ला केला.
एकीकडे रॉकेट हल्ला सुरु असताना हमासच्या दहशतवाद्यांनी 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) म्हणून ओळखली जाणारी, गाझा पट्टी हा पॅलेस्टाईनचा भूप्रदेश आणि इस्रायल ह्यांच्या सीमेवर बांधलेली मजबूत तटबंदी भेदून इस्रायलच्या प्रदेशात घुसखोरी करून स्डेरोट (Sderot) ह्या तटबंदीपासून सुमारे ८५० मीटर अंतरावर असलेल्या इस्त्रायली शहरात तसेच, बीरी (Be'eri) आणि नेतीव हासरा (Netiv HaAsara) अशा इस्रायलच्या सीमावर्ती भागातील कृषी वसाहतींमध्ये शिरत अंदाधुंद गोळीबार करून शेकडो नागरिक आणि सैनिकांना ठार मारले व १५० हुन अधिक इस्रायली महिला आणि लहान मुलांचे अपहरण केले.
१९४८ साली एक देश म्हणून अस्तित्वात आल्यापासूनच अक्षरशः 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' असे जीवन जगणाऱ्या इस्त्रायली नागरिकांसाठी युद्ध आणि दहशतवादी हल्ले अजिबात नवे नाहीत, पण इस्रायलच्या दिशेने येणारी रॉकेट्स/क्षेपणास्त्रे हवेतल्या हवेत नष्ट करणारी त्यांची 'आयर्न डोम' (Iron Dome) हि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, गाझा पट्टी ह्या पॅलेस्टाईनच्या भूप्रदेशाला दोन बाजूंनी वेढून (तिसऱ्या बाजूला इजिप्तची सीमा तर चौथ्या बाजूला भूमध्य समुद्र आहे) इस्रायलच्या सीमा सुरक्षित करणारे, 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) हे काँक्रीट आणि पोलादापासून तयार केलेले; शेकडो कॅमेरे, सेन्सर्स आणि रडार्सनी सुसज्ज असलेले आणि इस्रायल कडून 'स्मार्ट फेन्स' (Smart Fence) आणि 'आयर्न वॉल' (Iron Wall) म्हणून गौरवण्यात आलेले चाळीस मैल लांबीचे अत्यंत मजबूत असे कुंपण, आणि जगातली 'अत्यंत धाडसी, हुशार आणि सतर्क' असा नावलौकिक कमावलेली 'मोसाद' (Mossad) हि त्यांची गुप्तचर संस्था हे घटक 'हमास' ने डागलेल्या रॉकेट्स पासून तसेच जमिनीवरून तटबंदी भेदून आणि ड्रोन्स व ग्लायडर्सच्या साहाय्याने हवेतून इस्त्रायलच्या सीमावर्ती प्रदेशात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यांपासून इस्रायली नागरिकांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याने गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर ७ ऑक्टोबर रोजी झालेला हा हल्ला इस्त्रायलच्या अत्यंत जिव्हारी लागला आहे.
अर्थात हमासने 'ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म' (Operation Al-Aqsa Storm) असे नाव देऊन इस्त्रायलवर केलेल्या ह्या हल्ल्यांना अवघ्या काही तासांत चोख प्रत्युत्तर देत इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ह्यांनी हमासला "त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी अद्दल घडवू" असा सज्जड इशारा देऊन पॅलेस्टाईन विरुद्ध युद्ध घोषित केले असून संरक्षण विभागाने ह्या हल्ल्यांची तुलना '९/११' आणि 'पर्ल हार्बरच्या' हल्ल्यांशी केली आहे.
