मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गाठोडं

जागु · · जे न देखे रवी...
काही गोष्टिंना ठेवावे जतन करुन आठवणींच्या गाठोड्यात गाठ बांधून ! जतन करावी एखादी ओळ गाण्याची रिकाम्यावेळी अर्थासकट गुणगुणायची ! स्मरणात ठेवाव एखाद सुख छोटसं, दु:खावर फिरवण्यासाठी मोरपिस हलकसं ! जपुन ठेवावी एखादी शाब्बासकी, खिन्न मनाची पाठ थोपटण्यासाठी ! लक्षात ठेवावं एखादं स्वप्न आगळ, उत्कर्षाच्या मार्गावर हलकेच शिपंडावं ! आठवणीत ठेवावी एखादी कथा, योग्य वळण लावण्यासाठी स्व: गाथा ! स्मरणात ठेवावी एखादी मैत्री, साठेलेलं सुख-दु:ख वाटप करण्यासाठी !

वाचने 2600 वाचनखूण प्रतिक्रिया 9

सहज 07/05/2009 - 12:18
जतन करावी एखादी ओळ गाण्याची रिकाम्यावेळी अर्थासकट गुणगुणायची ! रवंथ आवडले!

पाषाणभेद 07/05/2009 - 12:25
स्मरणात ठेवाव एखाद सुख छोटसं, दु:खावर फिरवण्यासाठी मोरपिस हलकसं ! यानेच दु:ख हलके होते. मस्तच. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

अनंता 07/05/2009 - 12:25
कृतज्ञतेचं गाठोडं उघडल्याबद्दल. तुझ्याशी निष्कपट,निर्व्याज , निर्मळ मैत्री करायला आवडेल! (तरल मनाचा)- अनंता प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)

सँडी 07/05/2009 - 13:10
अप्रतिम!!! लक्षात ठेवावं एखादं स्वप्न आगळ, उत्कर्षाच्या मार्गावर हलकेच शिपंडावं ! मस्तच! -संदीप. काय'द्याच बोला.

क्रान्ति 07/05/2009 - 21:42
सगळीच कविता मस्त. त्यातल्या त्यात या ओळी खूप भावल्या. स्मरणात ठेवावी एखादी मैत्री, साठेलेलं सुख-दु:ख वाटप करण्यासाठी ! अवांतर :-मुझसे दोस्ती करोगी? :) क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com

जागु 08/05/2009 - 10:58
सायली, सहज, अवलिया, पाषाणभेद, अनंता, सँडी, प्राजू, क्रांती. तुमचे मनापासुन खुप खुप धन्यवाद.