चीझी पालक मका
वाचने
8067
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वाह! मस्त 👍
ब्रेड किंवा पोळी ऐवजी बाजारात तयार मिळणाऱ्या पराठ्यांचा वापर करुन हा पदार्थ नक्कीच करुन बघणार!
पोळ्या करता येत नसल्याने एकटा असलो कि हे पराठे खुपच उपयोगी पडतात, फक्त भाजले कि काम झाले!
मला त्यांच्यापासुन आलु पराठे, गोबी पराठे, चिज पराठे वगैरे बनवणे खुपच सोयीस्कर पडते, आता भरपुर चिज घालुन हे 'चीझी पालक मका' पराठेही बनवुन बघतो लवकरच 😀
(हे तयार पराठे गव्हाच्या पिठाचे आणि मैद्याचे अशा दोन प्रकारात मिळत असले तरी चवीच्या बाबतीत मला मैद्याचेच जास्ती आवडतात)
In reply to वाह! मस्त. by टर्मीनेटर
प्रोडक्ट छान आहे,मैदा वर्ज्य करा :)
आणखिन एक वेगवेगळ्या मिलेटचा मिक्स पराठाही वापरता येईल.सध्या मिलेट ट्रेडिंग आहेत.
In reply to प्रोडक्ट छान आहे,मैदा वर्ज्य by Bhakti
करुन बघणार!!
पराठे करायची माझी सोपी पद्धत--पालक उकडुन घेऊन मग मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करणे. चवीपुरते मीठ मिरची घालुन त्यात कणीक मळणे आणि पराठे लाटणे. सॉस किवा खोबर्याच्या चटणीबरोबर मटकावणे.
मजा आहे लेकीची.
----------
वेज कटलेट,स्टफ्ट मिरची,फ्रांकी हेसुद्धा बाळकोमाटे सारू छे।(मुलांसाठी चांगले).
दाण्याचे कूट,लिंबू पिळून पालक/चवळी ची कच्ची कोशिंबीर चविष्ट लागते.
शिवाय पालक/मेथीना गोटा कढीमां.
In reply to मजा आहे लेकीची. by कंजूस
कढी आवडते तर पालक गोटा कढीमां नक्की करेन.
एक चमचा हर्ब्स
म्हणजे कोणते? कोरडे वाळलेले कि ताजे ? ऑरगॅनो पार्सली इत्यादी?
विचारायच कारण असे कि जर भारतीय मसाले जास्त घातले तर या हर्ब्स ची चव मारली जाईल
परवा एका ओळखीच्याने "कॉन्टिनेन्टल मीट लोफ " खायला घालतो म्हणले... म्हणून उत्सहाने वाट बघितली तर भरपूर आले लसूण घालून त्याचा "खिमा लोफ" झाला होता कॉन्टिनेन्टल काहीच नवहते ! काली मिरी आणि जायफळ पण होते ( हे दोन्ही मसाले आशियायी असले तरी त्याचा वापर इटालीय पदार्थात होते हे खरे आहे पण त्याचे लग्न भरपूर आले लसूण घालून झाला तो मस्त खिमा ...
तिखटा ऐवजी जर स्मोकड पाप्रिका मिळाली तर बघा एक वेगळी चव येते , शिवाय तुपाऐवजी ऑलिव्ह तेल किंवा लोणी
छान सूचना आहेत.
SNAP!N pizza mix hebs
तिखटा ऐवजी जर स्मोकड पाप्रिका मिळाली तर बघा एक वेगळी चव येते , शिवाय तुपाऐवजी ऑलिव्ह तेल किंवा लोणीनक्कीच मस्तच पर्याय आहे.
काहीसे या सारखेच तुर्की पद्धतीचे गोझलेम नावाचे परोठे असे करतात
आवरण: मैद्या आणि कणिक याचे मिश्रण पाणी आणि दुधात भिजवून झाकून ठेवावे चिंमूट भर मीठ ( जणू पिझ्झा बेस )
सारण : मोठ्या पातेल्यात चिरलेला बारीक कांदा परतवून घेणे त्यावर पालक टाकणे आणि तो गळेपर्यंत ( विल्ट ) परतणे ((पालक जर बेबी स्पिनॅच जातीचा मिळाला तर उत्तम )
हे मिश्रण काढून थंड झाल्यावर त्यातील पाणी चाळणी वापरून कमी करणे
वरील सारणात फेटा चीज ( हे जरा खारट आणि आंबट दोन्ही असते ) कुस्करून घालणे + काली मिरी आणि मीठ
(फेटा नाही मिळाले तर दुसरे कोणते जास्त आंबट चीज चालेल पण शक्यतो ताजे असावे प्रोसेज्ड चीज नको )
( तिखट नाही किंवा इतर काही नाहीत )
मैदा गोळी जाडसर लाटून त्यात हे सारण भरणे, मोठी कारंजी किंवा लांबट पण पसरट जाडसर पराठा करणे आणि तो दोन्ही बाजूने तव्ययावर खरपूस होई पर्यंत भाजणे ,
यावर लिंबू / आणि लागल्यास काली मिरी आणि मीठ वरून शिंपडून घेता येते
काॅर्न सुप काही आवडणारे पदार्थ पावसाळ्यात व हिवाळ्यात जरुर बनतात.
पौष्टिक पदार्थ करुन बघेन.
ही रेसिपी नक्की करून बघेन.
रेसीपी आवडली.
फक्त एक वाक्य थोडे खटकले.
तिच्या पोटात पालक गेला याच आई म्हणून समाधान मिळालं.हल्ली बरीच मुले भाज्या अजिबात खात नाहीत म्हणून त्याला चीझ, डीप फ्राय, रोल, वगैरे प्रकारात दडवून दिल्या जातात. यातून भाजी कमी आणि बाकी हानिकरक घटक ( उदा. साखर, मैदा, तेल, चीझ वगैरे) जास्त प्रमाणात जातात. हल्ली लठ्ठ, इनअॅक्टिव मुले जास्त दिसण्याचे हे पण एक कारण असावे (मोबाईल तर आहेच) माझ्या बघण्यात अशी कित्येक मुले आहेत. जी एक वेळ तूप साखर, न्युटेला पोळी, पराठे वगैरे खातात पण घरी केलेल्या भाज्या अजिबात खात नाहीत. हा प्रतिसाद वैयक्तिक नसून हल्ली आजूबाजूला दिसणार्या मुलांवरुन लिहिलेला आहे. अर्थात असे पदार्थ अधून मधून करणे हे रुचीपालटासाठी चांगलेच पण हे 'अधूनमधून' म्हणजे नक्की कधी हे मात्र ज्याचे त्यानेच तारतम्याने ठरवावे.
In reply to रेसीपी आवडली. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
भावना समजल्या :)
कधीतरी हो चीझ नाहीतर पनीरच वापरते.
वरती एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे शक्यतो मैदा नाहीच.
करा हो.
नैतर लेकीला वाटेल माझ्या आईला चांगले चटकमटक पदार्थ करताच येत नाहीत.
वाह! मस्त.