अशांत मध्यपूर्वेतील लेबनॉन, सिरीया, जॉर्डन आणि उत्तर आफ्रिकेतील इजिप्त अशा इस्लामिक देशांनी वेढलेल्या पॅलेस्टाईनच्या अरब बहुल भूप्रदेशात अस्तित्वात आलेल्या ह्या देशाला सातत्याने उद्भवणारी युद्धजन्य परिस्थिती आणि दहशतवादी हल्ले हाताळण्याचा तब्बल पंचाहत्तर वर्षांचा अनुभव आहे आणि 'रोज मरे त्याला कोण रडे' म्हणतात त्याप्रमाणे उर्वरित जगातील सर्वसामान्य नागरिकांनाही आता वारंवार होणाऱ्या ह्या घटनांच्या बातम्या विचलित करत नाहीत इतक्या त्याविषयीच्या संवेदना बोथट झाल्या आहेत, ह्याला बहुसंख्य भारतीयही अपवाद नाहीत!
इतकी वर्षे भारताला दूर तिकडे मध्यपूर्वेत होणाऱ्या ह्या संघर्षाची प्रत्यक्ष झळ बसत नव्हती त्यामुळे कोणाचातरी थातुरमातुर निषेध नोंदवून बाकी घडामोडींपासून अलिप्तता राखणे शक्य होते पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या G-20 परिषदेत 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) हा भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर होण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे.
परंतु नुकत्याच सुरु झालेल्या इस्रायल - पॅलेस्टाईन युद्धामुळे 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' अशा देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भवितव्याविषयी चिंताजनक परिस्थिती उद्भवली असल्याने भारताच्या मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका आणि युरोपात नव्याने स्थापीत होऊ पाहणाऱ्या व्यापक हितसंबंधांना बाधा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने हे युद्ध, त्याची व्याप्ती आणि परिणाम व इतर घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आता आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे.
['इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) अस्तित्वात आल्यास 'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' हे त्याचे सर्वात मोठे लाभार्थी असतील, पण त्याचा सर्वात मोठा फटका (सुवेज कालव्यातुन होणारी मालवाहतूक जवळपास नगण्य होणार असल्याने) इजिप्तला, आणि 'बेल्ट अँड रोड' (BRI ) ह्या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी असलेल्या पाकिस्तान, इराण, टर्की ह्या देशांना बसणार आहे त्यामुळे IMEC च्या निर्मितीत खोडा घालण्यासाठी सध्या सुरु असलेले हे युद्ध ओढवून घेण्यास हमासला चिथावणी देण्यामागे ह्या देशांचा हात असल्याचा संशय देशो-देशीच्या अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे!]
इस्रायल हा एक देश म्हणून जरी १९४८ साली म्हणजे पंचाहत्तर वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असला तरी इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन आणि समस्त इस्लामिक जगताच्या ह्या संघर्षाला शंभर वर्षांहून अधीक जुना इतिहास आहे, त्याची बीजे १९१७ साली रोवली गेली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी आपल्या वसाहती सोडताना जगभर ज्या पाचरी मारून ठेवल्या आहेत त्यापैकीच हि एक पाचर आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये! वरकरणी ह्या संघर्षाचे मूळ कारण जरी धार्मिक असले तरी एकंदरीत ह्या विषयाला ऐतिहासिक, भौगोलिक, राजनैतिक, आर्थिक असे अनेक पैलू आहेत आणि त्या पैलूंचे विश्लेषण करण्यासाठी हा धागा प्रपंच.
हा विषय खूप मोठा असल्याने एका लेखात त्या सगळ्यांचा आढावा घेणे अशक्य असल्याने मालिका न लिहिता सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असावी ह्या उद्देशाने सदर धाग्यावर शक्यतो रोज एक ह्याप्रमाणे प्रतिसादरुपी लेख किंवा लघुलेखातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करण्याचा मानस आहे आणि त्या प्रतिसादांची (अपडेट होणारी) अनुक्रमणिका खाली देण्याचा प्रयोग करत आहे.
नमुन्यादाखल सध्या डोक्यात असलेले ५ मुद्दे / विषय खाली लिहिले आहेत, अजून काही मुद्दे सुचल्यास त्यांचीही भर घालण्यात येईल.
