बंद पडलेली दारे
आत आठवणी गच्च
कुण्या देहाने त्या
जाऊन उलगडाव्या !?
रित्या रित्या खोल्या
रिती तावदाने
मनात आनमाने
संवाद करिती .
किती उन्हाळे
किती पावसाळे
आणि ग्गार हिवाळे
पाहीले या घराने ?
जुन्या आठवणींचा
जुना तो सहवास
हाच तो निवास
माझ्या अंतरीचा !
आता छतही गळते
गळतात काही आठवणी
मुक्या मुक्या मनाने
ओलवतात आठवणी !
ठेऊ मिटून त्यांना
पुन्हा बोलवतील कधी ?
नसतो समारोप ज्यांना
ओलवतील कधी कधी ?
--------------------------
अतृप्त ..
२/८/२०२३
आत्मूस गुर्जी ... इमेज दिसत नाय !
आठवणी गच्च, ग्गार हिवाळे, मुक्या मुक्या मनाने ओलवतात अश्या शब्द प्रयोगांनी इमेज मंदाकिनी / किमी काटकर वैगरेंची असावी की काय असे कुतुहल जागे झाले !
आठवणी गच्च, ग्गार हिवाळे, मुक्या मुक्या मनाने ओलवतात अश्या शब्द प्रयोगांनी इमेज मंदाकिनी / किमी काटकर वैगरेंची असावी की काय असे कुतुहल जागे झाले !
दुर्दैवाने अशा कुठल्याच हिरवीनीचे चित्र नाही. येत्या शुक्रवारी रात्री सात मिपाकरांना जमवून पार्टी दिल्यास तुम्हांलाही दिसू लागेल (कदाचित). ;)
सं - दी - प
छायाचित्र फारच बोलके आणि अर्थपूर्ण आहे. कारण यात एसटीडी आयएसडी पिसीओ हे केवळ जुनेपणाचे नव्हे तर कालबाह्यतेचे देखील प्रतीक आहे. इथे छोटेसे घर असेल तर त्यालाच जोडून एक छोटासा व्यवसाय कोणी चालवत असेल. पण आता सर्वच काळाच्या रेट्यात मागे पडले. निर्जन झाले. असा खंतावणारा फील येतोय.
खूप पूर्वी फक्त एसटीडी बूथच्या उत्पन्नावर वर एखादे घर चालत असे. एसटीडी आयएसडी पिसीओ आणि त्याखेरीज झेरॉक्स, फॅक्स, नंतर नंतर प्रिंटर असे जोडत जोडत एक "कम्युनिकेशन सेंटर" चालवणे नावाचा व्यवसाय खूप तेजीत होता. सायबर कॅफे हा त्या सर्वाचा शेवटचा अध्याय. आता हे सर्व व्यवसाय एका शक्तीने कोंडून घालून आपल्या हातातील एका चौकोनी डबीत आले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0g8auZJi58JbUJDZXg9HBjXErGjGMBtvChzaQmy7G5LSfbZfZPHFod2Mn751o8GYSl&id=100002288875710&mibextid=Nif5oz
फेसबुका वरुन उचलून कुणाला येथे लावता आले . ., तर पहा .
https://postimg.cc/
आत्मूस गुर्जी ... इमेज दिसत
In reply to आत्मूस गुर्जी ... इमेज दिसत by चौथा कोनाडा
सहमत आहे.
In reply to आत्मूस गुर्जी ... इमेज दिसत by चौथा कोनाडा
मला तर चित्र दिसत आहे.
In reply to मला तर चित्र दिसत आहे. by चांदणे संदीप
हा .... हा .... हा .... !
भावूक केलेत
चालायचेच. आठवणी अशाच असतात.
छायाचित्र फारच बोलके आणि
खूप पूर्वी फक्त एसटीडी
सफारी आणि गूगल क्रोम पैकी कशातही फोटो दिसत नाहीये
In reply to सफारी आणि गूगल क्रोम पैकी कशातही फोटो दिसत नाहीये by चित्रगुप्त
Uc browser वर पहा . तेथून
In reply to सफारी आणि गूगल क्रोम पैकी कशातही फोटो दिसत नाहीये by चित्रगुप्त
https://m.facebook.com/story
आवडली कविता. 'आनमाने' म्हणजे काय ?
चित्र पाहिलं. फेसबुक पोस्ट.