आगामी प्रतिसादरुपी लेख/लघुलेखांची अनुक्रमणिका:
(खालील प्रतिसाद प्रकाशित केल्यावर त्यांच्या लिंक्स अपडेट करण्यात येतील)
१) युद्धस्य कथा रम्या - 'तिसरा इंतिफादा' (इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध २०२३)
'युद्धस्य कथा रम्या' हि उक्ती प्रमाण मानून ह्या प्रयोगाची सुरुवात ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामूळे सुरु झालेल्या युद्धापासून करत आहे ज्यात इस्रायलच्या 'आयर्न डोम' (Iron Dome), 'गाझा-इस्राएल बॅरिअर' (Gaza–Israel barrier) ह्या अत्याधुनिक सुरक्षाप्रणालींना चकवा देत हा हल्ला कसा झाला त्याविषयीची माहिती येणार आहे.
२) 'हमास' काय आहे आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे आणि पैसे कुठून येतात?
रॉकेट्स हे हमास ह्या दहशतवादी संघटनेचे आवडते अस्त्र, गाझा पट्टीत त्यांचे 'गावठी' रॉकेट/मिसाईल निर्मिती कारखाने आहेत, आणि त्यासाठी साहित्य म्हणून ते कशाचा वापर करतात, तसेच अन्य आधुनिक शस्त्रे, क्षेपणास्त्रे व प्रतिबंधित साहित्य तस्करीतून कशाप्रकारे मिळवले जाते हि माहिती फार रंजक आहे...
३) 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC)
'भारत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इस्रायल आणि ग्रीस' ह्या देशांच्या धोरणात्मक भागीदारीतून अस्तित्वात येऊ घातलेल्या 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती...
४) २०२३ च्या इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रतिक्रिया.
५) इस्रायलची निर्मिती आणि मुस्लिम-अरब जगताशी असलेल्या संघर्षाचा इतिहास.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
मिसळपाव
प्रतिक्रिया
४८ बाय १२ किलोमीटरची चिंचोळी
"पण तरीही इस्राईल का मिटवत नव्हतं कळेना"
In reply to ४८ बाय १२ किलोमीटरची चिंचोळी by अमरेंद्र बाहुबली
गाझा पट्टीत अडकलेल्या परदेशी नागरिकांना
In reply to "पण तरीही इस्राईल का मिटवत नव्हतं कळेना" by टर्मीनेटर
छान माहीतीपुर्ण प्रतिसाद.
In reply to गाझा पट्टीत अडकलेल्या परदेशी नागरिकांना by टर्मीनेटर
मग कोणत्या तोंडाने होलोकॉस्टच्या नावाने गळे काढुन जगाची सहानुभुत
In reply to छान माहीतीपुर्ण प्रतिसाद. by अमरेंद्र बाहुबली
जगाची सहानूभूती घेऊन जगायला
In reply to मग कोणत्या तोंडाने होलोकॉस्टच्या नावाने गळे काढुन जगाची सहानुभुत by Trump
श्री श्री श्री Trump महोदय...
In reply to मग कोणत्या तोंडाने होलोकॉस्टच्या नावाने गळे काढुन जगाची सहानुभुत by Trump
श्री टर्मीनेटर,
In reply to श्री श्री श्री Trump महोदय... by टर्मीनेटर
+१
In reply to श्री टर्मीनेटर, by Trump
अमेरीका नी शक्य होईलतर रशीयाची मदत
In reply to छान माहीतीपुर्ण प्रतिसाद. by अमरेंद्र बाहुबली
युक्रेनचा बाजार उठवण्याचा
In reply to अमेरीका नी शक्य होईलतर रशीयाची मदत by टर्मीनेटर
युक्रेनचा बाजार उठवण्याचा प्रयत्न करणार असा अंदाज लावायला हरकत नाही.मला वाटतंय युक्रेनचा बाजार ऊठवणं रशीयाला कठीण नाही. त्यांनी मुद्दाम प्रश्न चिघळत ठेवलाय. बाकी ऊत्तर गाझा रिकामं करायला सांगीतलंय इस्रायलने. जितके हल्ले होतील त्याच्या बदल्यात मोठी जमीन इस्राईलने लाटत जावा तेव्हाच हे हमासी अतिरेकी सरळ होतील.गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व
In reply to छान माहीतीपुर्ण प्रतिसाद. by अमरेंद्र बाहुबली
गाझा चे २३ लाख लोक मारून
In reply to गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व by सुबोध खरे
गाझा चे २३ लाख लोक मारून टाकावेत असे आपले म्हणणे आहेसर आपण नीट वाचत नाहीत. आपल्या सोयीने हवं तेवढं वाक्य गाळून वाचलंय का?? पुन्हा वाचा पाहू.गाझाची लोकसंख्या २३ लाख आहे
In reply to गाझा चे २३ लाख लोक मारून by अमरेंद्र बाहुबली
गाझा चे २३ लाख लोक मारून
In reply to गाझाची लोकसंख्या २३ लाख आहे by सुबोध खरे
गाझा चे २३ लाख लोक मारून टाकावेत असे आपले म्हणणे आहेसर हे वाक्य आपण कुठून ऊचलले ते माहीत नाही असो. तरीही ऊत्तर देतो. हमास ही गाझापट्टीतील संस्था आहे ना तिथल्याच लोकांनी तीच्या राजकीय भूमीकेला पाठिंबा देऊन निवडूण दिलंय. म्हणजे गाझाचे लोक बिच्चारे वगैरे नाहीत. दुसरी गोष्ट इस्रायलने का म्हणून सतत गाझाच्या हल्ल्याच्या भितीने जगत कहावे नी लाखो रूपये खर्च करावेत? गाझात माणसे राहतात तर इस्राईलात जनावरे राहतात का? कि इस्राइलच्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही?? जर गाझाच्या हल्ल्यात एकही इस्रायली मरत असेल तर इस्रायल ने संपुर्ण गाझापट्टी बेतिराख करावी. स्वतच्या नागरीकांची सुरक्षीतता महत्वाची. आता कश्मीर बद्दल, कश्मीर हा भारचाचा भाग आहे. कश्मीरातील मुस्लिमही भारतीय आहेत. ते आंगोलनं करतात राॅकेट वगैरे डागत नाहीत. पण हो सिमेपलिकडून पाकिस्तानातून होणार्या हल्ल्यात जर एकही भारतीय मरत असेल तर भारताला ही अधीकार आहे संपुर्ण पाकिस्तान बेचिराख करायचा.४८ बाय १२ किलोमीटरची चिंचोळी
ह्या सगळ्या गदारोळात परशूराम
दुसरे लेख मागे पडणार (कोकण
भारतातातली चाळीस टक्के जनता
In reply to दुसरे लेख मागे पडणार (कोकण by कंजूस
भारतातले तथाकथीत पुरोगामी जर
In reply to भारतातातली चाळीस टक्के जनता by टर्मीनेटर
भारतातले पुरोगामी देशप्रेमी
In reply to भारतातले तथाकथीत पुरोगामी जर by विजुभाऊ
पुरोगामी
In reply to भारतातले पुरोगामी देशप्रेमी by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to पुरोगामी by सर टोबी
देशप्रेमी उन्मादी वृत्ती
In reply to पुरोगामी by सर टोबी
कोणती तरी एकच गल्ली पकडा.
In reply to भारतातले पुरोगामी देशप्रेमी by अमरेंद्र बाहुबली
गाझा पट्टी संपवावी कारण त्या
In reply to कोणती तरी एकच गल्ली पकडा. by Trump
भारतातले तथाकथीत पुरोगामी जर
In reply to भारतातले तथाकथीत पुरोगामी जर by विजुभाऊ
वाचतोय.
वाखुसा
कोंग्रेस हमासला पाठींबा देतंय
In reply to वाखुसा by मुक्त विहारि
खालील बातम्या वाचा
In reply to कोंग्रेस हमासला पाठींबा देतंय by अमरेंद्र बाहुबली
पॅलेस्टाईनला मोदींनी भेट दिली
In reply to खालील बातम्या वाचा by मुक्त विहारि
धागाविषय आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधीत असल्याने
In reply to पॅलेस्टाईनला मोदींनी भेट दिली by अमरेंद्र बाहुबली
सहमत. काकांनी जे खोटं लिहीलं
In reply to धागाविषय आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधीत असल्याने by टर्मीनेटर
इस्राईलवरील हल्ल्याचा निषेध
In reply to खालील बातम्या वाचा by मुक्त विहारि
निषेध करून,
In reply to इस्राईलवरील हल्ल्याचा निषेध by अमरेंद्र बाहुबली
ह्यात हमासला सपोर्ट कुठे
In reply to खालील बातम्या वाचा by मुक्त विहारि
काँग्रेस , हमासच्या पाठीशी
In reply to वाखुसा by मुक्त विहारि
काँग्रेस , हमासच्या पाठीशी आहेतकाॅंग्रेसने पॅलेस्टाईनला पाठिबा दिलाय हमासला नाही. हमास ही अतिरेकी संघटना आहे तर पॅलेस्टाईन हा देश आहे. टंकायच्या आधी थोडातरी माहीती घेत चला काका. किती खोटं लिहीनार? :) काॅंग्रेस द्वेषात आपण खोटं लिहीत हे देखील आपल्या लक्षात येत नाही? कठीण आहे.बरेच काही लिहिता यईल
In reply to काँग्रेस , हमासच्या पाठीशी by अमरेंद्र बाहुबली
या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला सिद्धांत
प्रतिसाद पटला नाही.
In reply to या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला सिद्धांत by धर्मराजमुटके
महायुद्धात देशोधडीस लावणारे बहुसंख्य युरोपियन (आणि ख्रिश्चन) आहेत.फक्त जर्मनी नी त्यातही नाझी सोडले तर खिश्चनांचा ज्यूंना विरोध नव्हता नी नाहीये. नाझींचा विरोधही धार्मीकपेक्षा राजकीय होता. सटकेल हिटलर सोडला तर इतर कुणीही ज्यूंविरूध्द नव्हता.जर्मनीने एवढे अत्याचार केले त्याचे पापक्षालन म्हणून रिपरेशनचा ब्लड मनी न घेता जर्मनीचा एखादा तुकडा तोडून तिथे ज्यूंनी आपले राष्ट्र स्थापन केले असते तर त्या निमित्ताने त्यांच्याबरोबर थोडा तरी न्याय झाला असताज्यूंचं इस्रायली भूमीवर प्रेम असण्यामागे ती जमीन त्यांच्यासाठी पवित्र आहे हे धार्मीक कारण आहे, जर्मनीचा तूकडा त्यांच्या पवित्र भूमीत मोडला नसता. हिंदूंना रामजन्मभूमावरच मंदीर का हवंय? अख्खा भारत पडून असताना त्याच जागेवर मंदीर का ऊभारायचंय?? ह्याचं जे ऊत्तर आहे तेच पवित्र ईस्रायली नी जेरूसलेमबद्दल ज्यूंचं आहे.मुस्लीम राष्ट्रे हे फुकटचे शत्रू निर्माण करुन घेतले.मुस्लिम राष्ट्रे असेही नवनवे शत्रू शोधतच असतात. कुणी नसेल तर आपसांत लढतात.इस्त्रायलच्या सामरीक प्रगतीवर भारतीय फार खूश असतात आणि ते इस्त्रायलवर मनापासून (भाबडे) प्रेम करतात (पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले).का करू नये? मूळात आपल्या भूमीसाठी तीनच राष्ट्रे मुस्लिमांशी लढली असं मला वाटतं. पहीलं स्पेन ज्यांनी संपुर्ण भूमी निर्मूस्लिम करून घेतली. दुसरा भारत ज्याने आपला बराचसा भाग गमावून भूमी त्रासापासून मूक्त करून घेतली नी तिसरं इस्राईल जे आजही आपल्या भूमीसाठी अरबी मुस्लिमांशी लढतंय. पाकिस्तानची अणूभट्टी ऊडवायला इस्राइलच्या मोसादने भारताबरोबर प्लान आखला होता. पण आपल्याच पंतप्रधानाच्या चुकीमूळं सर्व एजंट्स मारले गेले. इस्राईल तंत्रन्यानातही प्रगत आहे नी त्याचा भारताला फायदाच होईल पण पॅलेस्टाईन किंवी इतर राष्ट्रांकडून तेल सोडले तर भारताला काहीही फायदा नाही. कश्मीर प्रशनावर किती मुस्लिम राष्ट्रे भारताच्या बाजूने असतात हा मोठा प्रश्नच आहे. तस्मात इस्राइल वाढतच रहावा नी भारतीयांनी नी भारताने होईल तेवढी मदत नी पाठिंबा इस्राईल ला द्यायलाच हवा. आणी महत्वाचं राहीलं. डायबेटीसवर रामबाण औषध इस्राईलकडेच आहे हे विसरू नका. :)प्रतिसाद पटला नाही.
In reply to प्रतिसाद पटला नाही. by अमरेंद्र बाहुबली
इतक्या ठामपणे चुकीचे
In reply to प्रतिसाद पटला नाही. by अमरेंद्र बाहुबली
खोटं असेल तर ते पुराव्यानीशी
In reply to इतक्या ठामपणे चुकीचे by कॉमी
अरे बापरे, फारच धाडसी विधान केले आहेत अ बा तुम्ही!
In reply to प्रतिसाद पटला नाही. by अमरेंद्र बाहुबली
सहमत आहे. ज्यू विरोध २ हजार
In reply to अरे बापरे, फारच धाडसी विधान केले आहेत अ बा तुम्ही! by टर्मीनेटर
.
In reply to अरे बापरे, फारच धाडसी विधान केले आहेत अ बा तुम्ही! by टर्मीनेटर
करेक्टो!
In reply to . by कॉमी
श्री हिटलर यांचे विरोधात लढणारे लोकही तितकेच वंशद्वेष्टे होते,
In reply to . by कॉमी
सहा मिलियन ज्यू लोकांना मारले
In reply to श्री हिटलर यांचे विरोधात लढणारे लोकही तितकेच वंशद्वेष्टे होते, by Trump
तुम्ही या आयडीला गंभीर पने
In reply to सहा मिलियन ज्यू लोकांना मारले by कॉमी
श्री कॉमी, तुमचा मुद्दा फक्त तपशीलात फरक आहे,
In reply to सहा मिलियन ज्यू लोकांना मारले by कॉमी
श्री ट्रम्प तुमचे हिटलरचे
In reply to श्री कॉमी, तुमचा मुद्दा फक्त तपशीलात फरक आहे, by Trump
हिटलरने लाजून दुसऱ्यांदा
In reply to श्री ट्रम्प तुमचे हिटलरचे by कॉमी
हिटलरने लाजून दुसऱ्यांदा
In reply to हिटलरने लाजून दुसऱ्यांदा by रात्रीचे चांदणे
हिटलरने लाजून दुसऱ्यांदा आत्महत्या केली असेल.हिटलरने आत्महत्या केलीच नव्हती. हिटलरची म्हणून जी कवटी सांभाळून ठेवली होती ती एका स्त्रीची निघाली असं कुठेतरा वाचलं होतं. - मूळ धाग्याला फाटे फोडू संघटना.त्याच्या बायकुची असेल... आता
In reply to हिटलरने लाजून दुसऱ्यांदा by अमरेंद्र बाहुबली
ज्यु लोकांचा वंश आणि युरोपियन लोकांचा वंश सरमिसळीमुळे जवळपास एकच
In reply to श्री ट्रम्प तुमचे हिटलरचे by कॉमी
श्री नेत्यान्याहु श्री हिटलर यांच्याबद्दल म्हणत आहेत ते पहा.
In reply to ज्यु लोकांचा वंश आणि युरोपियन लोकांचा वंश सरमिसळीमुळे जवळपास एकच by Trump
जेवढी विविधता जर्मनीच्या
In reply to ज्यु लोकांचा वंश आणि युरोपियन लोकांचा वंश सरमिसळीमुळे जवळपास एकच by Trump
कोर्टाने श्री हिटलर यांचा निर्णय बदलला.
In reply to ज्यु लोकांचा वंश आणि युरोपियन लोकांचा वंश सरमिसळीमुळे जवळपास एकच by Trump
काही अनमोल मोती.
In reply to श्री हिटलर यांचे विरोधात लढणारे लोकही तितकेच वंशद्वेष्टे होते, by Trump
ख्रिश्चनांच्या आत्यंतिक
In reply to . by कॉमी
हिटलर यांना फार तर सेक्युलर हुमॅनिस्ट असे म्हणता येतील.
In reply to अरे बापरे, फारच धाडसी विधान केले आहेत अ बा तुम्ही! by टर्मीनेटर
"या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला"
In reply to या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला सिद्धांत by धर्मराजमुटके
धन्यवाद !
In reply to "या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला" by टर्मीनेटर
पवित्र भूमीतच युद्धछायेत
In reply to धन्यवाद ! by धर्मराजमुटके
पवित्र भूमीतच युद्धछायेत रहावे की इतर ठिकाणी सुखाने राहून आपापल्या धर्माची उपासना करावी यापैकी काय जास्त प्रॅक्टीकल आहे हे ठरविणे सोपे आहे.धर्मराजसाहेब, तुमच्या मते पवित्र शहर, पवित्र भूमी सोडून जिवाचा भितीने ज्यूंनी अमेरीका वगैरे सुरक्षीत स्थळ गाठावं. माझ्या मते ज्यू इतके बुळचट नाहीत आणी राहूही नये. आपल्या मायभूमीसाठी सर्वस्व पणाला लावून त्यांनी लढायला हवे. पवित्र भूमी नाहीतरी त्यांनी लढून जिंकलीच आहे. थोडा दमदार मारा करून गाझा नी वेस्टबॅंक संपवावी. नंतर जोर्डन सिरीया लेबनाॅन अति करू लागले तर आजिबात दयामाया न दाखवता त्यांनाही ७२ हुरांकडे स्पीडपोस्टाने पाठवावे. आपल्या धर्मासाठी लढावे हा जास्त प्रॅक्टीकल विचार आहे.तुमच्या सारख्या पुरोगामीकडुन ही अपेक्षा नव्हती.
In reply to पवित्र भूमीतच युद्धछायेत by अमरेंद्र बाहुबली
>>>आपल्या धर्मासाठी लढावे हा
In reply to पवित्र भूमीतच युद्धछायेत by अमरेंद्र बाहुबली
बुरखा? कधी घातला? कुणी? कसा
In reply to >>>आपल्या धर्मासाठी लढावे हा by अहिरावण
हो का ? अरे वा ! छानच की !!
In reply to बुरखा? कधी घातला? कुणी? कसा by अमरेंद्र बाहुबली
ज्यु लोकांवर पैश्याचे लोभी असल्याचा आरोप खुप जुना आहे.
In reply to "या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला" by टर्मीनेटर
मी पुरोगामी व सनातनी दोन्हीही
In reply to ज्यु लोकांवर पैश्याचे लोभी असल्याचा आरोप खुप जुना आहे. by Trump
>>>सनातनींचा पुरोगामी द्वेष
In reply to मी पुरोगामी व सनातनी दोन्हीही by अमरेंद्र बाहुबली
पुरोगाम्यांचे पोइंट्स वॅलीड
In reply to >>>सनातनींचा पुरोगामी द्वेष by अहिरावण
अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही
In reply to पुरोगाम्यांचे पोइंट्स वॅलीड by अमरेंद्र बाहुबली
अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही
In reply to अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही by अहिरावण
अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही पॉईंट नसतात.पोइंट नसते तर एवढ्या सुधारणा झाल्या असत्या का? सनातनींना सळो की पळो करून सोडले असते का? चळवळ एवढी फोफावली असती का? भारताला हिंदू तालिबान बणन्या पासून वाचवले असते का?त्यांना त्यांची मळमळ फक्त काढायची असते.असं फक्त सनातनींना वाटतं. समाजाला माहीतीय की पुरोगामींनी काय केलंय ते. काहींच्या पोटावर लाथ पडल्याने ते पुरोगाम्यांच्या समाजसेवेला मळमळ म्हणतात.दा़खले पोथीपुरानांचे देत नाही.. मार्क्सचे देत असतात.पोथीपुरानांत दाखले देण्यासारखं काहीही नाही.दाखले फकित सनातनी देतात.बाकी पुरोगामी पणा म्ह़णजे काय आहे हे एका पुरोगाम्याने दाखवून दिले आहे.. आयुष्यभर पोथीपुरानांवर टीका केली आणि पोराची मुंज लावली. सत्यनारायणाच्या पूजा घातल्या. :)पुरोगाम्याने वयक्तिक काय करावे तो त्याचा प्रश्न. मुंज लावल्याने किंवा सत्यनारायण घातल्याने समाजाला त्रास होत नाही ना?>>> पोइंट नसते तर एवढ्या
In reply to अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही by अमरेंद्र बाहुबली
ओ एक काम करा... ते हमास आणि
In reply to >>> पोइंट नसते तर एवढ्या by अहिरावण
इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊ..
In reply to ओ एक काम करा... ते हमास आणि by अहिरावण
ओ एक काम करा... ते हमास आणि
In reply to ओ एक काम करा... ते हमास आणि by अहिरावण
ओ एक काम करा... ते हमास आणि इस्त्रायल राहिलं बाजुला... आपलंच नेहमीचं सुरु झालं. वेगळा धागा काढा. तिथे हाणामारी करु... इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊआमचा पाठिंबा आधीच देऊन झालाय, आम्ही तर सांगत आहोत की पॅलेस्टाईन बेचिराख करावा. गाझापट्टीवर गाढवाचा नांगर फिरवून स्वराज्यात (इस्राइलच्या) सामील करावी. एकेक हमासी वेचून वेचून ठाक मारावा. फक्त इथे जे हमासशी काहीबाही संबंधं जडून पुरोगाम्यांना बदनाम करायचे सनातनींचे प्रयत्न आहेत ते प्रयत्न हाणून पाडतोय.पन्नास लाख लोकांना बेघर करून
In reply to ओ एक काम करा... ते हमास आणि by अमरेंद्र बाहुबली
तेच म्हटवं काॅमींनी अजून बाजू
In reply to पन्नास लाख लोकांना बेघर करून by कॉमी
तुमच्याकडून ह्यापेक्षा जास्त
In reply to तेच म्हटवं काॅमींनी अजून बाजू by अमरेंद्र बाहुबली
पळ काढायचा चांगला मार्ग
In reply to तुमच्याकडून ह्यापेक्षा जास्त by कॉमी
छे छे गैरसमज झाला बाहुबली
In reply to पळ काढायचा चांगला मार्ग by अमरेंद्र बाहुबली
असो. तुम्ही कितीही काहीही
In reply to छे छे गैरसमज झाला बाहुबली by कॉमी
काही लोकांना इतरांसाठी शीरा विनाकारण ताणायला आवडतात, भले समोरचा
In reply to या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला सिद्धांत by धर्मराजमुटके
व्वाह धर्मराज भौ...
..
+१
In reply to .. by हेमंतकुमार